Prabodhankar Thackeray Vachnalaya

Prabodhankar Thackeray Vachnalaya वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारी असे एकमेव वाचनालय 'प्रबोधनकार ठाकरे वाचनालय'

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||सर्वांना महाशिवरात्रीच्या मन...
26/02/2025

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्,
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||

सर्वांना महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! या मंगलदिनाच्या निमित्तानं भगवान शंकरांचा आशीर्वाद तुमच्यावर व तुमच्या परिवारावर सदैव राहो, सर्वांचं जीवन नवचैतन्यानं भरभरून जावो, हीच प्रार्थना.

#महाशिवरात्री

ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस *२७ फेब्रुवारी* रोजी *”मराठी भाषा गौरव दिन”* म्हणून साजरा के...
22/02/2025

ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस *२७ फेब्रुवारी* रोजी *”मराठी भाषा गौरव दिन”* म्हणून साजरा केला जातो. या गौरव दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे प्रबोधन संचालित, प्रबोधनकोर ठाकरे वाचनालयाने गुरूवार, *दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी, संध्या. ६.०० वाजता*, प्रबोधन जॉगर्स पार्क येथे, कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने *कवितांच्या* *राशी* हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला *कवी, लेखक, विज्ञाननिष्ठ ज्योतिष अभ्यासक, पत्रकार, डॉ.* *संदीप* *अवचट* हे वक्ते म्हणून लाभले आहेत. यावर्षी अभिजात मराठी भाषेचा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यासाठी आपली उपस्थिती वंदनीय आहे.

मुलांना समजेल अशा भाषेत मुलांच्यासाठी साहित्य निर्माण करणे गरजेचे. सविता पटेकर गैरहजर, सविता पटेकर गैरहजर, या त्यांच्या ...
22/02/2025

मुलांना समजेल अशा भाषेत मुलांच्यासाठी साहित्य निर्माण करणे गरजेचे.
सविता पटेकर गैरहजर, सविता पटेकर गैरहजर, या त्यांच्या नावाजलेल्या कवितेने आव्हाड यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रबोधन गोरेगाव संचालित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या “प्रबोधन व्यासपीठ” या कार्यक्रमात बालसाहित्यिक, साहित्यातील प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, कवी एकनाथ आव्हाड यांच्याशी “कथा कवितांच्या राज्यात” या विषयावर विदया प्रभु यांनी संवाद साधला. त्यावेळी मुलांना समजेल अशा भाषेत मुलांच्यासाठी साहित्य निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आव्हाड यांनी केले.
मुलांना अभ्यासाची गोडी लागावी, मुंबई महानगर पालिकेत शिक्षक म्हणून नोकरी करताना त्यांना आलेले अनुभव व त्या अनुभवातूनच कविता कशा आकार घेतात. हे खरेच त्यांच्या तोंडून ऐकण्यासारखे होते. त्यांच्या दिल्ली ते दापूर हा प्रवास त्यांनी श्रोत्यांपर्यत उलघडून दाखविला. त्या कविता ऐकताना जणू त्यांच्या तोंडून कवितांचा झराच वाहतो आहे असे वाटत होते. द. मा. मिरासदार यांची विनोदी कथा श्रोत्यांसमोर सादर केली. श्रोतेही त्यांना टाळ्या वाजवून दाद देत होते. हाच मोठा कोणत्याही लेखकासाठी मोठा पुरस्कार असतो. असे मत त्यांनी मांडले.
तत्पूर्वी प्रबोधनचे सल्लागार सदस्य अùड. विकास रेळे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.मनोहर अद्वानकर यांच्या हस्ते पाहुण्यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष कैलास शिंदे, सल्लागार सदस्य पांडुरंग पोखरकर उपस्थित होते. या प्रकारे गोविंद येतयेकर यांच्या मार्गदर्शनखाली कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ठ करण्यात आले.

निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू।अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी ...
19/02/2025

निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवजयंती निमित्त त्रिवार वंदन व मानाचा मुजरा!!

#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज #प्रबोधन

 #काळा_दिवस14 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीर मधील  #पुलवामा येथे झालेल्या भ्याड आतंकी हल्ल्यातील भारताच्या सीआरपीएफच्या शह...
14/02/2025

#काळा_दिवस

14 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीर मधील #पुलवामा येथे झालेल्या भ्याड आतंकी हल्ल्यातील भारताच्या सीआरपीएफच्या शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली!

07/02/2025
'*प्रबोधन गोरेगाव' संचालित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित '*समाजसेवक उद्योगपती निळकंठ उर्फ भाईसाहेब सावंत स्मृती मराठी ...
01/02/2025

'*प्रबोधन गोरेगाव' संचालित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित '*समाजसेवक उद्योगपती निळकंठ उर्फ भाईसाहेब सावंत स्मृती मराठी कथाकथन स्पर्धा-२०२५*'

*स्पर्धा नियमावली आणि माहिती*

*'कथाकथन'* या सादरीकरणास उत्तेजन मिळावे या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

१) *ही स्पर्धा मुंबई (शहर व उपनगरे) , ठाणे , पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतील वय ३५ ते ६५ वर्षे वयोगटातील सर्वांसाठी खुली आहे.*

२) स्पर्धेसाठी रु. २००/- (जीएसटीसह) प्रवेश शुल्क आहे. प्रवेश शुल्क UPI ने संस्थेच्या खालील मोबाईल क्रमांकावर भरून त्याचा संदर्भ प्रवेश अर्जामध्ये द्यावा.

