पुनश्च मराठी स्वराज्य/Punascha Marathi Swarajya

  • Home
  • India
  • Mumbai
  • पुनश्च मराठी स्वराज्य/Punascha Marathi Swarajya

पुनश्च मराठी स्वराज्य/Punascha Marathi Swarajya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from पुनश्च मराठी स्वराज्य/Punascha Marathi Swarajya, Community Center, Mumbai, Mumbai.

"छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीने मराठी स्वराज्य घडवलं, आता आपल्या कष्टाने आणि बुद्धीने 'पुनश्च स्वराज्य' घडवूया! व्यवसाय करा, आत्मनिर्भर बना, आणि इतिहास पुन्हा लिहा!" "शिवराय, असे शक्तीदाता"
तू हो शिवरायांचा अंश 🙏 🚩

 #मराठीउद्योजक  #मराठीव्यवसाय  #उद्योजक  #मराठी  #व्यवसाय
23/10/2025

#मराठीउद्योजक #मराठीव्यवसाय #उद्योजक #मराठी #व्यवसाय

20/10/2025

मराठी माणूस आता हुशार झाला पाहिजे — हे केवळ आवाहन नाही, तर स्थिती समजून योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. अलीकडच्या काळात “डिजिटल क्रिएटर” नावाची नवीन जमात उदयास आली आहे. फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मने व्हायरल कंटेंटद्वारे पैसे कमवण्याची संधी दाखवली आणि त्यातून अनेकांना जलद प्रसिद्धी व आर्थिक लाभ मिळू लागले. पण याचे दुष्परिणामही कमी नाहीत — अनेक क्रिएटर्सना ‘अँग्री’, ‘क्लिकबेट’ आणि वादनिर्मिती करणारे पोस्ट तयार करून लोकांचे लक्ष मिळवायचे होते; परिणामस्वरूप समाजात तणाव, वैरभाव आणि मतभेद वाढले आहेत.

या प्रक्रियेचे काही मुख्य तोटे स्पष्ट आहेत.
पहिले — उत्पादनक्षम वेळ वाया जात आहे: लोकांच्या वेळेचा मोठा भाग वादस्पद पोस्ट व त्यावरच्या चर्चेत खर्च होतो, ज्यामुळे शिक्षण, काम आणि कौशल्यविकासावर परिणाम होतो.
दुसरे — मानसिक आरोग्यावर परिणाम: सतत नकारात्मक किंवा द्वेषपूर्ण सामग्री पाहिल्याने मानसिक तणाव, चिंता संबंधी विकार वाढू शकतात.
तिसरे — तथ्य व जनहिताच्या जागी अफवा आणि भावनिक नाट्य प्राधान्य पावते; पारंपरिक माध्यमांवरची जबाबदारी आता अनियंत्रित क्रिएटरवर वळली आहे. चौथे — समाजात द्वेष वाढण्याची शक्यता जास्त होते, ज्यामुळे शांततेचे वातावरण बाधित होते.

मराठी समाजाने जास्त सजगता दाखवावी — अशा पानांचा पाठपुरावा कमी करावा, टीका करताना तटस्थता राखावी. दर्जेदार शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि लोकहितकारी कंटेंट तयार करणाऱ्या क्रिएटरना प्रोत्साहन द्या; स्थानिक भाषेत माहितीवहन करणाऱ्या चॅनेल्सची साथ द्या.

शेवटी, वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे — सोशल मीडिया वापर मर्यादित ठेवा आणि उरलेला वेळ स्वतःचा कौशल्यविकास, पुस्तकवाचन आणि कौटुंबिक-सामजिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी वापरा. मराठी माणसाची संस्कृती समजूतदारपणावर आणि संयमावर उभी आहे — जर आपण हे सगळे लक्षात ठेवले तर डिजिटल युगातही आपण आपला मानसशास्त्रिक आणि सामाजिक समतोल राखू शकतो.

- FB पुनश्च मराठी स्वराज्य/Punascha Marathi Swarajya
#मराठीउद्योजक #मराठीव्यवसाय #उद्योजक #मराठीस्टार्टअप
#मराठीसमुदाय #मराठीनेटवर्किंग #मराठी #व्यवसाय

06/10/2025

👉 प्रभावी युद्धनीतीची शिकवण — इतिहासापासून आजपर्यंत 👈

शिवरायांनी वाघ नखांनी अफजल फाडला त्या आधी कित्येक दिवस त्याचा सर्व अंगानी विचार केला असेल. लागणारा जोर, नखांची धार आणि आपल्या विरोधकांच्या शक्तीचा अंदाज घेतला असेल. तो पर्यंत बोलण्यात गुंतुवून आणि गोड बोलून दुष्मनाला टप्यात पण यायला भाग पाडले. युद्धनीतीमध्ये स्वतःच्या स्तिथी, उदभवणारी परिस्तिथी, दुष्मनाच्या ताकतीचा आणि होणाऱ्या परिणामांचा पूर्ण विचार करून कसा यशस्वी आघात करायचा हे यातून शिकण्या सारखं आहे.

