Reet Charitable trust

Reet Charitable trust We care a lot about the product or mission, which is extremely important, but I love focusing on understanding the people behind it.

ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. याच भावनेतून रीत क्रिएशन ने रीत चॅरिटेबल ट्रस्ट ची सुरुवात केली. या माध्यमातून एका चांगल्या समाजीक भावनेतून ही संस्था कार्यरत आहे.

आमाराचा राजा व रीत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि शासकीय योजना नोंदणी अभियान...
16/09/2026

आमाराचा राजा व रीत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि शासकीय योजना नोंदणी अभियान.

सामाजिक उपक्रम 👇🏻🙏 श्री गणेश विसर्जन सुविधा 🙏🌺 लोढा अमारा क्लब हाऊस (LODHA AMARA CLUB HOUSE) 🌺पर्यावरणाचा समतोल राखण्यास...
16/09/2026

सामाजिक उपक्रम 👇🏻

🙏 श्री गणेश विसर्जन सुविधा 🙏
🌺 लोढा अमारा क्लब हाऊस (LODHA AMARA CLUB HOUSE) 🌺

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि सुरक्षित विसर्जनासाठी रीत चॅरिटेबल ट्रस्ट (R**t Charitable Trust) आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने लोढा अमारा येथे कृत्रिम तलावाची संकल्पना अमलात आणली आहे.
दीड दिवसापासून गौरी-गणपती व अनंत चतुर्दशीनिमित्त बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी संपूर्ण १० दिवस ही विसर्जन सुविधा उपलब्ध असेल.

सुविधेची वैशिष्ट्ये:
कालावधी: गणेशोत्सवाचे संपूर्ण १० दिवस उपलब्ध.
पर्यावरणपूरक विसर्जन: निसर्गाचा समतोल राखण्यासाठी कृत्रिम तलावाची सोय.
सुरक्षित व नियोजनबद्ध व्यवस्था: पोलीस व प्रशासनाच्या सहकार्याने गर्दीचे योग्य नियोजन.
सर्व भाविकांनी या पर्यावरणपूरक कृत्रिम तलाव सुविधेचा लाभ घेऊन बाप्पाला safe व निसर्गस्नेही वातावरणात निरोप द्यावा, ही नम्र विनंती!

विशेष सहकार्य व आभार (Special Thanks & Support)
ठाणे महानगरपालिका
रीत चॅरिटेबल ट्रस्ट (R**t Charitable Trust):
सौ. रेवा समेळ (Mrs. Reva Samel)
श्री. रवी समेळ (Mr. Ravi Samel)
श्री. प्रितेश भोईटे (Mr. Pritesh Bhoite)
प्रशासन व पोलीस विभाग:
माननीय महापौर, ठाणे महानगरपालिका (Hon. Mayor, Thane Municipal Corporation)
श्रीमती शर्मिला पिंपळकर मॅडम (Smt. Sharmila Pimpalkar Madam)
माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते
साहाय्यक आयुक्त प्रभाग समिती सोनल काळे
पोलीस उपआयुक्त (DCP) श्री. प्रशांत कदम सर (Shri Prashant Kadam Sir)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr. PI) मंजूषा भोंगळे मॅडम (Manjusha Bhongle Madam)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग - Sr. PI Traffic) सोंढे सर (Sondhe Sir)

29/08/2026
19/08/2026

आज “रीत चॅरिटेबल ट्रस्ट” ला १० वर्ष पूर्ण झाले —
एक दशकाच्या मार्गावरून निसर्गाच्या प्रत्येक कोनापर्यंत पोहोचणारा, प्रेमाने आणि संस्कृतीने भरलेला हा प्रवास .

“आपण ज्या समाजात राहतो ते समाजाचे देणे लागतो.” — या मंत्राने आम्ही दिलेल्या प्रत्येक हाताला आशेचे वारे आणले.
आपल्या संस्कृतीचे सुशील संवर्धन हे आमचं लक्ष, आणि समाजात आपुलकीचे बीज रुजवणं हे आमचं ध्येय.

