12/07/2025
गोरेगाव येथील प्रबोधन कौशल्य विकास केंद्राचे दिमाखदार उद्घाटन संपन्न 🎉
गोरेगाव येथील प्रबोधन कौशल्य विकास केंद्राच्या वतीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील युवक व युवतींकरिता सुसज्ज अशा कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आज संपन्न झाले. या केंद्रात अत्यल्प शैक्षणिक शुल्कामध्ये 🩺 नर्सिंग असिस्टंट, ⚡ इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन आणि 💄 प्रोफेशनल ब्युटीशियन हे प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.
शिवसेनेचे (उ.बा.ठा.) जेष्ठ नेते, माजी उद्योग मंत्री व प्रबोधन संस्थेचे संस्थापक मा. श्री सुभाष देसाई यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर 🎂 या उल्लेखनीय शैक्षणिक व रोजगार उपक्रमाला सुरुवात झाली.
📍 गोविंद दळवी सभागृह, दुसरा मजला, आरे रोड, गोरेगाव येथील या प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापन व प्रशिक्षणाची जबाबदारी 👉 फादर एग्नेल टेक्निकल अँड आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (AITTED) सांभाळणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून 💼 सुप्रिया लाइफ सायन्स लिमिटेडचे अध्यक्ष व प्रबोधन गोरेगाव या संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सतीश वाघ, तर समारंभाचे अध्यक्ष म्हणून 🌟 मा. श्री सुभाष देसाई यांची उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून 🏛️ ती शिक्षण मंडळ गोरेगावचे कार्याध्यक्ष मा. श्री. गिरीश सामंत, 👨🏫 फादर एग्नेल इन्स्टिट्यूटचे संचालक मा. फादर व्हलेरियन डिसोजा, तसेच प्रशिक्षण विभाग प्रमुख मा. श्री. जयवंत राऊत उपस्थित होते.
🎯 या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नितीन शिंदे, कार्याध्यक्ष मा. श्री कैलास शिंदे व प्रमुख कार्यवाह मा. श्री. गोविंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
🗣️ आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. श्री सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की –
“आज नोकऱ्या नाहीत हा करण्यात येणारा दावा पूर्णपणे खरा नाही, कारण विविध उद्योगात आवश्यक असलेले तांत्रिक कौशल्याने प्रशिक्षित मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. 👷♂️🧑🔧.. प्रबोधन ही संस्था गेल्या अर्धशतकापासून प्रयत्नशील आहे. माझे तरुणांना आवाहन आहे की त्यांनी ध्यास घेतला आणि विविध क्षेत्रातील कौशल्य आत्मसात केले तर बेरोजगारी नावालाही शिल्लक राहणार नाही.” 🚀
🙏 पुढे ते म्हणाले –
“गेली साठ वर्ष महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी तांत्रिक कौशल्य प्रशिक्षणासाठी इन्स्टिट्यूटने दिलेले योगदान कुणीही विसरू शकत नाही. अतिशय सेवाभावाने युवकांना उत्कृष्ट दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण देऊन नोकरी व व्यवसाय या दोन्हीसाठी सक्षम करण्यात फादर एग्नेल इन्स्टिट्यूटचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे प्रबोधन संस्थेच्या दोन्ही प्रशिक्षण केंद्रांची प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून जबाबदारी आम्ही फादर एग्नेल इन्स्टिट्यूटच्या हाती देत आहोत याचे समाधान वाटत आहे.”
📘 फादर अँड इन्स्टिट्यूटचे श्री जयवंत राऊत यांनी आपल्या मनोगतात अॅग्नेल इन्स्टिट्यूटचा ओघवता परिचय उपस्थित त्यांना करून दिला. त्याचप्रमाणे विविध अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देऊन, त्यांना हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्यभराच्या आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी कसे उपयुक्त ठणारे आहेत हे समजावले, तसेच प्रशिक्षण कालावधीत व इंटर्नशिपदरम्यान कोण कोणत्या दक्षता बाळगाव्यात याबाबत विद्यार्थ्यांना अतिशय सुलभ भाषेत त्यांनी मार्गदर्शन केले.
🌟 यावेळी उत्कृष्ट सजावट, निर्मिती व व्यवस्थापनासाठी प्रबोधन संस्थेचे गोरेगाव प्रमुख मा. श्री. शशांक कामत व प्रशिक्षण व्यवस्थापक मा. श्री. भास्कर देसले यांचा सत्कार करण्यात आला.
💬 कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. शशांक कामत यांनी केले.
👥 कार्यक्रमाला फादर आग्नेल इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापक डॉ. प्रणिता पगारे, केंद्र व्यवस्थापक श्री. विनोद गायकवाड, कु. कांचन ओहाळ, श्रीमती श्रद्धा बंदरकर, श्रीमती रूपाली पांडव, श्रीमती गौरी कामडी, श्रीमती माधुरी पडवळ, श्रीमती योगिता देशमुख, श्रीमती अश्विनी पाटील, कु. शिवानी गुप्ता, श्री. भरत वाळींबे, श्री. मनोज भोसले यांच्यासह प्रबोधन कौशल्य विकास केंद्राचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी व विद्यार्थिनींची मोठी उपस्थिती लाभली.