03/03/2026
Athak Foundation आयोजित "बाबूजी आणि मी…” हा संगीतमय कार्यक्रम शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी
महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे यशस्वीपणे पार पडला.
गायक-संगीतकार श्रीधर सुधीर फडके यांच्या सुरेल सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
सुकन्या जोशी यांचे अभ्यासपूर्ण आणि प्रभावी निवेदन—बाबुजी व श्रीधरजी यांच्या अजरामर गीतांमागील भावना, आठवणी आणि अनुभवकथन यांची सुंदर गुंफण—कार्यक्रमाची शोभा वाढवून गेले. त्याला शिल्पा पुणतांबेकर, शेफाली कुलकर्णी-साकुरीकर आणि साथीला असलेल्या कलाकारांची अप्रतिम साथ लाभली. प्रेक्षकांनी प्रत्येक सादरीकरणाला उत्स्फूर्त असा उत्तम प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास
श्री विक्रम खलाटे (IGP – CID),
श्री दिलीप तेजनकर (Police Inspector),
त्यानंतर नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे,
आणि प्रकाश गंगाधरे यांची उपस्थिती लाभली.
Janakalyan Bank, LIC, आणि इतर अनेक दात्यांनी केलेल्या मोलाच्या मदतीमुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांसमोर अत्यंत भव्य आणि सुसंपन्न स्वरूपात साकारू शकला. सर्व donor आणि sponsor यांचे आम्ही फक्त आभारी नाही, तर त्यांचे ऋणाईत आहोत.
एकंदर, उत्कृष्ट सादरीकरण, प्रभावी सूत्रसंचालन आणि समर्थ साथसंगती यांच्या बळावर हा संगीतमय सोहळा अविस्मरणीय ठरला. अथकच्या शून्य कचरा उद्दिष्टासाठी मशीन बसवण्यासाठी जागा मिळेल, हे आश्वासन प्रेक्षकांच्या साक्षीने मिळाले आणि हेच या कार्यक्रमाचे खरे यश ठरले.