या १० वर्षांच्या वाटचालीतूनही पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी गाथा रचलेली आहे. आणि हा प्रवास, नवी ऊर्जा, नवीन स्वप्न आणि समानुभूतीच्या नात्यांनी भरलेला — सलग चालू राहो हीच प्रार्थना.

हृदयाच्या कोपऱ्यातून मनापासून आभार सर्व सहभागी, सहाय्यक आणि ‘समाजाला देणारे’ होते.
अजून नवीन अध्याय उलगडूया — प्रेमाने, संस्कृतीने आणि सेवा भावनेने परिपूर्ण होवू !
रीत एक परंपरा!
❤️🙏🏻

**tcharitabletrust

Thank you Saamana
17/08/2026

Thank you Saamana

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘रीत चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने पालघर जिल्ह्यातील  लालठाणे येथील शाळेत गरजू विद्य...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘रीत चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने पालघर जिल्ह्यातील लालठाणे येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि शालेय बॅग वाटपाचा विशेष उपक्रम अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. या सामाजिक उपक्रमासाठी कॅनरा बँक व प्रसिद्ध सिने कलाकार निखिल चिनप्पा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्याचा मान ‘रीत चॅरिटेबल ट्रस्ट’ला मिळाला.संस्थेचे सचिव रविंद्र समेळ यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. ध्वजारोहणानंतर शालेय विद्यार्थ्यांसोबत आनंद द्विगुणित करण्याचा अमूल्य योग रीत चॅरिटेबल ट्रस्टला मिळाला.
नवीन शैक्षणिक साहित्य व शालेय बॅग मिळाल्यानंतर दारशेत शाळेतील गुणी आणि गरजू मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हेच या संपूर्ण उपक्रमाचे खरे यश ठरले.
“मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी रीत चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच तत्पर आणि कटिबद्ध आहे. अशा विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.”
> — रेवा रवींद्र समेळ (संस्थापक, रीत चॅरिटेबल ट्रस्ट)

मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्याला रीत परिवारातील सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने रेवा समेळ, रविंद्र समेळ, नीलम वडके, नयन कालुष्टे, नरेश कालुष्टे, अभिषेक जाधव आणि जिनेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रीत चॅरिटेबल ट्रस्टच्या या निरंतर सामाजिक बांधिलकीचे आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे स्थानिक नागरिक, शिक्षक व सर्व स्तरातून भरभरून कौतुक केले जात आहे.
आपली नम्र,
रेवा रवींद्र समेळ
(संस्थापक - रीत चॅरिटेबल ट्रस्ट)

R**t Creation Chaitali R**t

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘रीत चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने पालघर जिल्ह्यातील खोरीचा पाडा येथील शाळेत गरजू वि...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘रीत चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने पालघर जिल्ह्यातील खोरीचा पाडा येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि शालेय बॅग वाटपाचा विशेष उपक्रम अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. या सामाजिक उपक्रमासाठी कॅनरा बँक व प्रसिद्ध सिने कलाकार निखिल चिनप्पा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्याचा मान ‘रीत चॅरिटेबल ट्रस्ट’ला मिळाला.संस्थेचे सचिव रविंद्र समेळ यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. ध्वजारोहणानंतर शालेय विद्यार्थ्यांसोबत आनंद द्विगुणित करण्याचा अमूल्य योग रीत चॅरिटेबल ट्रस्टला मिळाला.
नवीन शैक्षणिक साहित्य व शालेय बॅग मिळाल्यानंतर दारशेत शाळेतील गुणी आणि गरजू मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हेच या संपूर्ण उपक्रमाचे खरे यश ठरले.
“मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी रीत चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच तत्पर आणि कटिबद्ध आहे. अशा विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.”
> — रेवा रवींद्र समेळ (संस्थापक, रीत चॅरिटेबल ट्रस्ट)

मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्याला रीत परिवारातील सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने रेवा समेळ, रविंद्र समेळ, नीलम वडके, नयन कालुष्टे, नरेश कालुष्टे, अभिषेक जाधव आणि जिनेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रीत चॅरिटेबल ट्रस्टच्या या निरंतर सामाजिक बांधिलकीचे आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे स्थानिक नागरिक, शिक्षक व सर्व स्तरातून भरभरून कौतुक केले जात आहे.
आपली नम्र,
रेवा रवींद्र समेळ
(संस्थापक - रीत चॅरिटेबल ट्रस्ट)

