25/09/2023
जय माता दी कॉम्प्लेक्स फेज-१ गणेशउत्सवाचे औचित्य साधून श्री संजय राजाराम शिर्के आणि श्री प्रतिभा शिवाजी शिर्के यांच्या सौजन्याने सक्षम मेडिकलअँड एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी जय मातादी कॉम्प्लेक्स फेज १, क्लब हाऊस येथे
मोफत आरोग्य शिबिर , नेत्र चिकित्सा आणि दंतचिकित्सा शिबिर सोबतच रक्त चिकित्सा , तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन , निरोगी कार्यक्षम जीवनशैली, आहार विषयक मार्गदर्शन ही झाले . या प्रसंगी सौ. प्रतिभा शिर्के, सेक्रेटरी, सक्षम मेडिकल आणि एज्युकेशल ट्रस्ट यांच्या हस्ते जनरल सर्जन डॉ.राहुल चासकर व टिमचे स्वागत शाल श्रीफळ आणि तुळशीच रोप देवून करण्यात आले.
*अवि हेल्थ क्लिनिकचे डॉ. राहुल चासकर ( जनरल सर्जन )*
*डॉ. विनोद पावरा फॅमिली फिजीसियन* यांचेकडून ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, हिमोग्लोबिन ,पोटाचे विकार, हायपर असिडीटी,अपेंडिक्स, व्हेरिकोज व्हेन्स, कॅन्सर अशा विविध विकारांची उपचार व सल्ला देण्यात आला. त्यांचे सहकारी
*श्री संतोष खांबे*
*श्री अनिकेत जसवाल*
*मिस. वैशाली हरड*
ही सोबत होते .
*भोईर डेंटल क्लिनिकचे डॉ. नीरज भोईर, डेंटल सर्जन*
यांनी दंत तपासणी करून उपचार सल्ला दिला.
*शितल ऑपटिकस् कडून सौ शितल सदाशिव मोरे*
यांनी नेत्र तपासणी करून मार्गदर्शन केले. या नेत्र चिकित्सा शिबिरात नेत्र तपसणी केलेल्यांना शितल ऑपटिकस् कडून सवलतीच्या दरात चस्मे उपलब्ध करून देणार आहेत
*सौ ज्योती जामकर, श्री विजय जामकर व श्री. राहुल वैद्य* यांनी निरोगी कार्यक्षम जीवनशैली, आहार विषयक महिती, वजन कमी करणे/ वाढवणे यासाठी मार्गदर्शन केले.
*सक्षम मेडिकल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या आरोग्य शिबिराचा लाभ १५० पेक्षा जास्त लोकांनी घेतला.*
आरोग्य शिबिरासाठी जय माता दी फेडरेशन गणेश उत्सव कमिटी, फेज-१ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*आगरी भूमी कन्या सौ. वंदना गौरी, स्वराज्य महिला मंडळ अधक्षा रेखाताई तरे आणि सर्व महिला पदाधिकारी, काल्हेर ग्राम पंचायत सदस्य श्री. विशाल तरे, जय माता दी फेडरेशनचे श्री संतोष कामथे ( खजिनदार ) आणि श्री सुभाष रींगे ( कमिटी मेंबर ) ही शिबिराला उपस्थित राहिले.*
*सक्षम मेडिकलअँड एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष श्री . संजय राजाराम शिर्के व सेक्रेटरी सौ. प्रतिभा शिवाजी शिर्के यांचेकडून सर्वाचे मनःपूर्वक धन्यवाद*