08/02/2026
गडकोट-ध्यास संवर्धनाचा
११ वा वर्धापन दिवस 🚩🚩
!!ध्यास धरुनी गडसंवर्धनाचा,
करूया जागर श्री छत्रपतींचा!!
महाराष्ट्राच्या मातीला शौर्याचा आणि बलिदानाचा सुगंध आहे, हा सुगंध आजही दरवळत आहे तो इथल्या गडकिल्ल्यांच्या रूपाने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साक्षीदार असलेले हे किल्ले काळाच्या ओघात ढासळत असताना, त्यांना सावरण्यासाठी काही हात पुढे आले. व 'ध्यास' घेतला तो संवर्धनाचा आणि जन्म झाला एका चळवळीचा - "गडकोट -ध्यास संवर्धनाचा "
अंगात शिवरायांचे विचार भिनवून केवळ गड किल्ले फिरणे हा उद्देश न ठेवता गडावरील लुप्त होत चाललेला इतिहास आपल्या खांद्यावर सावरत त्या वास्तूंचे जतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजवर करत आलो.
त्यासोबतच रहाळ परिसरात असलेले शिलालेख, वीरगळ व इतर ऐतिहासिक वास्तूंच्या जतन व संवर्धनासाठी ही आपण प्रयत्नशील आहोत.
दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी साहित्य पुरवणे, शाळांना मदत करणे हे कार्य सुद्धा आपण कर्तव्य समजून आजवर करत आलोय.
आपल्या पूर्वजांच्या खानाखुणा पुढच्या पिढीपर्यंत जिवंत स्वरूपात पोहोचाव्यात हाच ध्यास घेऊन पुढे असेच निरंतर चालत राहू..
सर्वांना वर्धापन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा 💐💐
#गडकोट🚩