13/03/2026
व्यास संगीत विद्यालय
शास्त्रीय संगीत कार्यक्रम २०२६
दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता विद्यालयातील संगीत मंचावर विदयार्थ्यांचा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम सादर झाला. गायनासह इतर वाद्यांच्या विदयार्थ्यांनीही यात सहभाग घेतला होता.
श्री.कुलकर्णी सरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमांस आरंभ झाला.
सौ. स्वराली सावंत (संगीत शिक्षिका) यांच्यासह गायन विदयार्थ्यांनी पं. विष्णू दिगंबर पलूस्कर सुरचित प्रार्थना जय जगदीश हरे सुमधुर सादर केली.
राग तिलंग,राग यमन, अल्हैया बिलावल आणि राग दुर्गा अशा विविध रागांमधील बंदिशी आणि तराने गायन विदयार्थ्यांनी स्वर-लय बद्ध सादर केले. सान्वी तावडे, कोमल दयालकर, श्रावणी तारी,अंकिता सावर्डेकर, रितिका मौर्या, अर्णव पंडागळे, आशा परकाळे, समृद्धी गोळे, सुजाता कांडपिळे, वैशाली चव्हाण, प्रणव परब अशा अनेक गायन विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.
श्री. कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली कु. मधुरा पार्सेकर हिने देस राग सितार वादनातून सादर केला. तिला उत्तम तबला साथ कु. मनाली जाधव हिने केली.
श्री. विलास कुंदेकर सरांच्या अनेक विदयार्थ्यांनी हार्मोनियम वादन सादर केले. कु.श्रीराज देशमुख खमाज राग, श्री. इराप्पा कुराडे यांनी राग भैरवी, श्री. मंगेश मुंगेकर यांनी राग दुर्गा सादर केला. त्याचप्रमाणे हार्मोनियम विशारद कु. सिद्धेश पोफळे यांनी विलंबीत ख्याल, बंदिश, हमीर रागात सादर केले.याच रागातील "मधुबन में राधिका नाचे" हे सिनेगीत सादर केले. वादनाला अत्यंत पोषक तबला साथ कु. निहार यादव याने केली.
श्री. गोविंद काळसेकर सरांच्या बाल कलाकारांनी सुलयबद्ध तबला वादन सादर केले. कु. सिद्धेश, अमेया, मानस, साक्षात केणी, अद्वक, क्षितिज यांनी ताल त्रितालाची वादनासाठी निवड केली.
श्री. अरुण कुंदेकर सरांच्या तबला विदयार्थ्यांनी स्वतंत्र तबला वादन विविध तालात सादर केले.
निहार यादव याने ताल झपताल, कु. मनाली जाधव-ताल आडाचौताल, श्री. विनय आंग्रे-रुद्रताल, श्री. सचिन गावडे-त्रिताल आणि कु. आदित्य नितोरे याने मत्त ताल सादर केला.
कु. आदित्य नितोरे हा या वर्षीच्या गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत तबला विशारद पूर्ण परीक्षा पास झाला, श्री. कुलकर्णी सरांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन त्याचा जाहीर सत्कार आणि कौतुक करण्यात आले.
पं. विदयाधर व्यास सर, सौ. बोरकर मॅडम, श्री.कुलकर्णी सर, समस्त शिक्षक वर्ग आणि फोटोग्राफर श्री. दादरकर यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. आरंभ ते सांगता होईपर्यंत सर्व विदयार्थ्यांची उपस्थिती कौतुकास्पद होती.
व्यास संगीत विद्यालयाच्या या आणि अशा प्रत्येक कार्यक्रमात विदयार्थीच साथसंगत आणि संपूर्ण नियोजन करतात.
ओमकार,सुनील, सचिन, विक्रांत, निहार, मनाली,दिव्या, मधुरा, दर्शना, रुपेश,किरण, सिद्धेश, गिरीश हे सर्व विद्यार्थी अत्यंत प्रेमाने कार्यक्रम सांभाळतात.त्यामुळे कार्यक्रम यशस्वी होतो.