07/12/2025
*मुंबई ग्राहक पंचायत*
पॉडकास्ट ग्राहक गप्पा
एपिसोड 19
*लिव्हिंग विल ( Living Will )*
आजकाल अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या तोंडून आपण ऐकतो की नको आता , जगणं बास झालं . वेदनांसह जगण्यापेक्षा देवा सोडव आता .
अत्याधुनिक वैद्यक शास्त्रामुळे माणसाचं आयुष्य तर वाढलं आहे but what about quality of life ?
अगदी उतार वयात एखाद्या असाध्य रोगाने ग्रस्त अशा अवस्थेत कण्हत कण्हत जगण्यापेक्षा गाणं गुणगुणत हसत हसत स्वेच्छेने मरणाला सामोरं जाता आलं तर किती चांगलं होईल .
असा हा जरा वेगळा विषय जो फारसा चर्चिला जात नाही परंतु आता काळाची गरज बनला आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया डॉ. निखिल दातार यांच्याकडून , त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत शर्मिला रानडे यांनी .
डॉ. निखिल दातार, एक प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist) आणि आरोग्य हक्क कार्यकर्ते (Health Rights Activist) आहेत. वैद्यकीय आणि कायदेशीर अशा दोन्ही क्षेत्रांत त्यांचा गाढा अभ्यास आहे.
'लिव्हिंग विल' (Living Will) या विषयावर त्यांनी भारतात केवळ जागरूकताच निर्माण केली नाही, तर यासाठी कायदेशीर लढाही दिला आहे. ते स्वतः अशा प्रकारचे नोंदणीकृत 'लिव्हिंग विल' तयार करणारे भारतातील पहिले नागरिक ठरले आहेत .
इतरही अनेक विषयासंदर्भात त्यांनी ( PIL) जनहित याचिका न्यायालयात दाखल करून स्वतः लढविल्या आहेत .
शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025 रात्री 9 वाजता आणि त्यानंतर कधीही . 👇
https://youtu.be/iXudebngPKM?si=dee2IgUhVWN4dpyv
हा व्हिडीओ पूर्ण बघा , लाईक करा शेअर करा , आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा .
डॉ. निखिल दातार, जे एक प्रतिष्ठित स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist) आणि आरोग्य हक्क कार्यकर्ते (Health Rights Activist) आहेत. वैद्यकीय आणि क.....