20/07/2025
*करेंगे या मरेंगे, अपना हक्क लेके रहेंगे*
*क्रॉफर्ड मार्केट येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईला स्थलांतरापासून वाचविण्याकरिता मच्छिमार जन-आक्रोश मोर्चाची मोहीम धाकटी डहाणू गावातून मच्छिमारांनी केली नव्या जोमाने सुरुवात.*
पालघर :- मासळी व्यवसायाचा आर्थिक केंद्र बिंदू असलेल्या क्रॉफर्ड मार्केट येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईचे अस्तित्व पालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच अकार्यक्षम अभियंताच्या मस्तकात चढलेल्या माज मुळे धोक्यात आल्याने राज्यभरातील मच्छिमार एकवटले असून २२ जुलै रोजी पुकारलेल्या मच्छिमार जन-आक्रोश मोर्चा जरी तूर्तास स्थगित करण्यात आला असला तरी सरकार आणि पालिकेबरोबर येत्या १५ दिवसांत होणाऱ्या चर्चेतून तोडगा निघाला नाही तर मच्छिमार आंदोलनावर ठाम राहणार आहेत. तसेच मच्छिमारांच्या आक्रोशाची धार कमी न होण्याकरिता मोर्चाची मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, दी मुंबई फ्रेश फिश डीलर्स असोसिएशन, मुंबई जिल्हा कोळी महिला कार्यकारी सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ, ठाणे जिल्हा मच्छिमार संघ ह्यांनी घेतला असून रविवार दिनांक २०/०७/२०२५ रोजी धाकटी डहाणू येथील राम मंदिरातून मोर्चाचे शंखनाद वाजविण्यात आले आहे.
आक्रोश मोर्चाची तयारी जोमाने करण्याकरिता तसेच जास्तीच्या संख्येने मच्छिमार बांधवांची मोर्च्यात सहभाग होण्याकरिता धाकटी डहाणू पासून नव्या जोमाने मोर्चाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून येणाऱ्या दिवसात ही मोहीम पालघर, ठाणे, मुलुंड, भांडुप, नवी मुंबई, उत्तन, गोराई, मनोरी, मार्वे, मालवणी, वसई, अर्नाळा, वर्सोवा, कुलाबा, कफपरेड, खार दांडा, जुहू गावात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
धाकटी डहाणू येथे झालेल्या सभेत उपस्थित मच्छिमारांनी एकमताने "करेंगे या मरेंगे" चा नारा देत श्री. छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईचे स्थलांतरित होऊ न देण्याचा निर्णय घेतला असून आगामी काळात होणाऱ्या मच्छिमार जन-आक्रोश मोर्च्यात डहाणूवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचा निर्धार घेण्यात आला आहे.
सदर सभेत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष श्री. देवेंद्र दामोदर तांडेल, पालघर जिल्हा अध्यक्ष श्री. विनोद पाटील, पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री. संतोष मर्दे आणि पालघर जिल्हा सरचिटणीस श्री. कुंदन दवणे आदींनी सभेचे मार्गदर्शन केले.
आपला आक्रोश शांत झाला नसून जो पर्यंत कोळी बांधवांचे हक्क शाबुत होत नाही तो पर्यंत संपूर्ण कोळी समाज आंदोलनात्मक भूमिका मांडत राहणार असल्याचा निर्धार सदर सभेतून व्यक्त करण्यात आला.
*आपला नम्र*
*श्री. बर्नार्ड डिमेलो*
*(कार्याध्यक्ष)*
*अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती*