Balrangbhumi Parishad Mumbai

Balrangbhumi Parishad Mumbai बालरंगभूमी परिषद : बालरंगभूमीसाठी कार्य करणारी संस्था

बालकांच्या मनोरंजनासाठी व प्रबोधनासाठी जे काही रंगमंचावर सादर होते ते बालरंगभूमीच्या व्याख्येत येते. नृत्य – नाट्य – गायन – वादन या रंगमंचीय कलांसोबत लहान मुलांना रमवणारे बाहुल्यांचे खेळ, जादूचे खेळ, शॅडो प्ले, जगलरी इ. खेळ बालरंगभूमीच्या कक्षेत येतात. शिक्षण हा बालकांचा अधिकार आहे आणि कलाशिक्षण बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाची गरज आहे. मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या रंगमंचीय कलेचा, खेळांचा प्रचार आणि

प्रसार हे बालरंगभूमी परिषदेचे मुख्य उद्दिष्ट असेल.
बालरंगभूमीशी संबंधित सर्व संस्था, कलावंत, बालकलाकार व बालप्रेक्षकांच्या हितासाठी ‘बालरंगभूमी परिषदेची’ स्थापना झाली आहे. मनोरंजनातून प्रबोधनाचे कार्य प्रत्येक मुलांपर्यंत पोहचवण्याचे कार्य बालरंगभूमी परिषद करणार आहे.

या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग,वंदन करुनिया तयांसी आज..ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण,करुया भारतदेशा असंख्य...
15/08/2026

या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग,
वंदन करुनिया तयांसी आज..
ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण,
करुया भारतदेशा असंख्य प्रणाम
#स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!

14/08/2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या अहिल्यानगरच्या भूमीत पार पडली ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या राज्यस्तरीय स्पर्धेची अत्यंत रंगतदार आणि दिमाखदार महाअंतिम फेरी!
या महाअंतिम फेरीच्या एकल (सोलो) नाट्य सादरीकरण गटात चिमुरड्या बालकलाकारांनी आपल्या प्रभावशाली अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांना भारावून टाकले. डोळ्यात पाणी आणणाऱ्या सादरीकरणांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. अहिल्यादेवींचा इतिहास, त्यांचे शौर्य आणि त्यांनी केलेल्या कार्याची थोर परंपरा या चिमुकल्यांनी ज्या ताकदीने आणि आत्मविश्वासाने जिवंत केली, ते पाहून इतिहासाचे सोनेरी पान पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभे राहिले.
या छोट्या कलाकारांमधील अफाट ऊर्जा आणि त्यांच्या पाठीशी असणारे पालक व शिक्षकांचे कलाप्रेम हेच आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे खरे भवितव्य आहे! 💐👏
#बालरंगभूमीपरिषद #इतिहासमहाराष्ट्राचा #अहिल्यानगर #बालकलाकार

बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती आयोजित ऐतिहासिक 'इतिहास महाराष्ट्राचा' महाअंतिम फेरीच्या यशस्वी सोहळ्याचे विविध प्रतिष्ठित वृ...
11/08/2026

बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती आयोजित ऐतिहासिक 'इतिहास महाराष्ट्राचा' महाअंतिम फेरीच्या यशस्वी सोहळ्याचे विविध प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी घेतलेली दखल आणि केलेले सविस्तर वृत्तंकन! 📰✨

बालकलावंतांच्या गुणवत्तेला आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला मिळालेला हा दैदिप्यमान प्रतिसाद आपल्या सर्वांसाठीच अत्यंत अभिमानास्पद आहे.

#बालरंगभूमीपरिषद #इतिहासमहाराष्ट्राचा

📸 बालरंगभूमी परिषद आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ - महाअंतिम फेरी क्षणचित्रे! ✨
10/08/2026

📸 बालरंगभूमी परिषद आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ - महाअंतिम फेरी क्षणचित्रे! ✨

बालकलाकारांच्या अंगात भिनलेला हा इतिहास आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून संपूर्ण महाराष्ट्र आज अभिमानाने सुखावला आहे. ‘इतिह...
10/08/2026

बालकलाकारांच्या अंगात भिनलेला हा इतिहास आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून संपूर्ण महाराष्ट्र आज अभिमानाने सुखावला आहे. ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या महाअंतिम फेरीत घवघवीत यश मिळवणाऱ्या सर्व विजयी स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎉🏆

कला आणि इतिहासाचा अप्रतिम संगम असलेल्या या महाअंतिम फेरीत आपल्या दमदार अभिनयाने बालकलावंतांनी उपस्थितांचे मन जिंकले. ख्य...
10/08/2026

कला आणि इतिहासाचा अप्रतिम संगम असलेल्या या महाअंतिम फेरीत आपल्या दमदार अभिनयाने बालकलावंतांनी उपस्थितांचे मन जिंकले. ख्यातनाम अभिनेते व तज्ज्ञ परीक्षक संजय हळदीकर (कोल्हापूर), प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे (मुंबई) आणि अभिनेते दिगंबर नाईक (मुंबई) यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

नुकत्याच पार पडलेल्या महाअंतिम फेरीतील विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे:

🎭 एकल गट (वय वर्षे ५ ते १०)
सर्वोत्कृष्ट: सिध्दी सुशील पाटील (बीड)

उत्कृष्ट: स्पृहा वैभव जाधव (बृहन्मुंबई)

उत्तम: जिगीशा किरण आठवे (परभणी)

प्रशंसनीय (१): रियांशी होणकर (लातूर)

लक्षवेधी (१): गार्गी मानकर (छत्रपती संभाजीनगर)

प्रशंसनीय (२): विनिशा विकास बाटुंगे (नंदुरबार)

लक्षवेधी (२): ध्वज विराज मुणोत (अहिल्यानगर)

🎭 एकल गट (वय वर्षे ११ ते १५)
सर्वोत्कृष्ट: सायली जुमडे (अमरावती)

उत्कृष्ट: आर्या अजय हिवाळे (कल्याण)

उत्तम: गार्गी नवलाजी जाधव (लातूर)

प्रशंसनीय (१): साध्वी सागर लाड (परभणी)

लक्षवेधी (१): कौमुदी साल्पेकर (नागपूर)

प्रशंसनीय (२): संबोधी संदीप इंगोले (जालना)

लक्षवेधी (२): विरा चांदोडकर (छत्रपती संभाजीनगर)

🎪 समूह गट
सर्वोत्कृष्ट: इको इम्पॅक्ट फाउंडेशन, गेवराई – बीड

उत्कृष्ट: ज्ञानवर्धिनी, चाकण, पुणे

उत्तम: डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, भिंगार

प्रशंसनीय (१): लोकमान्य टिळक विद्यालय, नंदुरबार

लक्षवेधी (१): सिध्देश्वर विद्यालय, जिंतूर

प्रशंसनीय (२): ज्ञानेश्वर विद्यालय, जालना

लक्षवेधी (२): सह्याद्री विद्यामंदिर, भांडूप

सर्व विजयी बालकलावंतांचे आणि सहभागी संस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🌟💐

बालरंगभूमी परिषद आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ महाअंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात उपस्थित मान्यवरांचा सन्मान करत...
10/08/2026

बालरंगभूमी परिषद आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ महाअंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात उपस्थित मान्यवरांचा सन्मान करतानाचा अत्यंत अभिमानास्पद क्षण! 🏆

आपल्या अमूल्य उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने या बालकलाकारांच्या कलागुणांना अधिकच प्रोत्साहन मिळाले. या ऐतिहासिक सोहळ्याला लाभलेले मान्यवरांचे आशीर्वाद आणि त्यांची साथ म्हणजे आमच्यासाठी ऊर्जास्थान आहे.

📸 सोहळ्यातील काही गौरवोत्सव क्षण... 👇

बालरंगभूमी परिषद आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ महाअंतिम फेरीच्या पारितोषिक वितरणापूर्वी, उपस्थितांच्या आणि लाडक्या बालप्...
10/08/2026

बालरंगभूमी परिषद आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ महाअंतिम फेरीच्या पारितोषिक वितरणापूर्वी, उपस्थितांच्या आणि लाडक्या बालप्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी राष्ट्रीय जादूश्री पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध युवा जादूगार चेतन कुमार यांनी आपल्या अफलातून जादूच्या प्रयोगांनी संपूर्ण सभागृहात जादूची मोहिनी घातली!

लहानच नव्हे तर उपस्थितांच्या चेहऱ्यावरचा हास्य आणि आश्चर्याचे भाव या क्षणांची उत्तम अनुभूती देऊन गेले.

Address

Yashvantrao Chavan Natyasankul, Manamala Tank Road , Matunga
Mumbai
400016

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balrangbhumi Parishad Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Balrangbhumi Parishad Mumbai:

Shortcuts

Share