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘रीत चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने पालघर जिल्ह्यातील दारशेत येथील शाळेत गरजू विद्यार...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘रीत चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने पालघर जिल्ह्यातील दारशेत येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि शालेय बॅग वाटपाचा विशेष उपक्रम अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. या सामाजिक उपक्रमासाठी कॅनरा बँक व प्रसिद्ध सिने कलाकार निखिल चिनप्पा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्याचा मान ‘रीत चॅरिटेबल ट्रस्ट’ला मिळाला.संस्थेचे सचिव रविंद्र समेळ यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. ध्वजारोहणानंतर शालेय विद्यार्थ्यांसोबत आनंद द्विगुणित करण्याचा अमूल्य योग रीत चॅरिटेबल ट्रस्टला मिळाला.
नवीन शैक्षणिक साहित्य व शालेय बॅग मिळाल्यानंतर दारशेत शाळेतील गुणी आणि गरजू मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हेच या संपूर्ण उपक्रमाचे खरे यश ठरले.
“मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी रीत चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच तत्पर आणि कटिबद्ध आहे. अशा विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.”
> — रेवा रवींद्र समेळ (संस्थापक, रीत चॅरिटेबल ट्रस्ट)

मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्याला रीत परिवारातील सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने रेवा समेळ, रविंद्र समेळ, नीलम वडके, नयन कालुष्टे, नरेश कालुष्टे, अभिषेक जाधव आणि जिनेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रीत चॅरिटेबल ट्रस्टच्या या निरंतर सामाजिक बांधिलकीचे आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे स्थानिक नागरिक, शिक्षक व सर्व स्तरातून भरभरून कौतुक केले जात आहे.
आपली नम्र,
रेवा रवींद्र समेळ
(संस्थापक - रीत चॅरिटेबल ट्रस्ट)

✨ Gratitude for a Meaningful Support!❤️A heartfelt thank you to Nikhil Chinapa sir for supporting the *Mission of Change...
14/08/2026

✨ Gratitude for a Meaningful Support!❤️

A heartfelt thank you to Nikhil Chinapa sir for supporting the *Mission of Change* by R**t Charitable Trust. 🙏

Your kindness and support are helping us empower children with education, dreams, and hope📚✨

Together, we can create opportunities, inspire change, and build a better tomorrow for every child.❤️

Thank you for being a part of our journey!🌟

**tCharitableTrust SupportEducation EmpowerChildren CreateChange BetterTomorrow

Acc name- R**T CHARITABLE TRUST
acc no-059110100010338
IFSC-TJSB0000059
branch name-TJSB BANK dhokali Thane (Badlapur also )

🇮🇳 या स्वातंत्र्यदिनाला स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करूया… शिक्षणाच्या माध्यमातून भविष्य घडवूया! 🇮🇳📚भारताच्या ७९ व्या स्व...
14/08/2026

🇮🇳 या स्वातंत्र्यदिनाला स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करूया…
शिक्षणाच्या माध्यमातून भविष्य घडवूया! 🇮🇳📚

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रीत चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पालघर जिल्ह्यातील निवडक शाळांमधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. 📚🎒✏️

प्रत्येक मुलाला शिक्षणाची योग्य साधने, समान संधी आणि उज्ज्वल भविष्य मिळावे, हीच आमची मनापासूनची भावना. ❤️

✨ शिक्षण हीच प्रगतीची खरी वाट…
आणि प्रत्येक मुलाला संधी देणे हेच आमचे ध्येय! ✨

🤝 चला, या सामाजिक उपक्रमाला आपला पाठिंबा द्या.

#स्वातंत्र्यदिन #७९वास्वातंत्र्यदिन #रीतचॅरिटेबलट्रस्ट #शैक्षणिकसाहित्यवाटप #शिक्षणसर्वांसाठी सामाजिककार्य पालघर जयहिंद India IndependenceDay EducationForAll NGO

Address

Mumbai
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Reet Charitable trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Reet Charitable trust:

Shortcuts

Share