मनोगत
नमस्कार मंडळी,
आज माझ्या "कृष्णशारदा कलाविष्कार " या नाट्य संस्थेचे फेसबुक पेज सुरू करताना खूप आनंद होत आहे.
आपणा सर्वांना खास कळवण्याचे प्रयोजन असे की काही तरी वेगळे पण आपल्या मस्कत मधील मराठी मुलांसाठी करावं असे गेले वर्षभर मनात चालू होते. ही आपली मुले जेव्हा कधी आपल्या मराठी समाजात निर्भयपणे आपल्या मातृभाषेत ठामपणे आपले विचार, आपल्या भावना व्यक्त करतील तेही शुद्ध मराठीतून, तेंव्हा
तुम्हालाच त्यांचा अभिमान वाटेल.
2014 या वर्षी जेव्हा मी मस्कत मधील मराठी मंडळासाठी मूलांच नाटक बसवायला घेतले तेंव्हा तर प्रकर्षाने जाणवले की आपली मराठी भाषा त्यांना खरंच कळते का? की आपण त्यांना फक्त इंग्रजीच्या कुबड्यांच्या आधारेच मातृभाषा शिकविणार? असा विचार आला आणि मग ठरवले की निदान एक प्रयत्न आपण करायचाच. ज्यामुळे आपली मुले मराठी बोलताना धीटपणे बोलतील, कुठल्याही रंगमंचावर त्यांचा वावर सहज असेल.
नाटक हे असे माध्यम आहे की जिथे मुलांवर मराठी संस्कार आपोआपच होतात. तर मग हाच मार्ग का बरे नको?
मी ही जबाबदारी घ्यायची ठरवली.
नाट्यशिबीर घ्यायच तेही विनामूल्य अर्थात सर्व मुलांचा अभ्यास व त्यांच्या इतर बाबी संभाळूनच हे सर्व साधायचे होते. संपूर्ण आराखडा तयार होता फक्त पालकांची तयारी असायला हवी होती आणी ती सर्वानी छान पार पाडली.
दर महिन्याच्या दुसर्या व चवथ्या आठवड्याच्या शेवटी हे शिबीर घेण्यात आले. ह्या नाट्य शिबिरात स्पष्ट शब्दोच्चार, वाक्यातील चढ़-उतार, शब्दांची फेक, सोपे मराठी वाचन, शास्त्र शुद्ध गायत्री मंत्र, रंगमंचावर उभे राहण्याची पद्धत आदींचा समावेश होता. आंगिक, वाचिक, सात्त्विक अभिनय, मुद्राभिनय ह्याचा वापर कसा करावा ह्या गोष्टीवर विशेष भर दिला. सोबत इतर अनेक गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या व प्रत्यक्ष अभिनय कसा करावा हे शिक्षण दिले.
वयोगट सहा ते चौदा वर्षां पर्यत अशी साधारण 54 मूले सूरवातीस होती.
शिबिरात शेवट पर्यंत 44 मुलानी तग धरला आणि हे अपेक्षितच होते.
जी मूल अर्धवट मधेच यायची बंद झाली त्याच्या बद्द्ल वाइट वाटले पण दूसरी बाजू पाहिली की वाटत की जे शेवट पर्यंत शिबिरात राहिले त्यानी मला खूप आनंद दिला म्हणूनच त्यांच्या साठी खूप मेहनत घ्यायची ठरवली.
आज हे कळवताना खूप आनंद होतो आहे की त्या सगळ्यांना घेऊन मी साधारण तीन छोटी नाटक सादर करण्याचे ठरविले आहे. लवकरच याची माहिती देईन.
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी केलेला हा छोटा प्रयत्न.
नाट्यशिबीर सूर झाल्या नंतर मी स्वतः मुलांमधील बदल गेल्या वर्षी नाटकाच्या तालमीत पाहिलेला व अनुभवलेला आहे. सगळेच अगदी आवडीने येत होते. खूप धमाल मस्ती पण केली.
हया सगळ्यात महत्वाचा भाग जो संभाळला तो माझ्या पत्नीने. कारण सतत पाठपुरावा करून माझ्याकडून माहिती गोळा करून ती नीट ठेवून सगळ्या बरोबर संपर्कात राहून खूप छान काम केले. साधी एक तक्रार देखील केली नाही. मनापासून धन्यवाद संगीता.
हया नाट्यशिबीरास फार मोलाचे मार्गदर्शन ज्यापासून मिळाले असे श्री. प्रदीप देशपांडे व सौ. अरूंधती देशपांडे, श्री. प्रभाकर पेठकर यांचे मनापासून धन्यवाद.
तसेच श्री. शितलकुमार सावंत यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील आदर्श व उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात आलेले एकमेव जोडपे आदरणीय श्री आणि सौ. कृ. आ. पाटील यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मुलाना मिळाला हे तर फारच भाग्य होत आम्हा सर्वांच.
माझे मुंबई मधील मित्र श्री. प्रकाश पाटकर यांच दिलेल योगदान कसे विसरता येईल. स्वतः उत्तम कवी व नाटककार असलेल्या प्रकाश यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. मनापासून धन्यवाद सर्वांना जे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने माझ्या मागे विश्वासाने उभे राहिले.
मस्कत मधिल मिलिंद कुलकर्णी, कौस्तुभ व शिल्पा पंडित, संदीप कर्णिक तर मुंबईमध्ये असलेले माझे सगळे वर्गमित्र, कूटंबिय यांनी मला दिलेल्या आत्मविश्वासाबद्दल मनापासून धन्यवाद.
शिबिराची दूसरी बॅच याच मिळालेल्या अनुभवातून घेणार आहे पण त्या आधी पहिल्या बॅच ची तिन नाटक.
पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद
आपला नम्र
अनिल कृष्णा राणे
दूरध्वनी क्रमांक
00918591541396
तर मग चला कलाकारांची नविन पिढी घडवूया.