*Paytm UPI मोबाईल क्रमांक*:-
7506760676

*क्यूआर कोड स्कॅनर सोबत जोडला आहे.*


३) या स्पर्धेत प्राधान्य तत्त्वावर प्रथम नोंदणी करणा-या १०० स्पर्धकांची नोंद केली जाईल. प्रबोधन गोरेगावची कार्यकारिणी स्पर्धकांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून त्यातील ६० नावे काढून त्यांना सहभागाबद्दल कळवतील. या ६० स्पर्धकांनाच स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेच्या वेळापत्रकाच्या मर्यादेमुळे यावर्षी ही पद्धत अवलंबिण्यात येणार आहे.

४) कथेसाठी विषयाचे बंधन नसले तरी ती सद्भिरुचीहीन नसावी.

५) *विनोदी कथांना उत्तेजन मिळण्याच्या उद्देशाने पारितोषिक विजेत्या पहिल्या तीन क्रमांकामध्ये कथन केलेली कथा जर स्पर्धकाची स्वलिखित विनोदी कथा असेल तर सदर स्पर्धकाला किंवा स्पर्धकांना अतिरिक्त रू. ३०००/-चे स्वतंत्र 'विशेष कौशल्य पारितोषिक दिले जाईल.*

६)) कथा मराठीतच हवी परंतु आशयासाठी आवश्यक तेवढेच अन्य भाषांतील शब्द वापरण्यास हरकत नाही.

७ ) कथा स्वयंलिखित किंवा अन्य लेखकाची आणि अनुवादित देखील चालेल.

८) *कथा मुखोद्गत असलीच पाहिजे. लिखित मजकूराचा आधार घेता येणार नाही आणि तसे आढळल्यास त्यास थांबविण्यात येईल व संबंधित स्पर्धक स्पर्धेबाहेर जाईल.*

९) स्पर्धेसाठी नोंदणी खाली दिलेल्या ई-मेलवरच करावी.
अन्य कोणत्याही प्रकारे नोंदणी घेतली जाणार नाही.

१०)नोंदणीत स्पर्धकाने पुढील माहिती क्रमशः देणे आवश्यक आहे :--

अ) स्पर्धकाचे नाव:-
ब) वय:-
क) मोबाईल क्रमांक:-
ड) निवासाचा पत्ता:-
इ) कथेचे शीर्षक:-
फ) कथा लेखकाचे नाव:-
भ) कथा स्वलिखित असल्यास स्पर्धकाचे तसे विधान:-
म) स्पर्धेची नियमावली मान्य असल्याची प्रतिज्ञा.

११)कथेचा मजकूर पाठवू नये.

१२) स्पर्धेसाठी येताना स्पर्धकाने स्वतःच्या निवासाचा व वयाचा दाखला आणणे अनिवार्य आहे.

१३)स्पर्धक स्पर्धेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहील. .

१४) अन्य लेखकाची कथा सांगण्यासाठी कोणतीही परवानगी आवश्यक असल्यास

Come one!!!!!!!Come all for developing swimming skills and activities.We are starting advance learn to swim weekend batc...
13/01/2025

Come one!!!!!!!
Come all for developing swimming skills and activities.
We are starting advance learn to swim weekend batches from 1st Feb 2025.
Requesting to enroll as early as possible.
The details are as mentioned below.



#मीगोरेगावकर

Come one!!!!!!!come all for developing swimming skills and activities.we are starting advance learn to swim weekend batc...
13/01/2025

Come one!!!!!!!come all for developing swimming skills and activities.we are starting advance learn to swim weekend batches from 1st Feb 2025. Requesting to enroll as early as possible. The details are as mentioned below.

आज,प्रबोधनकार ठाकरे वाचनालय,गोरेगाव येथील वाचनालयामध्ये "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या उक्रमाअंतर्गत महाराष्ट्र विद्यालय...
09/01/2025

आज,प्रबोधनकार ठाकरे वाचनालय,गोरेगाव येथील वाचनालयामध्ये "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या उक्रमाअंतर्गत महाराष्ट्र विद्यालय,गोरेगाव येथील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांची ,
"ग्रंथालय सफर," घडवून आणण्यात आली.मुलांना ग्रंथालयाची माहिती देऊन,पुस्तकांची रचना कशी असते,शाळेतील प्रोजेक्ट साठी उपलब्ध असणारी पुस्तके त्यांना दाखविण्यात आली,सभासद नाव नोंदणीसाठी आई वडीलांना घेऊन येण्यास सांगितले,वाचनालय माहिती पत्रक वाटण्यात आली, मुलांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देण्यात आली.काही वेळा करिता मुलांनी आपल्या आवडीची पुस्तके निवडून वाचन केले.शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

नाताळ म्हणजे आनंदाचा सण, प्रेमाचा उत्सव, आणि आपल्या माणसांसोबत घालवलेला हळवा क्षण!या पवित्र सणाच्या निमित्ताने आपल्या जी...
25/12/2024

नाताळ म्हणजे आनंदाचा सण, प्रेमाचा उत्सव, आणि आपल्या माणसांसोबत घालवलेला हळवा क्षण!
या पवित्र सणाच्या निमित्ताने आपल्या जीवनात आनंद, शांती, आणि भरभराटीचा प्रकाश पसरू दे.

सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! 🌲🎁

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. तुम्हा सर्वांना या दिवाळीच्या निमित्ताने समृद्ध...
29/10/2024

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. तुम्हा सर्वांना या दिवाळीच्या निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो ही शुभेच्छा. धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

#धनत्रयोदशी

Address

Joggers Park, Sidharth Nagar, Road No2, Goregaon (west)
Mumbai
400104

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabodhankar Thackeray Vachnalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Prabodhankar Thackeray Vachnalaya:

Share