राष्ट्रहितम् फाऊंडेशन

  • Home
  • India
  • Murbad
  • राष्ट्रहितम् फाऊंडेशन

राष्ट्रहितम् फाऊंडेशन Selfless Service for The Nation Is Our Ultimate Mission

मुरबाड तालुक्यातील सज्जनशक्तीचा माणुसकीचा हात — देवराळवाडी येथील गरजू कुटुंबास मदतगुरुवार, १६ एप्रिल २०२६मुरबाड तालुक्या...
16/04/2026

मुरबाड तालुक्यातील सज्जनशक्तीचा माणुसकीचा हात — देवराळवाडी येथील गरजू कुटुंबास मदत

गुरुवार, १६ एप्रिल २०२६

मुरबाड तालुक्यात अलीकडेच घडलेल्या अपघातातील पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी, तालुक्यातील सुमारे ४० हून अधिक सज्जन व संवेदनशील नागरिकांनी राष्ट्रहितम् क्लबच्या माध्यमातून एकत्र येत माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे. देवराळवाडी येथील मजूर आदिवासी कुटुंबावर आलेल्या संकटाच्या काळात, समाजाने आपले कर्तव्य ओळखत तातडीने सहाय्य निधी उभारला.

आज सायंकाळी ५.३० वाजता राष्ट्रहितम् Club मधील ३ अधिकृत सदस्यांनी सदर ठिकाणी भेट देऊन एकूण ₹२७,३०० पैकी ₹५,००० इतकी रोख रक्कम संबंधित महिलेच्या हाती सुपूर्द केली. तसेच, उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. आपली मदत अत्यंत योग्य व गरजेच्या ठिकाणी पोहोचली असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

ही मदत पूर्णपणे संवेदनशीलता आणि कर्तव्यभावनेतून देण्यात आली आहे. संबंधित कुटुंबातील व्यक्ती दिनांक १३ एप्रिल रोजी आपल्या पत्नीकरिता औषध आणण्यासाठी कल्याण येथे गेले असता अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. सध्या कुटुंबात वयस्कर आजी, पत्नी व एक ३ वर्षांचे लहान मूल असून, कर्ता पुरुष हरपल्याने कुटुंब अत्यंत कठीण परिस्थितीत आहे. त्या पार्श्वभूमीवर, सदर महिलेच्या औषधोपचारांविषयी माहिती जाणून घेण्यात आली असून, पुढील आवश्यक मदतीबाबत क्लबमधील डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.

या उपक्रमात क्लब च्या अधिकृत सदस्यां व्यतिरिक्त इतर अनेक नागरिकांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवत आर्थिक मदत दिली. संपूर्ण निधी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखत मदत थेट कुटुंबापर्यंत पोहोचविण्यात आली.

विशेष म्हणजे, या उपक्रमात कुठल्याही प्रकारचा दिखावा किंवा प्रसिद्धी न करता संबंधित कुटुंबाचा सन्मान जपण्यावर भर देण्यात आला. कोणत्याही व्यक्ती किंवा सदस्यांचे नाव अथवा छायाचित्र जाणीवपूर्वक टाळण्यात आले आहे. औपचारिकतेपोटी फक्त घराचे व पॉकेटवरील मजकुराचे छायाचित्र क्लबतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

तालुक्यातील या अत्यंत गरजेच्या ठिकाणी, स्थानिक संवेदनशील नागरिकांनी कोणत्याही बाह्य किंवा शासकीय मदतीची वाट न पाहता तातडीने मदत उभी केली, ही बाब समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा प्रकारे, मुरबाड तालुक्यातील या सज्जनशक्तीने पुन्हा एकदा सिद्ध केले की—
संकटाच्या काळात माणुसकीच सर्वात मोठी ताकद असते.

मुरबाड व शहापूर तालुक्यात राजकारणाविरहित निःस्वार्थ समाजसेवा कार्यात मागील ६ वर्षांपासून कार्यरत असलेल्या राष्ट्रहितम् क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी, पुढील Official Contact वर आपले नाव व ठिकाण व्हॉट्सअँप द्वारे पाठविण्याचे विनंतीपूर्वक आवाहन क्लब द्वारे करण्यात आले आहे.
+91 093706 51318

मुरबाड : तिथीनुसार शिवजयंती रक्तदानाने साजरीछत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या प्रेरणेने राष्ट्रहिताचा संदेश देणारे श्रीशिव...
07/03/2026

मुरबाड : तिथीनुसार शिवजयंती रक्तदानाने साजरी

छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या प्रेरणेने राष्ट्रहिताचा संदेश देणारे श्रीशिव रक्तदान शिबिर यंदा ही उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडले. तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्ताने मुरबाड येथील श्रीराम मंदिर येथे आयोजित या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

या शिबिरासाठी एकूण १२० रक्तदात्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी वैद्यकीय तपासणीनंतर ८० रक्तदाते रक्तदानासाठी पात्र ठरले आणि त्यांनी उत्साहाने रक्तदान केले. तर सुमारे ४० जणांना रक्तदाब जास्त किंवा कमी असणे तसेच हिमोग्लोबिन कमी असणे अशा कारणांमुळे रक्तदान करता आले नाही. तरीही एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक रक्तदानासाठी पुढे येणे ही समाजातील जागरूकतेची आणि राष्ट्रसेवा भावाची मोठी खूण मानली जात आहे.

छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले हे सलग तिसरे वर्ष असून, प्रत्येक वर्षी वाढणारा प्रतिसाद या उपक्रमाच्या यशाची साक्ष देत आहे. शिवरायांना आदरांजली म्हणून रक्तदान हेच सर्वोच्च राष्ट्रसेवा असल्याचा संदेश देत अनेक युवक, नागरिक व महिला रक्तदानासाठी पुढे आले. या उपक्रमाची सुरवात ही श्रीगणेश, छत्रपती श्रीशिवाजी महाराज, भगवद्गीता व भारतमाता पूजनाने झाली व सांगता ही संपूर्ण वंदे मातरम् च्या गायनाने झाली.

आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे तसेच वैद्यकीय पथकाचे आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले आहेत. यावर्षी हे उपक्रम राष्ट्रहितम् क्लब मुरबाड ( डॉक्टर्स व इंजिनीअर्स फाउंडेशन) व समर्थ भारत संस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले होते.

पुढील वर्षीही हा समाजोपयोगी उपक्रम सुरू राहणार असून तिथीनुसार शिवजयंती, २५ मार्च २०२७ रोजी पुन्हा श्रीशिव रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या प्रेरणेने राष्ट्रसेवेचा हा उपक्रम पुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

02/03/2026
02/03/2026

श्रीशिव रक्तदान शिबिर २०२६
शुक्रवार,६ मार्च. श्रीराम मंदिर,मुरबाड
वेळ ९.३० ते ४.३०

नोंदणी करता form link

https://forms.gle/1V7g8mhta2mBfJK99

🚨 श्रीशिव रक्तदान शिबिर २०२६ 🚨तिथीनुसार शिवजयंती निमित्ताने,राष्ट्रहितम (Doctors & Engineers Foundation) तर्फेतिसऱ्या वर...
02/03/2026

🚨 श्रीशिव रक्तदान शिबिर २०२६ 🚨

तिथीनुसार शिवजयंती निमित्ताने,
राष्ट्रहितम (Doctors & Engineers Foundation) तर्फे
तिसऱ्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

📅 शुक्रवार, ६ मार्च २०२६
⏰ वेळ: सकाळी ९.३० ते सायं. ४.३०
📍 श्रीराम मंदिर, मुरबाड

🙏 एका रक्तदानाने ३ जणांचे प्राण वाचू शकतात.
छत्रपती Shivaji Maharaj यांना आदरांजली म्हणून रक्तदान करा.

👉 कृपया नोंदणी करा:

रक्तदान का करावे? ✔ एका रक्तदानाने ३ जणांचे प्राण वाचू शकतात! ✔ नवीन रक्तनिर्मितीला चालना मिळते. ✔ हृदयविकार आणि ल.....

तारखेनुसार शिवजयंती उत्सवाची…तिथीनुसार शिवजयंती कर्तव्याची…अमूल्य अश्या रक्तदानाच्या या खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा कार्या...
24/02/2026

तारखेनुसार शिवजयंती उत्सवाची…
तिथीनुसार शिवजयंती कर्तव्याची…

अमूल्य अश्या रक्तदानाच्या या खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा कार्यासाठी आपणास सस्नेह आमंत्रण

तिथीनुसार शिवजयंती
शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ -
श्रीराम मंदिर, मुरबाड शहर येथे.
वेळ ९.३० ते ५.३०

रक्तदान का करावे?
✔ एका रक्तदानाने ३ जणांचे प्राण वाचू शकतात!
✔ नवीन रक्तनिर्मितीला चालना मिळते.
✔ हृदयविकार आणि लोहसंबंधित आजार कमी होण्यास मदत होते.

🚩 छत्रपती श्रीशिवाजी महाराजांना आदरांजली म्हणून हे राष्ट्रसेवेचे सर्वोत्तम कार्य!

दिनांक २३ फेब्रुवारी पर्यंत ७५ नोंदणी झालेली आहे.

कृपया नोंदणी करता पुढील गुगल फॉर्म भरावेत.

https://forms.gle/1V7g8mhta2mBfJK99

वर्ष ३रे

शहापूररत्न २०२५ – साहित्य क्षेत्र (घोषणा)साहित्य क्षेत्रातील प्रभावी लेखन, सामाजिक जाणीव व सातत्यपूर्ण योगदानाबद्दलशहापू...
26/12/2025

शहापूररत्न २०२५ – साहित्य क्षेत्र (घोषणा)

साहित्य क्षेत्रातील प्रभावी लेखन, सामाजिक जाणीव व सातत्यपूर्ण योगदानाबद्दल
शहापूररत्न २०२५ (साहित्य क्षेत्र)
हा सन्मान श्री. संजय श्रीराम गगे यांना प्रदान करण्यात येत आहे.

राष्ट्रहितम्
Doctor’s & Engineer’s Foundation
CLUB SHAHAPUR

मुरबाडरत्न २०२५ – कला क्षेत्र (घोषणा)कला क्षेत्रातील दीर्घकालीन साधना, सृजनशीलता व सामाजिक योगदानाची दखल घेतमुरबाडरत्न २...
26/12/2025

मुरबाडरत्न २०२५ – कला क्षेत्र (घोषणा)

कला क्षेत्रातील दीर्घकालीन साधना, सृजनशीलता व सामाजिक योगदानाची दखल घेत
मुरबाडरत्न २०२५ (कला क्षेत्र)
हा सन्मान श्री. एकनाथ महादू देसले यांना प्रदान करण्यात येत आहे.

राष्ट्रहितम्
Doctor’s & Engineer’s Foundation
CLUB MURBAD

Address

Murbad

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रहितम् फाऊंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to राष्ट्रहितम् फाऊंडेशन:

Share