13/05/2026
अथांग समुद्रात अविरत ४९ तास ४४ मिनिटे ०४ सेकंद पोहत तब्बल २१० किलोमीटरचे अंतर पार करणाऱ्या युवा जलतरणपटू आर्यन सिंग दादियाला याने जिद्द, चिकाटी आणि धैर्याचा आदर्श प्रस्थापित केला आहे.
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या भावनेतून त्यानं ही मोहीम हाती घेतली होती, ही बाब मनाला भावनिक करणारी आहे. आर्यननं आज माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्याच्या या अद्वितीय कामगिरीचे मनापासून कौतुक केले, अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. आर्यनची ही जिद्द, त्याग आणि दादांप्रती असलेली आदरभावना नक्कीच प्रेरणादायी आहे.