Ambedkar Centre For Justice & Peace

Ambedkar Centre For Justice & Peace International Human Rights Organization

20/02/2026
We Are Because He Was.Remember Our Emancipator.Great Personality Our Ideal Dr. B. R. Ambedkar Grand Salute on Their Deat...
06/12/2025

We Are Because He Was.
Remember Our Emancipator.
Great Personality
Our Ideal

Dr. B. R. Ambedkar

Grand Salute on Their Death Anniversary

16/11/2025
15/11/2025

पुण्यातील कोथरूड येथे तीन मागासवर्गीय मुलींना पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि शारिरीक हिंसाचार केल्याची धक्कादायक घटना ३ महिन्यांपूर्वी घडली होती.

दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी या तरुणींनी धरणे, आंदोलनं केली मात्र गुन्हा दाखल झाला नाही. उलट त्या मुलींवरच पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

शेवटी वंचित बहुजन आघाडीचे नेते, कार्यकर्ते तसेच समाजसेवक आणि वकील यांनी कोर्टात धाव घेतली. मा.पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने याप्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, आणि त्यानुसार आज अखेर आठ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरूड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, कर्मचारी श्रुती कडणे, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे, महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, हवालदार विनोद परदेशी, सायबर पोलीस विभागाचे धनंजय सानप आणि माजी पोलीस अधिकारी सखाराम सानप यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार, अरविंद तायडे, ॲड. परिक्रमा खोत, समाजसेविका श्वेता पाटील यांनी हे प्रकरण लावून धरले.

#कोथरूड

13/11/2025

नवी मुंबई येथे जातीय मानसिकतेतून बौद्ध तरुणावर अत्याचार; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली पीडितांची भेट

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका बौद्ध तरुणावर अमानुष अत्याचार करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ऐरोली सेक्टर 1 येथील छत्रपती रहिवासी चाळ परिसरात जातीय मानसिकतेतून बौद्ध समाजातील सुनील जाधव यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

रोहित महाजन, त्यांची पत्नी स्वाती महाजन आणि विशाल महाडिक असे आरोपींचे नाव आहे. या तिघा आरोपींनी एकत्र येऊन जाधव यांना मारहाण केली. तसेच बरदस्तीने त्यांच्या पायावर नाक घासायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तुमच्या जयभीम वाल्यांची लायकी हीच आहे” असे म्हणत अंधारात ओढत नेऊन मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी, नवी मुंबई जिल्हा कमिटीने तातडीने हालचाल केली. जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप आणि महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पिडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या मनोबलात भर घातली.

“वंचित बहुजन आघाडी ठामपणे तुमच्या सोबत आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहू,” अशी ग्वाही त्यांनी कुटुंबाला दिली. दरम्यान, या प्रकरणात रबाळे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 115(2), 352, 351(2), 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

मात्र, आरोपी अद्याप फरार असून अटक करण्यास पोलिस विलंब करत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. “आरोपींची तात्काळ अटक व कठोर शिक्षा होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही,” असा इशारा जिल्हाध्यक्ष जगताप व रणदिवे यांनी दिला.

या भेटीदरम्यान कविता हिवाळे, मायाताई मनवर, संदीप वाघमारे, मल्लिनाथ सोनकांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

13/11/2025

पुण्यामध्ये पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंद व्हावा, अशी मागणी करणाऱ्या मुलींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

29/10/2025

*🔴 पोलिसांची तक्रार कोठे आणि कशी नोंदवावी.?*
*✍️ लेखक : कामेश घाडी*

*🟠 लोकशाहीत पोलिसांचं उत्तरदायित्व का महत्त्वाचं आहे*

लोकशाहीत पोलिस हे जनतेच्या सुरक्षेसाठी असतात, भीती दाखवण्यासाठी नाही.
परंतु काहीवेळा काही पोलिस अधिकारी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करतात – अशा वेळी नागरिकांनी गप्प बसू नये.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांविरुद्ध तक्रारींचं निवारण करण्यासाठी स्वतंत्र पोलिस तक्रार प्राधिकरण (Police Complaints Authority) स्थापन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र हे असे प्राधिकरण स्थापणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

*⚖️ पोलिसांविरुद्ध तक्रार करता येणाऱ्या बाबी*

1. धमकी देणे किंवा जबरदस्ती करणे.

2. अधिकारांचा गैरवापर किंवा खोटे गुन्हे दाखल करणे.

3. पोलिस कोठडीत मृत्यू होणे.

4. लाच, खंडणी किंवा भ्रष्टाचार करणे.

5. दाखलपत्र (FIR) नोंदवण्यास नकार देणे.

6. मारहाण, अत्याचार, अपमान किंवा छळ करणे.

