नमस्कार, जय हिंद!
•आधार फाउंडेशन चरित्र | BIOGRAPHY•
।। "निश्चयाचा महामेरु । बहुतजनासी आधारु"।।
*आधार बहुउद्देशीय सेवा संस्था*
*रजि. नं. MH,MUMBAI- 3484, 2010 G.B.B.S.D)*
"आधार हा संस्कृत शब्द आहे" ज्याचा अर्थ 'पाया' किंवा 'बेस' असतो. आधार ही डिसेंबर ०८ सन २०१० मध्ये स्थापित झालेली एक अव्यावसायिक / बिगर-सरकारी संस्था आहे जी -मुळ- स्तरीय देव | देश| धर्म | निसर्गाचा कायदा पर्यावरणाचा
- समतोल, साहित्य - संस्कृति - कला, स्वराज्यातील गड - किल्ले - लेण्या पुरातन वास्तू, तथा "पंचमहाभूतांना" जोपासत, गावाचे सांस्कृतिक मूल्य जपत ग्रामीण विकासाला आधार देते.
याची सुरुवात वेस्टन मुंबई शहरातील , गोरेगाव पूर्व , संतोष नगर मधील 'गुरुकुल विद्यालय' या मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या व पुढे पदव्युत्तर झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांने कॉलेजमधील एनएसएस कॅम्प दरम्यान लाभलेल्या श्रम संस्कारातून पुढे जाऊन स्वतःच्या स्वप्नपुर्तीतून केली होती. आधार म्हणून आमचा विश्वास आहे की देशाची आर्थिक प्रगती तेव्हाच होईल जेव्हा सर्व स्तरांवर जातीविहीन शिक्षण, आरोग्य, आणि नोकरी- व्यवसाय साठी आत्मनिर्भरतेतून सामाजिक प्रगती होईल. एकसमान सामाजिक विकासामुळे गरिबी, निरक्षरता आणि आजच्या भारतीय समाजात पीडित असलेल्या जातीविहीन आणि भ्रष्टाचार सारख्या इतर आजारांचा नाश होऊ शकतो |
तथापि आधार फाउंडेशन ऑर्गनायझेशनचे संस्थापक, श्री बी. किरण विश्वनाथ यांचे संचालित...
१) "छत्रपती अनुशासन" प्रकल्प (योजना) अंतर्गत , गाव पुनर्वसन आणि दुर्ग-संवर्धन द्यास | (समृध्द गाव योजना)
संदर्भ: पर्यावरणीय संतुलन राखून गावाचा शाश्वत विकास हा या योजनेचा मूळ उद्देश आहे या योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत.
पर्यावरण समतोल राखण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करणे व त्यासाठी लोकसहभाग मिळविणे.
पर्यावरणाचे भान ठेऊन भौतिक सुविधा उपलब्ध करणे व इको व्हिलेजची संकल्पना राबवून समृध्द ग्राम निर्माण करणे.
यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या ग्रामस्तरीय विविध योजनांची सांगड घालून योजनांचा समन्वय करणे व जेथे ही संकल्पना राबविण्यासाठी नव्या योजनांची, कार्यक्रमांची गरज आहे, ती पोकळी भरण्यासाठी तसे कार्यक्रम/योजना ग्रामविकास विभागामार्फत कार्यान्वित करणे.
मोठया ग्रामपंचायतींना विकास केंद्र म्हणून विकसीत करणे.
आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे गावामधून मोठ्या संख्येने होणारे स्थलांतर थांबवून, ‘खेड्याकडे चला,’ गांधीजींनी दिलेल्या या हाकेला जागात गाव खऱ्या अर्थाने समृद्ध बनविणे.
२) भारतात पुन्हा एकदा गुरुकुल शिक्षण पद्धती विकसित करून ती लागू करणे, गुरुकुलम् ची स्थापना करणे |
३) मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा | नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने तयार करून वैद्यकीय शाळेची स्थापना |
४) देशी गाईंचे महत्त्व लक्षात घेऊन (गाई पासून तयार होणाऱ्या सर्व वस्तूंची विक्री) महा गोशाळा प्रकल्पाची स्थापना |
५) अनाथ तथा बेघरांना आश्रय देण्यास आधार आश्रमाची स्थापना |
६) शेतकऱ्यांस नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचे धडे देण्यासाठी १०० % विष मुक्त, सेंद्रिय शेतीच्या प्रकल्पाची स्थापना |
७) शेतकऱ्यांच्या "काळ्या मातीत उगवलेले हिरवे सोने" (मालास) जगात बाजारपेठ निर्माण करून देने | देश - विदेशात मालाच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट विक्री वर भर देने | ( सर्वांस पोटास लावणे या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेला चालना देणे )
८) बचत गटा अंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय आणि आणि लघु - मोठ्या गृह उद्योगांची निर्मिती करून देणे, वस्तू विकण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ निर्माण करून देणे बाबत कार्यशाळेची स्थापना |
९) जगात भारताला शांतीदूत म्हणून आपली छाप पाडण्यासाठी ध्यान, योगा तसेच मेडिटेशन सेंटर उभारून धम्मा तथा शांतिदूत तयार करणे |
१०) जल व्यवस्थापन वन व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे अनोखे व्यवस्थापन अंतर्गत कार्य करणे |
ही यंत्रणा राबविणारी ऑर्गनायझेशन बरोबर नियोजपूर्वक, ग्रामसभागातून कार्य करून स्व :कार्यातून जगभर संस्थेच्या "छत्रपती अनुशासन" पॅटर्न दरम्यानची विशिष्ट ओळख पटवणे, ज्याचा लाभ पुढील दोनशे वर्षापर्यंत देश वासियांना घेता येईल |
११) जे शहर - गाव : गड किल्ले (पुरातन वास्तू) यांनी नटलेले आहे अशा ठिकाणाला पर्यटन पॅटर्न तयार करून तेथील स्थायिक नागरिकांना, तरुण तरुणीं यांस.. त्या ठिकाणी पर्यटन रोजगार निर्माण करणे |
१२) भारतभर आपत्कालीन रक्त पुरवठा सेवा देण्याच्या संकल्पातून महा ब्लडबँक ची स्थापना जी भारतभर सेवा देत राहील |
आणि हे सर्व पर्यटनासाठी , प्रशिक्षणासाठी खुले करणे |
"काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे नक्कीच योग्य !"
_आपण ही अमुचा एक भाग होऊ शकता..._
संस्थेच्या सभासद नोंदणी साठी संपूर्ण नोंदणी फॉर्म, भरून आपला सहर्ष सहभाग नोंदविणे |
https://forms.gle/1MJePPTiaXTzNBtN7
*धन्यवाद,*
*जय हिंद !*....................................................
श्री बी. किरण विश्वनाथ ( राहते ठिकाण - वेस्टन मुंबई - गोरेगाव पूर्व | गाव - सांगली - खानापूर - विटा. (विशेष कार्यकारी अधिकारी | महाराष्ट्र शासन)
• उद्योजक • समाजसेवक - समाजकारण • तत्वज्ञानी • प्रेरक वक्ता • लेखक • व्यवस्थापक • राजकारणी
*उपलब्ध :*
� +91 91 4524 4524
� : [email protected]
� : www.aadharfoundationhelp.com