28/04/2025
नमस्कार,
संयुक्त राष्ट्र मान्यताप्राप्त संस्था 'earth' द्वारे आयोजित 'सन्मान महाराष्ट्राचा २०२५' ह्या पुरस्कार सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या ही वर्षी; शिक्षण, संस्कृती, कला, खेळ, प्रशासकीय सेवा, वैद्यकीय सेवा, समाजसेवा, अशा अनेक क्षेत्रात काम करत असलेल्या आणि महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावणाऱ्या व्यक्तींना ह्या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे.
आम्ही तुमच्या गावात, शहरात, जिल्ह्यात किंवा तुमच्या माहितीत असलेल्या व ध्येयाने झपाटलेल्या अशा व्यक्तींच्या शोधात आहोत जे वर दिलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. त्यांचं कार्य महाराष्ट्राच्या जनतेला कळावं आणि त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा या उद्देशाने संयुक्त राष्ट्र मान्यताप्राप्त संस्था ‘earth’ मार्फत “सन्मान महाराष्ट्राचा २०२५” या पुरस्काराने आम्ही त्यांना सन्मानित करणार आहोत. जेणेकरून त्यांचे कार्य हे इतरांसारखे प्रेरणादायी ठरेल.
तुम्हाला इतकंच करायचे आहे. खाली दिलेल्या google form मध्ये तुमच्या माहितीतल्या त्या व्यक्तींची माहिती भरून आम्हला पाठवायची आहे. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे आमची निवड समिती योग्य तो निर्णय घेऊन त्यातून यंदाचे पुरस्कार जाहीर केले जातील.
हा सोहळा दिनांक ३१ मे २०२५ रोजी, बीकेसी ग्राउंड, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.
धन्यवाद
टीम
#सन्मानमहाराष्ट्राचा२०२५ (वर्ष तिसरे)
Google form Link:
https://bit.ly/SanmanMaharashtracha2025
सन्मान महाराष्ट्राचा २०२५ (वर्ष तिसरे) सोहळ्याचे शिलेदार :
निर्माता : NGO ‘earth’ (A UN Accredited Non-Profit Organisation)
संकल्पना : प्रविणा कलमे आणि प्रवीण कलमे
कार्यकारी निर्माती : पूनम परदेशी |
दिग्दर्शक : विशाल देवरुखकर | .vishal
लेखक : अंबर विनोद हडप |
नृत्यदिग्दर्शन :
सुभाष नकाशे @ subhashnarayannakashe
आणि मीनल भिके
सूत्रधार :
शरद पोंक्षे
समीरा गुजर जोशी
आणि गौरव मोरे
प्रसिद्धी : औदुंबर एंटरटेनमेंट (अमृत छाया माने)
गिफ्ट हँपर्स : पंकज तांडेल आणि ऐश्वर्या तांडेल
पब्लिसिटी डिज़ाइन : लोकीज स्टुडिओ
ऑडियो-विजुअल्स : किरण माने
डिजिटल कँपेन : दीपक परुळेकर आणि वैभव शेटकर