प्रबोधक महाराष्ट्र

प्रबोधक महाराष्ट्र भारताचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे यासाठी मराठी तरुणांना सज्ज करणे हे प्रबोधकचे ध्येय आहे...

भारताचे प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राने नेतृत्व करावे यासाठी मराठी तरूणाला सक्षम करण्यासाठी हे प्रबोधक चे ध्येय आहे.. यासाठी:

१. मराठी तरूण आयएएस, आयपीएस करून देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय यंत्रणेत मोठया प्रमाणात असावा
२. शासकीय नोकऱ्यांची कास धरून, देशाच्या केंद्रीय यंत्रणेत असावा..
३. मराठी तरुणांनी उद्योग करावेत, उद्योजकीय साम्राज्ये निर्माण करावीत..
४. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक

्षण संस्थांमध्ये तो जावा
५ विविध क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तो चमकावा..

प्रबोधकची उद्दिष्ट्ये:_________________
१. महाराष्ट्रभर करियर केंद्रे आणि उद्योग केंद्र स्थापन करणे
२. युपीएससी च्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्र
३. स्पर्धा परीक्षांची प्रशिक्षण केंद्र
४. इंग्रजी आणि परदेशी भाषांचे प्रशिक्षण
५. शाळेच्या विद्यार्थ्यासाठी संस्कार केंद्र
६ कॉलेजच्या विद्यार्थ्यासाठी उद्योजकता आणि आयएएस
प्रशिक्षण केंद्र
७. उद्योग प्रशिक्षण आणि सल्ला केंद्र
८. राष्ट्रीय शिक्षणसंस्था प्रवेश परीक्षा प्रशिक्षण
९ सांस्कृतिक प्रशिक्षण

प्रबोधक आणि वनशास्त्र महाविद्यालय, दापोली कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने "चंदन लागवड" कार्यशाळा यशस्वी पार पडल...
27/03/2026

प्रबोधक आणि वनशास्त्र महाविद्यालय, दापोली कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने "चंदन लागवड" कार्यशाळा यशस्वी पार पडली.

विद्यापीठातील प्रोफेसर, शास्त्रज्ञ शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात असा अनुभव मला नेहमी आहे. मागच्या मसाला पिके कार्यशाळेत सुद्धा गजभिये सर, भुवड सर आणि टीमचा मला असाच छान अनुभव होता.

यावेळेस सुद्धा वर्षअखेरचे प्रेशर होते, पण कार्यशाळेत कुठलीही कसूर राहिली नाही. वसई पासून सावंतवाडीपर्यंत शेती असलेले पण मुंबईत कामधंद्यासाठी राहणार्‍या, आणि कोकणातील जमिनीवर चंदन घेऊ इच्छिणारे, म्हस्के सरांच्या भाषेत पंधरा अर्बन शेतकरी सहभागी झाले होते.

मेश्राम सरांनी चंदन लागवड या विषयावर घेतलेले पहिले सत्र, लातूर येथील महाराष्ट्र चंदन कृषी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अमोल रोनगे यांचे अतिशय प्रॅक्टिकल सत्र, त्यानंतर म्हस्के सरांचे खैर वृक्ष लागवडीवरील बोनस सत्र, आणि जेवणानंतर दुपारच्या वेळेस नर्सरी आणि मग विद्यापीठाने केलेल्या चंदन लागवडीचे प्रक्षेत्र पाहणी असा अतिशय सुटसुटीत आणि माहितीने आणि प्रत्यक्ष अनुभवाने परिपूर्ण असा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची बांधणीचे आणि व्यवस्थापनाचे काम करणार्‍या शिल्पा राठोड मॅडमचेही आभार!!

प्रशिक्षणार्थीना बरीच माहितीही मिळालीच, उत्साह सुद्धा वाढला. अनेकांनी पहिल्यांदा किंवा खूप वर्षांनी विद्यापीठ पाहिले होते.