7. जमीन/घर बळकावणे किंवा जबरदस्तीने सही घेणे.

8. विनाकारण अटक किंवा कोठडी देणे.

9. बलात्कार किंवा त्याचा प्रयत्न करणे.

10. राजकीय दबावाखाली तपास करणे.

11. तपासात जाणूनबुजून विलंब करणे.

12. स्त्रियांशी किंवा दुर्बल घटकांशी अनुचित वर्तन करणे.

*🏛️ तक्रार नोंदवण्याचे अधिकृत मार्ग*

*🔹 १. राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण (Mumbai)*

*📍 पत्ता:*
अध्यक्ष, राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण
४ था मजला, कुपरेज टेलिफोन एक्सचेंज इमारत,
महर्षी कर्वे रोड, नरिमन पॉईंट, मुंबई – 400021
📞 दूरध्वनी: 022-22820045 / 46 / 47
📧 ई-मेल: [email protected]

➡️ अध्यक्ष : ए. व्ही. पोद्दार (निवृत्त न्यायाधीश)
➡️ सदस्य : आर. आर. सोनकुसरे, प्रेम किशन जैन, रामाराव

या प्राधिकरणाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले असून, ते साक्षीदारांना समन्स पाठवू शकतात, तपास करू शकतात आणि प्रतिज्ञापत्रावर साक्ष घेऊ शकतात.

*🔹 २. विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण (औरंगाबाद)*

*📍 पत्ता:*
साई ट्रेड सेंटर (पहिला मजला), रेल्वे स्टेशन चौक,
छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) – 431001
📞 फोन: 0240-2991235

*🔹 ३. इतर पर्याय*

✅ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB)
✅ राज्य मानवाधिकार आयोग
✅ भारतीय दंड संहिता कलम 166 ते 171 अंतर्गत गुन्हा दाखल करणे
✅ स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल करणे
✅ RTI द्वारे संबंधित तपशील मागवणे

*📄 तक्रार देताना लक्षात ठेवा*

तक्रारीसोबत खालील माहिती अवश्य द्या –
👉 आपले नाव, पत्ता व संपर्क क्रमांक
👉 घटनेची तारीख व ठिकाण
👉 जबाबदार पोलिस अधिकारी/कर्मचारी यांचे नाव
👉 पुरावे (फोटो, व्हिडिओ, साक्षीदारांचे तपशील)
👉 ओळखपत्राची झेरॉक्स

*⚖️ कायदेशीर अधिकार*

राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाला तपास आदेश देण्याचे, साक्षीदारांना बोलावण्याचे आणि कारवाईसाठी शिफारस करण्याचे अधिकार आहेत.
जर विभागाने कारवाई केली नाही तर प्राधिकरणाला त्याबाबत लेखी स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार आहे.

*🗣️ आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन चं आवाहन*

👉 अन्याय सहन नका करू —
तक्रार करा, तुमचा हक्क जपा.

*👉 RTI Human Rights Activist Association नागरिकांच्या हक्कांसाठी सतत कार्यरत आहे.*
भ्रष्टाचार, अन्याय आणि अधिकारांचा गैरवापर थांबवण्यासाठी कायदेशीर मार्गाने आवाज उठवा.

*ब्लॉग लिंक :* https://rtihumanrightsassociation.com/where-to-register-a-complaint-against-the-police/

*📞 संपर्कासाठी*
🌐 www.rtihumanrightsassociation.com
📧 [email protected]

*✍️श्री. कामेश घाडी*
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन, रिडबुक फाउंडेशन
संपादक : आरटीआय टाइम्स

=============================
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट करा आणि कॉपी-पेस्ट करून वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त व्हायरल करा. तसेच, कायदेविषयक आणि इतर उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा.
==============================
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
RTI Human Rights Activist Association

Member Registration From link / सदस्य नोंदणी लिंक -
https://rtihumanrightsassociation.com/join-us/

👉 FOLLOW US :
• Website : www.rtihumanrightsassociation.com

• page : https://www.facebook.com/RTIHumanRightsActivistAssociation

• WhatsApp Chanel link :
https://whatsapp.com/channel/0029VaAfrskL2AU7Eb0XOj2Q

• Facebook Group : https://www.facebook.com/groups/RTIhumanrightsAssociation

• Instagram : https://www.instagram.com/rtihumanrightsassociation

• Twitter : https://twitter.com/RTIHumanRights

• Teligram Group : https://t.me/RTIHumanrights

• Telegram Channel : https://t.me/RTIHumanrightsAssociation
=============================








Address

Arm Enclave A 107 Kharghar Sector 7 Navi Mumbai
Mumbai
410210

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ambedkar Centre For Justice & Peace posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ambedkar Centre For Justice & Peace:

Share