Maratha Kshatriy Vidyavardhak Mandal

Maratha Kshatriy Vidyavardhak Mandal Maratha Kshatriy Vidyavardhak Mandal (Regd.), Mumbai was established on 1July 1917. The trust is founded by Late Vasudev Mukund Kolambkar.

The purpose of the is to promote educational facilities to the economically weaker section of the Community गाबित समाजातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था "मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ" ची स्थापना आषाढी एकादशी च्या शुभ मुहूर्तावर १ जुलै १९९७ साली झाली. या संस्थेचे संस्थापक कै. वासुदेव मुकुंद कोलंबकार, यांनी कै. परशुराम भगवान मायबा, कै. दत्तात्रय कृष्णाजी चिन्दरकर, कै. श्रीधर गणेश गावकर, व कै. कृष्णाजी

शंकर चोडणेकर यांच्या सहकार्याने समाजातील होतकरू विद्यार्थांसाठी शैक्षणिक मदत करण्याचे काम चालू केले. ही वारकरी सांप्रदायिक मंडळी खांद्याला झोली लटकउन समाज बांधवांच्या दारोदारी जाउन जे काही दान मिळेल ते घेऊन मुलांच्या शिक्षणास मदत करत असत. काळ बदलला, धकाधकीचे व चढाओढीचे जीवन आले. समाज विखुराला गेला. तरीही संस्थापकांचे हे उदात्त विचार व कार्याची धुरा आम्ही कार्यकर्ते नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत.
संस्थेकडे आपल्या समाजातील काही सन्माननीय व्यक्तींनि आपल्या स्वताच्या वतीने किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ कायम स्वरूपाच्या ठेवी ठेवल्या आहेत. त्या ठेवीच्या वार्षिक व्याजातून ठेवीदारांच्या अटीची पूर्तता करणार्या विद्यार्थी विद्यार्थिनीस या गुणवत्ता दर्शक स्मृति पारितोषिकाच्या रक्कमा दिल्या जातात. संस्थेच्या या उपक्रमात आपल्या समाजातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीनी सहभागी व्हावे व आम्हाला त्यांची कौतुक करण्याची संधी मिळावी असे आम्हा सगळ्याना वाटते.
दर वर्षी आपण आषाढी एकादशी नंतर हा संस्थेचा वाढदिवसाचा कार्यक्रम करतो. या दिवशी आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी यांना स्मृति पारितोषिकाच्या रक्कमा व मानचिन्ह देऊन सत्कार केला जातो. आपल्या समाजातील विविध क्षेत्रातील पदवीधरक, गुणवंत, समाजसेवक यांचा देखील सत्कार करतो.