मुळात,हीच माझी मनीषा आहे. मुंबईस्थित कोकणवासीयांच्या जमिनी वापरात आल्या पाहिजेत. कोकणात अनेक जमिनी ओसाड पडलेल्या आहेत. त्या वापरात याव्यात. नुसत्या वापरात नाही, तर कोकणला श्रीमंत करणार्‍या पिकांची लागावड झाली पाहिजे.

हळद, मसाला पिके, चंदन, साग, खैर, बांबू ह्या पिकांचा मागोवा आता कोकणात राहणार्‍या शेतकर्‍यांनी आणि मुंबई पुणे स्थित कोकणी माणसांनी घेतला पाहिजे...

असे झाले, तर कोकणचा उत्कर्ष अटळ आहे...

होय महाराजा!!

हर्षद माने
प्रबोधक युथ फेडरेशनन

कोकणी उद्योजकांचा कॅफे...Le Crustique..  Millennia, D.N.Nagar, Andheri West, Mumbai, Maharashtra 400053 मुरुड, अलिबाग मध...
12/01/2025

कोकणी उद्योजकांचा कॅफे...
Le Crustique..

Millennia, D.N.Nagar, Andheri West, Mumbai, Maharashtra 400053

मुरुड, अलिबाग मधील कोकणी उद्योजकांनी Le Crustique हा एक आधुनिक कॅफे अंधेरी येथे सुरु केला आहे. कल्पेश भायदे आणि त्यांचे भागीदार यांनी ही संकल्पना मूर्त रुपात आणली आहे. ओमकार कोळी हे शेफ आहेत.

आधुनिक फास्ट फूड डिशेस, उत्कृष्ट मांडणी आणि सीटिंग अरेंजमेंट यासाठी तुमचा हा चील आऊट पॉइंट होऊच शकतो!!

नक्की भेट द्या....

स्विगी झोमॅटो वरही उपलब्ध...

093720 21514

रिल लिंक कमेंट मध्ये...

कथालेखन स्पर्धा!अभिजात मराठी साहित्यात कथांना विशेष महत्व आहे. मराठी भाषेच्या पुस्तकालयात कथालेखकांना वेगळे स्थान आहे. ह...
20/10/2024

कथालेखन स्पर्धा!

अभिजात मराठी साहित्यात कथांना विशेष महत्व आहे. मराठी भाषेच्या पुस्तकालयात कथालेखकांना वेगळे स्थान आहे. ही परंपरा कायम राहावी, आणि नवोदित कथालेखकांना व्यासपीठ मिळावे यासाठी, मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेऊन आले आहे, कथा लेखन स्पर्धा.

मराठी वाचकांप्रमाणे आम्हालाही विषयाचे बंधन नाही. ललित, गूढ, भय, प्रेम, इतिहास, विज्ञान, मन, प्रणय- कुठच्याही विषयाला स्पर्श करणारी कथा चालेल. कुठल्याही धर्म, पंथ, लिंग, भाषा, व्यक्ती, प्रांत यांची अवहेलना होऊ नये हे सुज्ञ कथालेखकांना सांगणे न लगे!

शब्दांचे मात्र बंधन आहे. कथा १५०० ते २००० शब्दांपेक्षा अधिक विस्तृत नसावी.

प्रवेश फी: नि: शुल्क

पारितोषिके:
प्रथम क्रमांक: ५०००/- रोख आणि प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक: ३०००/- रोख आणि प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक: २०००/- रोख आणि प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ दोन: रु ५००/- रोख आणि प्रमाणपत्र

कथा आधी कुठेही प्रकाशित झालेली नसावी.

याखेरीज महत्वाचे:
संस्थेचा निर्णय झाल्यास, कुठल्याही मानधनाशिवाय, पारितोषिके विजेत्या किंवा इतर कथा पुस्तकरूपात अथवा ऑनलाईन अथवा दोन्ही पद्धतीने प्रकाशित करण्याचे अधिकार संस्थेकडे राहतील. लेखकांचे नाव अर्थात कथेला लागेल, तो तुमचा अधिकार आहे.

