श्री आदिशक्ती जगदंबेच्या प्रेरणेने, श्री गणेशाच्या इच्छेने व महामहीम छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड हिंदवी स्वराज्याचा स्पुर्तीमंत्र मनात ठेऊन चतुरंग सेना दिग्विजयासाठी सज्ज जाहली.
श्री शककर्ते प्रतिष्ठान ह्या संघटनेची स्थापना १३ जून २०११ रोजी ( शिवराजाभिषेक तिथी प्रमाणे - किल्ले रायगड ) येथे श्री मयुरजी धुरी यांच्या नेतृत्वाखाली झाली.. पाठीमागे कोणतेही राजकीय वलय नसतांना, घरात कोणताही राजकीय वा
रसा नसतांना, आर्थिक परिस्थिती बिकट असतांना फक्त महाराष्ट्राच्या मातीची कळवळ लक्षात घेऊन, प्रचंड अज्ञानाचा,अविश्वासाचा,काळाकुट्ट बुरुजाला सज्ञानाच्या उशःकालाने छेद देऊन.सक्षम, बुलंद घाट सप्त गंगांवर,सातीसागरांवर बांधून समतेचे,बंधुत्वाचे,आणि विकासाचे पाणी सर्वांना प्यायला मिळावे. महाराष्ट्र कीर्ती विश्वात वंदिली जाईल आणि ते गोड्कौतुक ऐकून समस्त मराठी मंडळी तृप्त होतील. ह्यासाठी म्हणून हा आम्ही सर्वांनी मयुरजी यांच्या अध्यक्षतेखाली श्री शककर्ते प्रतिष्ठानचा श्रीगणेशा रायगडी केला.
श्री शककर्ते प्रतिष्ठान स्थापन करायचे मुख्य उधिष्ठ म्हणजे समस्त मराठी माणसाला स्वावलंबी बनवणे. त्यांना पोटाला लावणे, त्यांच्या संसाराचे आणि मुलांचे गोमटे करणे.
महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर म्हत्वाचे स्थान मिलायून देणे. मराठी माणसाला जगात ओळख निर्माण करून देणे. आणि जगाला महाराष्ट्र धर्म आणि मराठी संस्कृतीची ओळख पटून देणे
कधीही कुणालाही हाथ पसरण्याची परिस्थिती आपल्या मुलखात येऊ न देणे. लोकांची पोते भरणारा महाराष्ट्र स्वतःच्या लोकांसाठी कधीही कमी पडू न देणे. आपल्या धर्माची, संस्कृतीची , समाजाची जपवणूक करणे आणि वाढवणे. महामहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी देव मस्तकी धरून तीन तपे हलकल्लोळ केला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हिंदुस्थानात स्वातंत्राची पहिली मशाल प्रज्वलित केली. त्याच कार्य अजोड होते. त्याचे बुद्धी चातुर्य, राज्य व्यवहार आणि सृजनशीलता हि आताच्या समाज रचनेला लाजवेल एवढी सक्षम होती. छत्रपतींनी महाराष्ट्रातल्या कान्याकोप्र्यातून वारकरी, धारकरी, शेतकरी, मावळे, धनगर, रामोशी, महार, चांभार,लोहार अश्या १८ पगड जाती जमातीच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली. ते कुणा एका जाती धर्मासाठी मुलीचा नव्हत ते होते फक्त स्वतंत्रप्रिय लोकांसाठी गुलामगिरीची जोखाडे वाहून दमलेल्या रायातेसाठी.
श्री शककर्ते प्रतिष्ठानाची संकल्प साधतांना एवढेच ध्यानी आले कि जेजे उत्तम,उद्दात,उन्नत गाठीला बांधूनच हा प्रचंड यज्ञ करू आणि नवा इतिहास जगासमोर मांडू. आम्ही शिवप्रभूनकडून काय घेतल असे कोणी भविष्यात विचारले तर ताठ मानेने सांगता आले पाहिजे ते म्हणजे { आत्मविश्वास, स्वाभिमान, शोर्य }
श्री शककर्ते प्रतिष्ठानाची आई जगदंबे चरणी एवढीच इच्छा आहे कि तिच्या कृपेने आपल्या करून किमान शिवाजी महाराजांच्या नाखायेवाध्ये जरी कार्य पार पडले गेले तरी आमच्या जीवनाचे सार्थक होईल. मारतांना हि मग आपण शान मध्ये मारू शकू. आणि देवाला ताठ मानेने सामोरे जाऊ.पण अशी चळवळ कुणा एकाला सध्य होणे कठीणच परंतु जर आपली साथ असेल तर त्रेलोक्कीचे साम्राज्य चतुरंग सेने घेतल्या शिवाय राहणार नाही . आपण मराठे आहोत सहसा कुणाच्या वाट्याला जात नाही पण कुणी आपल्या वाट्याला आले तर मग सोडत नाही. आता ती वेळ आली आहे. तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करीच दिवस गेले. कुणी जर एकटे पडत असेल तर फक्त एकदा श्री शककर्ते प्रतिष्ठानाला हाक मारावी. मग पहावे येतून हर हर महादेवच आईकू येईल.
श्री शककर्ते प्रतिष्ठान कोणत्याही राजकीय पक्षाशी किवा संघटनेशी सलग्न नाही किवा संबंध नाही. श्री शककर्ते प्रतिष्ठान स्थापना सामान्य गरीब घरातल्या मुलांनी केलेली असून त्याची इच्छा एवढीच आहे कि जे आपल्याला कमी पडले, ज्याच्यासाठी आपणास खस्था खाव्या लागल्या त्याचा इतर कोणालाही त्रास होऊ नये किवा त्याने कोणाचेही आयुष्य खराब होऊ नये. "असतील बहु होतील बहु परंतु जेथे कर्तव्याचे,निष्ठेचे आणि जिद्दीचे अधिष्ठान तेच खरे प्रतिष्ठान"
आम्ही कसोशीने प्रयत्नात आहोत कि आमच्या कडून ते अधिष्ठान सांभाळले जावे. परंतु हे शिवधनुष्य आहे. दोर बंधने कठीण आहे पण अशक्य नाही. हे शक्य होऊ शकते फक्त आणि फक्त आपण सर्वांच्या संघटीत होण्याने......