28/12/2025

🔴 जाहीर निवेदन 🔴
मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ, मुंबई (मक्षवीमं)
108 वर्षांचा गौरवशाली वारसा, 108 वर्षांची सेवा, 108 वर्षांची साधना…
म्हणजेच आपली मक्षवी!
ही संस्था इमारत नाही,
ती संस्कारांची शाळा आहे.
ही संस्था व्यवहार नाही,
ती सेवेची उपासना आहे.
ही संस्था नाव नाही,
ती माता सरस्वतीची पूजा आहे!
वारकरी संप्रदायाच्या विचारांतून जन्मलेली,
संतांच्या शिकवणीतून घडलेली,
विठ्ठलाच्या कृपेने वाढलेली
आणि माऊलींच्या पसायदानावर चाललेली —
ही संस्था आजही प्रामाणिकपणा, सत्य आणि निर्भयतेने उभी आहे.
“जे खळांची व्यंकटी सांडो,
तया सत्कर्मी रती वाढो…”
ही केवळ ओवी नाही,
ही आमच्या जीवनाची दिशा आहे!
परंतु…
आज काही टवाळखोर, उचापती, स्वार्थी, लालची आणि विकृत प्रवृत्तींची टोळी
खोट्या माहितीच्या आधारे, व्हॉट्सॲपच्या अफवांच्या जोरावर,
संस्थेची बदनामी करण्याचा, बालिश आणि नीच प्रयत्न करीत आहे!
संस्थेचे साधे सभासदही नसलेले हे लोक,
ज्येष्ठ विश्वस्तांना दमदाटी करतात, 75–80 वर्षांच्या वयोवृद्धांशी धक्काबुक्की करतात,
शिवीगाळ करतात, दादागिरी करतात, आणि म्हणे समाज सुधारायला निघाले आहेत!
लाज वाटली पाहिजे!
कार्यक्रमात विघ्न, आनंदावर आघात, आणि असुरी समाधान —
हेच यांचे ध्येय!
आमचा स्पष्ट इशारा आहे —
🛑 संस्थेच्या प्रतिष्ठेशी खेळू नका.
🛑 संयमाचा अंत झाला तर उत्तर कठोर असेल.
🛑 खोट्या आरोपांना आता पुरावे द्यावेच लागतील!
भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना आम्ही विचारतो
➡️ तुम्ही संस्थेसाठी कधी, किती आणि काय दिले?
➡️ बांधकामात तुमचा वाटा किती?
➡️ आर्थिक, वस्तूरूप किंवा श्रमदान काय?
➡️ एक तरी पुरावा आहे का?
फक्त आरोप नव्हे, उत्तर द्या!
आज ही संस्था केवळ वास्तू नाही —
ती 100 हून अधिक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे.
बँक, कर्मचारी, कॅटर्स, डेकोरेटर्स यांचे कामचारी—
सगळ्यांचे जीवन या व्यवस्थेवर चालते.
यावर हल्ला म्हणजे
समाजाच्या पोटावरच घाव!
संस्थेचे व्यवहार,
हिशोब, कर, ऑडिट, वेतन, सुरक्षा —
सर्व काही कायद्याने, नीटनेटके आणि पारदर्शक सुरू आहे.
याचा पुरावा म्हणजे सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी
संस्थेचे दैनंदिन व्यवहार आमच्याकडेच दिले आहेत
पण अफवांच्या आधारे नव्हे!
ही संस्था कोणाची खासगी मक्तेदारी नाही.
ही आहे —
क्षत्रिय मराठा, आरमारी मराठा, गोमंतक क्षत्रिय मराठा,
गाबीत, दर्यावर्दी मराठा समाजाची सामूहिक धरोहर!
संस्थेची घटना आमचा धर्म आहे,
आणि त्यानुसारच आम्ही चालतो.
एक विचार, एक दिल, एक निष्ठा —
हीच आमची खरी ताकद आहे!
आम्ही समाजाला सांगतो —
🚫 या अफवांच्या नागोबांना दारात उभे करू नका.
🚫 खोट्या पोस्ट्सना बळी पडू नका.
🚫 समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना थारा देऊ नका.
आज संघटित होण्याची वेळ आहे.
पुढच्या पिढीसाठी
आता निर्भयपणे उभे राहण्याची वेळ आहे!
आमचा विश्वास अढळ आहे —
सदाचारी माणूस कधीही घाबरत नाही.
सत्याला तलवारीची गरज नसते,
ते स्वतःच तेजस्वी असते!
आणि म्हणूनच…
आम्ही आजही ठामपणे सांगतो —
👉 आम्ही इथेच आहोत.
👉 आम्ही काम करत आहोत.
👉 आणि करतच राहणार!
आणि शेवटी तुकोबांच्या शब्दात —
“भले तरी देऊ कासेची लंगोटी,
नाठाळांच्या माथी हाणू काठी!”
🚩 जय जय राम कृष्ण हरी! 🚩
🙏🏻🙏🏻
— विश्वस्त व कार्यकारी मंडळ
मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ, मुंबई (मक्षवी)

25/12/2025

🚨भांडुपकरांनो, सावध व्हा – आपल्या एकमेव सभागृहावर हल्ला! 🚨

मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ, भांडुप यांच्या सभागृहात दिनांक २२/१२/२०२५ रोजी काही समाजकंटकांनी घुसखोरी करून बॅनर फाडले, लाथा मारून नुकसान केले व दहशत निर्माण केली.
या गुंडगिरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्या टोळीला हाकलून दिले — याबद्दल पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार 🙏🏻

हे सभागृह भांडुपकरांसाठी अत्यंत अल्प देणगीत उपलब्ध करून दिले जाते, जेथे सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक कार्यक्रम पार पडतात.
👉 हे संस्था सभासदांचे आहे त्याच बरोबर, तर संपूर्ण भांडुपचे आहे!

