Sthaniya Lokadhikar Sena Mahasangh

Sthaniya Lokadhikar Sena Mahasangh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sthaniya Lokadhikar Sena Mahasangh, Nonprofit Organization, Goregaon, Mumbai.

दिवाळीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
21/10/2025

दिवाळीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

📢 एम.टी.एन.एल. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेची लोकाधिकार सेना रस्त्यावर!सानपाडा येथील महाराष्ट्र सुरक्षा...
16/10/2025

📢 एम.टी.एन.एल. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेची लोकाधिकार सेना रस्त्यावर!

सानपाडा येथील महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या मुख्यालयासमोर आज स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
४ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने एम.टी.एन.एल.मधील सुमारे ४०० सुरक्षा कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती.

महासंघाचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते गजानन कीर्तिकर आणि कार्याध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेले हे आंदोलन अखेर यशस्वी ठरले.

🔸 थकीत वेतनासाठी तातडीने कार्यवाही होणार
🔸 प्रत्येक कर्मचाऱ्याला ₹१५,००० अग्रीम रक्कम देण्यात येणार
🔸 इच्छुक कर्मचाऱ्यांना अन्य आस्थापनांत बदलीची सुविधा मिळणार

ही केवळ लढाई नव्हती — ही होती कामगारांच्या न्यायासाठीची शिवसेनेची भूमिका! ✊

स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ नवनियुक्त कार्यकारिणी!
16/10/2025

स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ नवनियुक्त कार्यकारिणी!

13/10/2025

नोकरदारांचा बुलंद आवाज... लोकाधिकार लोकाधिकार!

स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचं अधिकृत गाणं.. नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या.

शिवसेनेचे मुख्यनेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, जेष्ठ शिवसेना नेते माजी खासदार गजानन कीर्तिकर, युवा खासदा...
10/10/2025

शिवसेनेचे मुख्यनेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, जेष्ठ शिवसेना नेते माजी खासदार गजानन कीर्तिकर, युवा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची अंगिकृत ‘स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ’ संघटनेची आज स्थापना कार्यक्रम लोकाधिकार चळवळीतील शेकडो कार्यकर्त्यांच्या साक्षीने झाली. मराठी माणसाच्या न्याय्य आणि हक्काच्या चळवळीतील प्रमुख भाग असलेल्या लोकाधिकार चळवळीच्या या नव्या रुपात पुन्हा एकदा मराठी माणसाच्या नोकऱ्या आणि त्यांचं जीवनमान सुधरण्यासाठी नव्या जोमाने प्रयत्न केला जाईल. यावेळी लोकाधिकार चळवळीच्या इतिहास जागवणाऱ्या अध्यक्ष गजानन कीर्तिकर यांच्या ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाच्या प्रती वाटण्यात आल्या. यावेळी जेष्ठ शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, शिवसेना नेते रामदासभाई कदम, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव तसेच शिवसेनेचे खासदार, आमदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लोकाधिकारच्या ज्वलंत लढ्यात बहुसंख्येने सामिल व्हा!स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ स्था...
08/10/2025

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लोकाधिकारच्या ज्वलंत लढ्यात बहुसंख्येने सामिल व्हा!

स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ
स्थापना सोहळा!

उद्या गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५
संध्याकाळी ५ वाजता.
ठिकाणः बिर्ला मातोश्री सभागृह, बॉम्बे हॉस्पिटलजवळ, मरिन लाईन्स, मुंबई.

आग्रहाचे निमंत्रण!शिवसेनेची अंगिकृत संघटना स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ स्थापना सोहळा!गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रो...
07/10/2025

आग्रहाचे निमंत्रण!

शिवसेनेची अंगिकृत संघटना
स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ
स्थापना सोहळा!

गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता.
स्थळः बिर्ला मातोश्री सभागृह, बॉम्बे हॉस्पिटलजवळ, मरिन लाईन्स, मुंबई - २०.

Address

Goregaon
Mumbai
400063

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sthaniya Lokadhikar Sena Mahasangh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share