25/02/2026
सन १९७८ मध्ये स्थापन झालेल्या प्रयोग मालाड संस्थेने गेली ४८ वर्षे ज्ञान, सेवा, क्रीडा आणि कला ही उद्दिष्टे समोर ठेऊन मुंबई उपनगरात आपला ठसा उमटवला आहे.
प्रयोग मालाड संस्थेने एप्रिल ते जून २०२४ आणि जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत रामकृष्ण गाडगीळ समर्पित प्रायोगिक नाटय-पर्व या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमांतर्गत प्रयोग मालाडतर्फे दर महिन्यात एक प्रायोगिक नाटक प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली येथे दाखविण्यात आले.
रंगभूमीवर सुरू असलेल्या मुंबई/पुणे येथील सर्वोत्तम १२ प्रायोगिक नाटकांची या नाट्यपर्वासाठी निवड केली गेली. ती नाटकं रसिकांपर्यंत पोहोचावीत, नवा प्रेक्षक घडावा व प्रायोगिक नाटक करणाऱ्या रंगकर्मींना बळ मिळावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमासाठी प्रायोगिक नाटकांसाठी असलेली एकमेव 'प्रेक्षक सभासद योजना' राबविली गेली.
या योजनेत १३७ प्रेक्षकांनी सभासदत्व नोंदविले. त्याचप्रमाणे प्रयोगा आधीच्या तिकीट विक्रीमुळे एक जाणकार, रसिक प्रेक्षक प्रयोग मालाडच्या प्रायोगिक नाट्य चळवळीत सहभागी झाला याचा आम्हाला आनंद आहे.
रामकृष्ण गाडगीळ समर्पित प्रायोगिक नाट्य पर्व -
पर्व पहिले (गोषवारा)
https://drive.google.com/file/d/1PAB4v1dKany1WH0K6JHGPuaq0AudmE5A/view?usp=sharing
रसिक प्रेक्षकांच्या आग्रहानुसार प्रयोग मालाड संस्थेतर्फे रामकृष्ण गाडगीळ समर्पित प्रायोगिक नाट्य पर्व या उपक्रमाचे 'दुसरे पर्व' एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत आयोजित केले जाणार आहे.
सभासदत्व :
रसिक प्रेक्षकांनी प्रायोगिक नाट्य पर्वाचे सभासदत्व नोंदविण्यासाठी www. prayogmalad.org या संकेत स्थळावर भेट द्यावी.
सभासदत्व शुल्क : ₹ २,०००/- (१२ प्रायोगिक नाटके)
UPI द्वारे शुल्क भरताना प्रयोग मालाड संस्थेचा QR Code download करू शकता
विशेष सभासदत्व :
या वर्षी प्रयोग मालाड एक "विशेष" सभासदत्व सुरू करीत आहोत
विद्यार्थी सभासदत्व : ₹ १,०००/- (१२ प्रायोगिक नाटके)
नोंदणी दरम्यान शाळा/ महाविद्यालयाचे ओळखपत्र अपलोड करणे बंधनकारक असेल.
नवीन तरुण पिढीला प्रायोगिक नाटकांची ओळख व्हावी हाच एकमेव उद्देश.
देणगी :
तसेच प्रयोग मालाड संस्थेच्या या प्रायोगिक नाट्य चळवळीला हातभार लावण्यासाठी देणगीसुद्धा या संकेत स्थळावर नोंदणीकडून देऊ शकता.
शुभारंभ :
प्रयोग मालाड आयोजित रामकृष्ण गाडगीळ समर्पित प्रायोगिक नाटय-पर्व - पर्व दुसरे या उपक्रमाचा शुभारंभ रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता जयवंत दळवी लघुनाट्यगृह, ४ था मजला, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली पश्चिम. पहिल्या प्रयोगाने होणार आहे.
सभासदत्व नोंदविण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२६ ही आहे.
त्वरा करा :
लघुनाट्यगृहाची आसन क्षमता केवळ २०० आसने असल्यामुळे आपण त्वरित नोंदणी करून आपले सभासदत्व आरक्षित करावे, ही विनंती !!
प्रायोगिक नाट्य चळवळीत आपले स्वागत आहे !!