आपली कथा [email protected] या ईमेल आयडी वर मेल करावी. हस्तलिखित असेल तर स्कॅन चालेल. मात्र स्कॅन चांगले असावे.

मग आजच लिहायला घ्या...!

अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२४.

मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन.
Mymarathi.in

प्रबोधक आणि कोकण कृषी विद्यापीठ आयोजित दोन दिवसीय मसाला पिके शेती लागवड प्रशिक्षण संपन्नप्रबोधक युथ फेडरेशन आणि कोकण कृष...
28/09/2024

प्रबोधक आणि कोकण कृषी विद्यापीठ आयोजित दोन दिवसीय मसाला पिके शेती लागवड प्रशिक्षण संपन्न

प्रबोधक युथ फेडरेशन आणि कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय मसाला पिके लागवड प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. गुरुवार २६ आणि शुक्रवार २७ सप्टेंबर २०२४ अशा दोन दिवशी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.कोकणातून सत्तर शेतकरी यात सहभागी झाले होते. काही शेतकरी पश्चिम महारष्ट्र आणि मराठवाड्यातूनही आले होते.

डॉ. एस बी थोरात यांनी काळीमिरी या विषयावर पहिले तांत्रिक प्रशिक्षण घेतले. त्यानंतर, डॉ. आर. सी. गजभिये यांनी दालचिनी लागवड, डॉ. ए. व्ही. भुवड यांनी जायफळ लागवड, डॉ. वाय एस सैतवाल यांनी नारळी बागेतील मसाला पिकांची लागवड या विषयांवर तांत्रिक प्रशिक्षणे घेतली. याखेरीज, काळीमिरी, दालचिनी, जायफळ या पिकांची लागवड आणि काळजी या विषयावर प्रात्यक्षिके झाली. दुसऱ्या दिवशी डॉ. पी.सी. माळी यांनी हळद आणि आले लागवड आणि डॉ. एस. एस तोरणे यांनी जायफळापासून कँडी आणि इतर मूल्यवर्निधित पदार्थांची निर्मिती हा विषय प्रात्यक्षिकासहित घेतला. त्यांनतर, कलमबांधणी, काळीमिरीची वेगवान लागवड या विषयावर प्रात्यक्षिके पार पडली.

शेतकऱ्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल व्यक्त केलेल्या मतांमध्ये, अतिशय उत्कृष्ट प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रबोधक युथ फेडरेशन आणि कोकण कृषी विद्यापीठ यांचे आभार मानले. विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञ अतिशय आत्मीयतेने शिकवून शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांचे निरसन करत होते, हीं भावना सर्वच उपस्थित शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

याप्रसंगी काही समस्याही शेतकऱ्यांनी मांडल्या. शासकीय तालुका कृषी खात्यातून योग्य मार्गदर्शन वेळीच मिळाल्यास शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी होऊ शकेल. गावपातळीवर अशी विविध प्रशिक्षणे आयोजित करण्यासाठी शेतकऱ्यांनीच ग्रामसभेकडे आणि पंचायतीकडे मागणी करावी. माकडांची समस्या, रानडूकरांची समस्या यावर शासकीय पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी काही ठोस प्रयत्न केले गेले पाहिजेत यावर अनेकांनी बोट ठेवले. तरुणांनी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थिती लावून कोकणच्या शेतीत रस घेतला पाहिजे ही भावना शेतकऱ्यांची होती, यासाठी प्रबोधकने शालेय विद्यार्थ्यांची सहल विद्यापीठात काढावी अशी स्तुत्य कल्पना शेतकऱ्यांनीच मांडली.

प्रबोधक युथ फेडरेशन चे अध्यक्ष हर्षद माने यांनी प्रशिक्षण देणाऱ्या शास्त्रज्ञांचे आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व मदतनिसांचे आभार मानले, तसेच तुफानी पावसाची चिंता न करता प्रशिक्षणाला एकत्र आल्याबद्दल शेतकऱ्यांचेही आभार मानले.

