08/03/2026
महिलांच्या हातांना कौशल्य देणे, त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणे , हेच खुशी संस्थेच्या कार्याचे खरे ध्येय आहे.
स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या मुली, स्वतःच्या कौशल्यावर कमाई करणाऱ्या मुली आणि कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीत आपला वाटा उचलणाऱ्या मुली हेच आमच्या कामाचे खरे यश आहे. या कार्याची दखल घेत महिला दिनानिमित्त खुशी संस्थेला तेरापंथ महिला मंडळातर्फे सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान आमच्या कामाची प्रेरणा आणि जबाबदारी दोन्ही वाढवणारा आहे. महिलांना सक्षम बनवण्याचा आमचा प्रवास असाच पुढे सुरू राहील. ✨