❗ काही स्वयंघोषित नेते व त्यांची टोळी हे सभागृह बंद पाडण्यासाठी आणि सर्व कार्यक्रम ठप्प करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
❗ हे भांडुपच्या एकतेवर व सामाजिक सलोख्यावर घाला आहे.

📣 भांडुपकरांनो, आता शांत बसण्याची वेळ नाही!
आपल्या परिसरातील सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी,
गुंडगिरी व दहशतीविरोधात आवाज उठवण्यासाठी,
आपण सर्वांनी एकत्र येऊन या अन्यायाचा निषेध केला पाहिजे.

✊ गुंडगिरीला नाही – एकतेला होकार!
✊ सभागृह वाचवा – भांडुपचा सन्मान राखा!

आम्ही कायदेशीर मार्गाने लढत आहोत.
तुमचा पाठिंबा, शेअर आणि आवाज आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.

मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ, भांडुप
(भांडुपकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर)

14/12/2025

आपली संस्था गेली अनेक वर्षे अत्यंत वाजवी देणगी स्वीकारून भांडुप येथील सर्व स्तरांतील नागरिकांसाठी त्यांच्या घरगुती व सामाजिक कार्यक्रमांसाठी सभागृह उपलब्ध करून देत आहे.
सर्व कार्यक्रम आनंदात, शिस्तबद्ध व सुरळीत पार पडावेत यासाठी अनुभवी डेकोरेटर श्री. प्रदीप चव्हाण व त्यांची टीम आपली सेवा प्रामाणिकपणे पुरवत असते.

दुर्दैवाने, भांडुपमधीलच काही मोजके व्यक्ती भांडुपकरांचे घरगुती कार्यक्रम या सभागृहात होऊ नयेत व सभागृह बंद पडावे या उद्देशाने जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत आहेत. विविध शासकीय यंत्रणांकडे तक्रारी करणे, वारंवार पोलीस बोलावणे असे प्रकार सुरू आहेत.
इतकेच नव्हे तर संस्थेच्या आवारात कार्यरत असलेले ८१ वर्षीय ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. चंद्रहास केळुसकर यांच्याशी गैरवर्तन व धक्काबुक्की करण्यापर्यंत यांची मजल गेली, ही अत्यंत गंभीर व निषेधार्ह बाब आहे.

शनिवारी, दिनांक १३/१२/२०२५ रोजी, या समाजकंटकांनी संस्थेच्या सभागृहात विवाह सोहळा सुरू असताना तो कार्यक्रम बंद पाडण्याच्या उद्देशाने महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे खोटी तक्रार केली. मात्र सदर तक्रारीस कोणताही तथ्याधार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

ही संस्था वारकरी संप्रदायातील भक्तांनी समाजहितासाठी स्थापन केलेली असल्यामुळे असे पवित्र व विधायक कार्य कोणत्याही दबावामुळे किंवा अडथळ्यांमुळे बंद पडणार नाही, याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा झाली. परमेश्वराची कृपा संस्थेवर सदैव आहे, याची प्रचीती यानिमित्ताने अनुभवास आली. पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून सदर व्यक्तीस हाकलून दिले आहे.

मामा भाचे च्या नावाने कंठशोष करणाऱ्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत हे समाजबांधव सुज्ञ असल्यामुळे वास्तविकता निश्चितच ओळखली आहे.

Address

Tembhipada Road
Mumbai
400078

Telephone

+919967633500

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maratha Kshatriy Vidyavardhak Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maratha Kshatriy Vidyavardhak Mandal:

Shortcuts

Share