कोकणात समृद्धी यावी यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोकणातून कृषी माल रोज एपीएमसी मार्केट मध्ये येऊन रिता होईल, तो दिवस पाहणे माझ्यासाठी स्वप्न आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोकणातील तरुण शेती सोडून मुंबईत येतो आणि कमी पगारावर हलाखीत जगतो, याला एक सामाजिक कारण आहे. कोकणातील मुली कोकणातील मुलांशी लग्न करण्यास तयार नसतात, त्यांना आणि त्यांच्या पालकांना मुंबईतील मुलगा हवा असतो. मुलींचा हा हट्ट बदलला तर कोकणातला मुलगा कोकणात राहूनच उत्पन्न कमावेल.

कोकणातील समृद्ध शेतीसाठी मसाला पिके, चंदन, बांबू, वनोपज, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती अशा लागवडीकडे कोकणातल्या शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी वळले पाहिजे. या सर्व विषयांचे प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठात आयोजित करण्याचा प्रबोधकचा मानस श्री हर्षद माने यांनी बोलून दाखवला, तसेच खादी ग्रामोद्योगच्या साथीने विविध उद्योगांचे तांत्रिक प्रशिक्षण कोकणात आयोजित केले जाईल. या सर्व प्रशिक्षण उपक्रमांतून वर्षभरात साडे सातशे उद्योजक आणि पाचशे शेतकऱ्यांना लाभ मिळावा असा प्रबोधकचा प्रयत्न असेल.

हर्षद माने
प्रबोधक युथ फेडरेशन
Prabodhak.in

21/09/2024

दापोली कृषी विद्यापीठात "मसाला पीके शेती" या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गासाठी ९० कोकणवासियांनी नावनोंदणी केली आहे. मुंबई, ठाणे डहाणू पासून कणकवली कुडाळ पर्यंत कोकणवासी यात सहभागी होत आहेत.

केरळप्रमाणे कोकणातही मसाला पिकांची बेटं उभी राहू शकतात. यासाठीच हा अट्टाहास. खड्या मसाल्यांच्या किमती, त्याची आवक तुम्हाला माहिती आहे. कोकणातील नारळी पोफळीच्या बागांमध्ये दालचिनी, काळी मिरी खोऱ्याने उगवली तर व्यापाऱ्यांचा ओढा कोकणात वाढेल, कोकणातून पीक अप एपीएमसी मार्केट मध्ये रित्या होतील यातून, कोकणांत श्रीमंती नांदू लागेल.

ती खरी व्हावी ही कोकणातल्या सर्व ग्रामदेवत, कुळदेवतांचरणी प्रार्थना.

कोकण श्रीमंत होऊ दे...
कोकणचे तरुण कोकणात राहून श्रीमंत होऊ दे..
कोकणच्या श्रीमंतीचा महामार्ग कोकणच्या मातीतून आणि पाण्यातून वाहू दे...

होय महाराजा!!

अलिबागमधील पीएनपी कॉलेजच्या शिक्षकांसाठी 'कोकणातील उद्योग संधी' या विषयावर व्याख्यान झाले. कॉलेजच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट...
16/08/2024

अलिबागमधील पीएनपी कॉलेजच्या शिक्षकांसाठी 'कोकणातील उद्योग संधी' या विषयावर व्याख्यान झाले. कॉलेजच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत हे ट्रेनिंग होते.

शिक्षक हा मुलांना आयुष्याशी जोडणारा, स्पर्श करणारा एक आयुष्यातील महत्त्वाचा दुवा असतो. त्यामुळे मराठी तरुणांमध्ये उद्योजकता वाढवणे काय किंवा युपीएससी आणि राष्ट्रीय परीक्षांबद्दल जागरूकता निर्माण करणे असो, आधी शिक्षकांना जागृत करणे आवश्यक आहे. तर, ते मुलांमध्ये ह्या गोष्टी जशा रुजवतील तशा माझ्या एका दिवसाच्या सेमिनारने होणार नाहीत.