पण आम्ही काय करतो इतिहासाच्या गर्वात कोणतीही युद्धनीती न अभ्यासता, परिणामांची चिंता न करता फक्त खळ खट्याक करत सुटलोय.

स्वराज्य निर्माण करायचंय तर ज्याच्या विरुद्ध दण्ड थोपटायचेत त्याची ताकद, मर्म, आपली स्तिथी आणि आपल वेगळेपण या सर्वच विचार करून लढाई आखली पाहिजे तरच यश आपले होईल.

- FB पुनश्च मराठी स्वराज्य/Punascha Marathi Swarajya

06/10/2025

वाघ हल्ला करताना नख बाहेर काढतो. मराठी माणसाने कायम नखे बाहेर काढून रहाणे सोडावे🙏

06/10/2025

परप्रांतीयांकडून शिकण्यासारख्या आहे. समाज भावना, स्व भाषा प्रेम, सहाय्य आणि सीमोल्लंघन (दुसऱ्या राज्यात, देशात जाऊन व्यवसाय करणे)

03/10/2025

शिवरायांचा अंश आपण होऊया! 🙏

“शिवराय जन्मावें शेजारच्या घरी” हे वाक्य आपल्या समाजात अनेकदा ऐकायला मिळते. यामागचा लपलेला अर्थ असा की, लोकांना स्वराज्य हवे असते, प्रगती हवी असते, समाजाचा बदल हवा असतो, पण त्यासाठी स्वतः त्रास सहन करायला, कष्ट घ्यायला कोणी तयार नसते. विचार असा असतो की कुणीतरी शिवराय होऊन पुढे यावं, त्याने हाल सोसावे, त्याने रक्त घाम गाळावा आणि आपण फक्त मागे उभे राहून साथ द्यावी.

पण इतिहास आपल्याला वेगळंच शिकवतो. शिवरायांनी स्वराज्य घडवताना रात्रीचा दिवस केला, डोंगर रान पिंजून काढले, असंख्य संकटे सहन केली. जर त्यांनी “कोणीतरी दुसरा करेल” असा विचार केला असता, तर स्वराज्य कधीच उभे राहिले नसते.

आजच्या काळातही हीच परिस्थिती आहे. समाज बदलायचा आहे, व्यवसाय उभा करायचा आहे, मराठी माणसाला उभारी द्यायची आहे, पण जर आपण फक्त वाट पाहत बसलो की कुणीतरी दुसरा मदत करेल तर माझ्याने होईल, तर बदल घडणार नाही. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाने आता ठरवायला हवे — मी पूर्ण शिवराय नाही होऊ शकत, पण शिवरायांचा अंश नक्कीच होऊ शकतो.

शिवरायांचा अंश होणे म्हणजे काय?
👉 एक धाडसी स्वप्न पहा
👉 त्यासाठी झोकून काम करा
👉 धाडसाने नवे मार्ग निवडा
👉 स्वाभिमानाने उभे राहा

हे गुण आपल्या प्रत्येकामध्ये जागृत झाले तर प्रत्येक मराठी माणूस दंड ठोकून उभा राहील. मग स्वराज्य घडवण्यासाठी हजारो लाखो लोकांचा एकवेळीच प्रयत्न सुरु होईल, संपूर्ण समाज एकत्र येऊन नवे स्वराज्य घडवेल — शिक्षणाचे, संस्कृतीचे, व्यवसायाचे आणि आत्मनिर्भरतेचे.

आता प्रत्येक घरातून, प्रत्येक मनातून शिवरायांचा अंश जागा व्हायला हवा. तेव्हा आणि तेव्हाच झपाट्याने बदल घडतील आणि पुन्हा एकदा गर्जा महाराष्ट्र आपण गर्वाने म्हणू शकतो.

शिवराय असे शक्तीदाता 🚩

- FB पुनश्च मराठी स्वराज्य/Punascha Marathi Swarajya

#मराठीउद्योजक #मराठीव्यवसाय #उद्योजक #मराठीस्टार्टअप
#मराठीसमुदाय #मराठीनेटवर्किंग #मराठी #व्यवसाय

03/10/2025

इतिहास फक्त सांगत बसायचा नसतो तर त्यातून प्रेरणा घेत नवीन इतिहास घडवायचा असतो नेमकं आपण तेच केलं नाही. हो कि नाही?

Address

Mumbai
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुनश्च मराठी स्वराज्य/Punascha Marathi Swarajya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share