Bhalod Mitra Mandal - भालोद मित्र मंडळ

  • Home
  • India
  • Mumbai
  • Bhalod Mitra Mandal - भालोद मित्र मंडळ

Bhalod Mitra Mandal - भालोद मित्र मंडळ भालोदकर लोकांना एकत्र आणणे तसेच त्यांचा ओळख परिचय करून त्यातून समाजउपयोगी कार्यक्रम राबवणे

भालोद मित्र मंडळाच्या स्थापनेची सुरुवात २५ डिसेंबर १९९५ साली भालोदकर लोकांना एकत्र आणणे तसेच त्यांचा ओळख परिचय करून त्यातून समाजउपयोगी कार्यक्रम राबवणे या हेतूने श्री निळकंठ व्यंकट चौधरी, श्री दिलीप भागवत जावळे, श्री सुभाष पुरुषोत्तम चौधरी आणि इतर भालोदकरांनी केली. मंडळाचे प्रथम स्नेहसंमेलन 👪२५ फेब्रुवारी १९९६ साली शिवमंदिर खिडकाळी येथे संपन्न झाले तसेच पहिली स्मरणिका 📚५ डिसेंबर १९९९ साली पिंपळेश्

वर महादेव मंदिर येथील स्नेहसंमेलनात प्रकाशित करण्यात आली.
भालोद मित्र मंडळाबद्दल सविस्तर माहिती आपल्याला 🎉 प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेत वाचावयास मिळेलच 😀

कालच १४ डिसेंबर २०२५ , रविवार रोजी आपल्या गावातील मंदार अनिल चौधरी याला मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे शरद पवार इ...
15/12/2025

कालच १४ डिसेंबर २०२५ , रविवार रोजी आपल्या गावातील मंदार अनिल चौधरी याला मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप त्याने लिहित असलेल्या कादंबरी या साहित्य प्रकारासाठी प्रदान करण्यात आलीये. गेल्या ३ वर्षांपासून तो या कादंबरीवर काम करतोय, अखंड लिहित चाललाय...
लवकरच ही कादंबरी प्रकाशित होईल आणि कधी वाचनास मिळेल याची उत्सुकता लागलीय
मंदार लिहित रहा, तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐, परत एकदा अभिनंदन, धन्यवाद

भालोद मित्र मंडळाचे २८ वे स्नेहपुष्प उत्साहात व सामाजिक जाणिवेने साजरेभालोद मित्र मंडळाचे २८ वे वार्षिक स्नेहपुष्प आज रव...
15/12/2025

भालोद मित्र मंडळाचे २८ वे स्नेहपुष्प उत्साहात व सामाजिक जाणिवेने साजरे

भालोद मित्र मंडळाचे २८ वे वार्षिक स्नेहपुष्प आज रविवार, दिनांक १४/१२/२०२५ रोजी म्हाळसा देवी मंदिर, कोपर, येथे अत्यंत उत्साहपूर्ण व आपुलकीच्या वातावरणात पार पडले. भालोद गावाशी नातं जपणाऱ्या बांधव-भगिनींच्या उपस्थितीने हा सोहळा संस्मरणीय ठरला.

या कार्यक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूल, भालोदचे मुख्याध्यापक श्री. डी. व्ही. चौधरी सर तसेच आमदार श्री. अमोल दादा जावळे यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्रीताई अमोल जावळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते व उपस्थितीत कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.

या प्रसंगी भालोद मित्र मंडळातर्फे सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपत न्यू इंग्लिश स्कूल, भालोद साठी ₹ १,११,१११/- रकमेचा धनादेश मुख्याध्यापक श्री. डी. व्ही. चौधरी सर यांच्याकडे देणगी स्वरूपात सुपूर्द करण्यात आला. या उपक्रमाबद्दल प्रमुख पाहुण्यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. एन. व्ही. चौधरी, भालोद मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. भरत झांबरे, उपाध्यक्ष श्री. रविकिरण महाजन, सेक्रेटरी श्री. योगेश सुभाष चौधरी, खजिनदार श्री. तुषार चौधरी तसेच मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी देणगी स्वरूपात डॉ. श्री. जयंत रमेश चौधरी यांच्याकडून वार्षिक संमेलनासाठी ₹ १०,०००/-, तसेच श्री. डी. व्ही. चौधरी यांच्याकडून ₹ ५,०००/- अशी देणगी प्राप्त झाली.

आजच्या कार्यक्रमाचे अन्नदाते म्हणून श्री. घनश्याम डिगंबर चौधरी व श्री. अशोक डिगंबर चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले. महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकवाचे वाण सौ. दिपाली बोरोले, साई व्हेजिटेबल, मीरा रोड यांच्या सौजन्याने देण्यात आले. या हळदी-कुंकवाचे आयोजन सौ. कीर्ती जावळे व सौ. योगिनी बरडे व ईतर स्त्री सदस्यांनी उत्तमरीत्या पार पाडले.

बालगोपाळांसाठी विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या उपक्रमांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व संपूर्ण परिसर आनंदमय झाला.

संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन सौ. मनीषा चौधरी यांनी अत्यंत प्रभावी व सुबक पद्धतीने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.किरण कोंगे,श्री.पंकज जावळे,श्री.रोशन इंगळे,श्री.शैलेश चौधरी, श्री.चेतन कोळी,श्री.नितीन चौधरी,श्री.मिलिंद इंगळे व ईतर सदस्य माता भगिनी व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
एकूणच स्नेह, सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख संगम असलेले भालोद मित्र मंडळाचे २८ वे स्नेहपुष्प सर्व उपस्थितांच्या मनात आनंददायी आठवण म्हणून कायम राहील, अशा भावना व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

https://sites.google.com/u/0/d/1z4Zct3MPrGK2IRX2_nrBlHRqj3-vmM2G/p/1Q03kN1hQ6rOI-hGwdiXNKvLh4cGs0uvT/publishview

🙏चित्रकला स्पर्धा🙏**स्नेह सम्मेलन २०२५**सर्व ठाणे,मुंबई,नवी मुंबई व पालघर स्थित भालोदकर रहिवाशी बंधू भगिनींना कळविण्यात ...
08/12/2025

🙏चित्रकला स्पर्धा🙏

**स्नेह सम्मेलन २०२५**

सर्व ठाणे,मुंबई,नवी मुंबई व पालघर स्थित भालोदकर रहिवाशी बंधू भगिनींना कळविण्यात आनंद होतो की आपल्या भालोदकर परिवाराचे वार्षिक स्नेह संमेलन रविवार दिनांक १४/१२/२०२५ रोजी शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे, तरी ही स्पर्धा खालीलप्रमाणे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी असेल.
1 ला गट : 1ली ते 4 थी,
(विषय: My Dream House, )
A Buttrrfly, My Pet and their Home)

2 रा गट : 5 वी ते 7 वी,
(विषय: Space Adventure, Save the Earth, My Family picnic)

3 रा गट : 8 वी ते 10 वी.
(विषय: Still Life & Nature, My Favorite festvals, Swachh Bharat)

पेपर साईझ :
1/4 साईझ पेपरवरती काढायचे आहे,

कलर माध्यम :
ऑइल पेस्टल कलर, स्केच पेन, वॉटर कलर.

वरील इयत्ता प्रमाणे 3 पैकी एका विषयावर चित्र काढून आणायचे आहे.
पालकांनी फक्त पाल्यांना विषय समजावून सांगण्यास मदत करायची आहे, मुलांना ड्रॉइंग काढून देऊ नये.
आयोजकांना काही त्रुटी अथवा शंका आढळल्यास जागेवर चाचणी घेण्यात येईल.

वर दिलेल्या वयोगटानुसार 3 पात्र विजेत्यांना कार्यक्रम स्थळी पारितोषिक देण्यात येईल.

स्नेहसंमेलनाला येताना आपल्या पाल्याने काढलेले चित्र सोबत आणणे,
फाटलेली किंवा घाण असलेले चित्र ग्राह्य नसेल.

ज्या पाल्याने स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे त्यांची उपस्थिती कार्यक्रम स्थळी अनिवार्य आहे,अनुपस्थित स्पर्धकांची कुठलीही नोंद घेतली जाणार नाही.

आपले नम्र
भालोद मित्र मंडळ

भालोद मित्र मंडळाबद्दल

15/08/2025
श्री.पराग महाराज यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  जय हरी
08/07/2025

श्री.पराग महाराज यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
जय हरी

भालोद मित्र मंडळाचे सचिव श्री.योगेश सुभाष चौधरी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
24/06/2025

भालोद मित्र मंडळाचे सचिव श्री.योगेश सुभाष चौधरी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आपल्या भालोद मित्र मंडळाचे सचिव,दिलखुलास व्यक्तिमत्व प्रा.श्री.योगेश सुभाष चौधरी यांना भालोद मित्र मंडळातर्फे वाढदिवसाच्...
24/06/2025

आपल्या भालोद मित्र मंडळाचे सचिव,दिलखुलास व्यक्तिमत्व प्रा.श्री.योगेश सुभाष चौधरी यांना भालोद मित्र मंडळातर्फे वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎉💐

यावल रावेर मतदार संघाचे दमदार आमदार श्री. अमोल हरिभाऊ जावळे यांना भालोद मित्र मंडळ यांच्या तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शु...
18/06/2025

यावल रावेर मतदार संघाचे दमदार आमदार श्री. अमोल हरिभाऊ जावळे यांना भालोद मित्र मंडळ यांच्या तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

श्री.पंकज गोपाळ जावळे यांना भालोद मित्र मंडळा तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
30/05/2025

श्री.पंकज गोपाळ जावळे यांना भालोद मित्र मंडळा तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

भालोद मित्र मंडळाचे तरुण उत्साही कार्यकर्ते श्री.पंकज जावळे आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂💐🎊🎉
30/05/2025

भालोद मित्र मंडळाचे तरुण उत्साही कार्यकर्ते श्री.पंकज जावळे आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂💐🎊🎉

भालोदकरांना एकत्र आणणे, त्यांचा ओळख-परिचय करून देणे व त्यातून समाजोपयोगी उपक्रम राबवणे हे भालोद मित्र मंडळाचे प्रमुख ध्य...
25/05/2025

भालोदकरांना एकत्र आणणे, त्यांचा ओळख-परिचय करून देणे व त्यातून समाजोपयोगी उपक्रम राबवणे हे भालोद मित्र मंडळाचे प्रमुख ध्येय. या मंडळाच्या स्थापनेमागे असलेले प्रमुख प्रेरणास्थान, समाजसेवक आणि भालोद गावाबद्दल अत्युच्च आस्था असलेले *श्री. निळकंठ व्यंकट चौधरी* यांचा आज वाढदिवस!

या औचित्याने भालोद मित्र मंडळातर्फे त्यांना अगणित शुभेच्छा!
ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अधिक सामाजिक कार्य करण्याची शक्ती देवो!

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhalod Mitra Mandal - भालोद मित्र मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhalod Mitra Mandal - भालोद मित्र मंडळ:

Share