कोकणातून मुंबईत रोजगारासाठी कोकणी माणूस येतो. कोकणात एवढी संसाधने आहेत, त्यातून संधी निर्माण होऊ शकतात, पण तरीही ही संसाधने सोडून कोकणी तरुण मुंबईत का येतो हे एक कोडे आहे. अर्थात त्याची अनेक उत्तरेही आहेत. वर्षानुवर्ष कोकणी तरुण पिढ्यानपिढ्या मुंबईत येत राहिलेला आहे, पण, आजची परिस्थिती वेगळी आहे. विशेषतः रायगड जिल्हा.

पुढच्या दहा वर्षात अलिबाग आणि एकूण रायगड कमालीचे बदलणार आहेत. वीस वर्षांपूर्वी, वाशीचा ब्रीज बनल्यानंतर नवी मुंबईची स्थिती जशी तीनशे साठ अंशांनी पालटली, तसेच काहीसे इथेही होईल. मारवाडी, राजस्थानी ऑलरेडी बाहेरून कोकणांत येऊन वसत आहेत. त्यांची दुकाने कोकणांत गावागावात आहेत. पिढ्यानपिढ्या कोकणांत राहणारे काही गुजराती मारवाडी आहेत, पण, ते कोकणला परप्रांतीय नव्हेत. मात्र, बदलत्या संधी पाहून, पैसे फेकून, जे जमिनी घेत सुटलेत त्यांच्या मागून त्यांचे भाऊबंद, काल एस्टी मध्ये एक पंजाबी, ओडीशी फॅमिली होती. असे जे बाहेरून येत आहेत, ते स्थानिकांना जगणे मुश्कील करणार आहेत. तिथे तुमचे समाजाचे नेते, मराठी नेते कुणी मध्ये येणार नाहीत. इथे स्थानिकांना तारेल फक्त उद्योग. तुमच्या मालमत्ता निर्माण झाल्या नाहीत, तर कोकणातून तुमचे नामोनिशाण नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे १८५३ मध्ये मुंबईतल्या गिरणीत कामाला आलेला कोकणी माणूस आणि आज मुंबईत जाणारा कोकणी तरुण यांच्या परिणामांमध्ये मोठे अंतर आहे.

त्यामुळेच कोकणातल्या उद्योगाच्या संधी दोन्हीं हातांनी तरुणांनी आणि कोकणातील सर्वांनीच उचलल्या पाहिजेत. कोकणात खूप खुप उद्योग करण्यासारखे आहेत, जे केले जात नाहीत. ते करण्यासाठी उद्योजक हवे आहेत.

उद्योगासाठी स्टार्ट अप साठी गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी सज्ज आहेत. ते सध्या गुंतवणूक करत आहेतच. बँकांचे कर्ज ते पाहतही नाहीत. एक सशक्त उद्योग उभा करुन, त्यांच्याप्रमाणेच, आपणही स्टार्ट अप फंड मिळवू शकतो. बँकांची कर्जे आहेतच.

यासाठी कोकणातील तरुणांनी पुढे येणे आवश्यक आहे. कोकणातच राहून उद्योग करणे गरजेचे आहे.

हर्षद माने...
प्रबोधक महाराष्ट्र
Prabodhak.in

कोकणातील उद्योग संधी कोकणात उद्योजकता विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणाला प्रबोधक महाराष्ट्र सुरूवात करत आहे.अलिबाग येथील पी...
16/08/2024

कोकणातील उद्योग संधी

कोकणात उद्योजकता विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणाला प्रबोधक महाराष्ट्र सुरूवात करत आहे.

अलिबाग येथील पीएनपी कॉलेज मध्ये विदयार्थी आणि शिक्षकांसाठी कोकणातील उद्योग संधी या विषयावर व्याख्यान होणार आहे.

असेच कार्यक्रम तिन्ही जिल्ह्यात आयोजित केले जातील.

#कोकण #प्रबोधक

मुंबईकरांनो,  दाखवा... #मतदान करा.... #प्रबोधक
19/05/2024

मुंबईकरांनो, दाखवा...

#मतदान करा....

#प्रबोधक

इंजिनियरिंगच्या मुलांनी नवीन युगासाठी स्वतःला तयार करणे आवश्यक आहे.आयआयटी दिल्ली एक दोन महिन्यांचा अभिनव कोर्स आणला आहे....
16/05/2024

इंजिनियरिंगच्या मुलांनी नवीन युगासाठी स्वतःला तयार करणे आवश्यक आहे.

आयआयटी दिल्ली एक दोन महिन्यांचा अभिनव कोर्स आणला आहे.

Intelligent Automation and IIOT.

२०२२, २०२३, २०२४ मध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि मेकानोत्ट्रिक्स विषयात इंजिनियरिंग केलेल्या किंवा आता चौथ्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स खुला आहे.

दोन महिन्यांत पहिल्या महिन्यात ऑनलाईन लेक्चर्स होतील, तर दुसऱ्या महिन्यात जुलै पासून आयआयटी दिल्लीत कोर्स होईल.

फी ३०,०००+ GST आहे.

महाराष्ट्रातल्या सगळ्या इंजिनियरिंग विद्यार्थ्यांनी अप्लाय करा... मराठी तरुणांनी आयआयटी सारख्या संस्थेत गेले पाहिजे.

नवीन काळातील फॅक्टरी आणि उत्पादनात IIOT आणि Automation महत्त्वाचे असेल. त्याचे मोठे कोर्स करण्यापूर्वी आयआयटी दिल्लीची चव चाखण्यासाठी हा कोर्स करा...हे सर्टिफिकेट सुद्धा खूप मोलाचे असेल...

लिंक 🖇️
www.iafsm.in

तुमच्या इंजिनिअरिंग मित्र मैत्रिणींना पाठवा...

03/05/2024

हा व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्स ऍप वर आला असेल. व्हिडिओतून मिळणारा मेसेज अतिशय सुंदर आहे.

दोन ट्रॅक मधून धावत असलेला शुभ्र अश्व. मागून एक ट्रेन येत होती, समोरूनही ट्रेन आली. तरीही तो दौडत राहिला. तो थांबला असता तर कदाचित बिचकला असता आणि काही दुर्घटना घडली असती. मात्र, त्याने सतत पुढे जाणे कायम ठेवले आणि तो संकटातून सहीसलामत बाहेर पडला.

आयुष्यातील काही क्षण असेच असतात. आजूबाजूला खूप कोलाहल होत असतो. पण, आपण जे करतो आहोत ते करत राहिले पाहिजे. संकट येते आणि निघून जाते.

अर्थात् इथे हेही महत्त्वाचे आहे, की घोड्याला संकटाची पूर्ण माहिती होती आणि त्याने घेतलेली रिस्क calculated होती.

कर्म करा.. फळ आपसूक येते...

महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!प्रबोधक महाराष्ट्र ll महाराष्ट्राची सिंहगर्जना घुमू दे ll👉 ...
01/05/2024

महाराष्ट्र दिनाच्या आणि
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

प्रबोधक महाराष्ट्र
ll महाराष्ट्राची सिंहगर्जना घुमू दे ll

👉 Prabodhak.in

#महाराष्ट्र
#प्रबोधक

महाराष्ट्रातल्या मुलांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी....इंडस्ट्री 4.0प्रबोधक महाराष्ट्र उपक्रम.शाळांमध्ये ✓ रोबोटिक्स लॅ...
25/04/2024

महाराष्ट्रातल्या मुलांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी....

इंडस्ट्री 4.0
प्रबोधक महाराष्ट्र उपक्रम.

शाळांमध्ये
✓ रोबोटिक्स लॅब तयार करून
✓ ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण...

आपल्या शाळेत लॅब सेट करण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी संपर्क साधावा.
हर्षद माने ९९६७७९६१५०

Industry 4.0

Address

Jogeshwari
Mumbai
400060

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रबोधक महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to प्रबोधक महाराष्ट्र:

Share