Yuva Aadhar Foundation

Yuva Aadhar Foundation Yuva Aadhar foundation (in the Marathi language) means " Foundation to Support the Youth ': A haven of hope, belonging and understanding.

Permanently closed.
https://youtube.com/shorts/iIg5o29tvMQ?si=fKo2z-Xso6VMyFN9
07/12/2025

https://youtube.com/shorts/iIg5o29tvMQ?si=fKo2z-Xso6VMyFN9

Unstoppable Maharashtra | राजकारण सामाजिक आर्थिक परिवर्तनाचे उपकरण | Mumbai | (कृतज्ञतेचा आनंद संवाद | मुंबई | 5-12-2025) ...

20/10/2025
20/10/2025

दिनांक 20 ऑक्टोबर 2025.
आफ्टर केअर होस्टेल, पोस्टल कॉलनी चेंबूर मुंबई,येथील अनाथ निराधार मुलांच्या संस्थे मध्ये समाजसेविका रश्मी भातखळकर मॅडम उपस्थितीत होत्या.

मुलांना मिठाई,दिवाळीचा फराळ, तसेच, मुलशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन दिले.

कार्यक्रमाला युवा आधार फाउंडेशन चे मित्र व सहयोग तसेच, समाज सेविका माया आढाव मॅडम आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

12/03/2025
12/03/2025

Gangaram maya temple Colombo shri Lanka 3/02 2025

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई दादर चैत्यभूमीवर आलेल्या भीम अनुयायी यांना डॉ बाबासाहेब आंब...
06/12/2024

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई दादर चैत्यभूमीवर आलेल्या भीम अनुयायी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना मुंबई अध्यक्ष आशिष गाडे आणि सर्व रिपब्लिकन सेना परिवार व युवा आधार फौंडेशन,यांच्या माध्यमांतून ब्लँकेट वाटप करण्यात आले..

बुद्धिमत्तेचा विकास हेच मनुष्याचे अंतिम ध्येय असलं पाहिजे.-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.                भारतरत्न डॉ...
16/04/2024

बुद्धिमत्तेचा विकास हेच मनुष्याचे अंतिम ध्येय असलं पाहिजे.-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्त विशेष सामाजिक न्याय विभागाच्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृह चेबूर मुंबई येते, परिवर्तन समितीच्या माध्यमातून, सर्व महापुरुषांची जयंती 13, ते, 15 एप्रिल दरम्यान मोठ्या हर्ष उल्लासाने साजरी करण्यात अली।
महाराष्ट्राची परंपरा असणारे पोवाडे व गीत याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा कार्यक्रम तसेच, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कल्चर ऍक्टिव्हिटीचे त्याच प्रमाणे मैदानी खेळ ऑर्गनायझेशन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती- विशेष सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त मा. प्रसाद खैरनारजी,डॉ. संजय भोसले - उद्योगपती,
श्री.आशिषजी गाडे- विद्यार्थी रिपब्लिकन सेना मुंबई अध्यक्ष. प्रमुख वक्ते-मधुकर कांबळे साहेब.
युवा आधार फाउंडेशन अध्यक्ष, ऑड-गोरख उबाळे.परिवर्तन समिती 2024 सर्व सदस्य.

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त 14 ऑक्टोंबर 2023.  वकृत्व स्पर्धा आणी काव्य वाचन आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला...
15/10/2023

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त 14 ऑक्टोंबर 2023.
वकृत्व स्पर्धा आणी काव्य वाचन आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीग्रह चेंबूर येते करण्यात आले होते.
विषय- बुद्ध ते, बाबासाहेब * आंबेडकर वाया सम्राट -अशोक.
* धम्मक्रांती, वर्तमान संदर्भ.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ऑड. श्री.प्रज्ञेज सोनवणे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्याचा विस्तार,भारतातील सध्याची आरक्षण व्यवस्था,विद्यार्थी आणि सध्याची शैक्षणिक व्यवस्था या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला, माता रमाई मुलींचे शासकीय वसतिगृह येथील 110 मुली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीग्रह येथील 220 मुले.
संत एकनाथ मुलांचे शासकीय वस्तीगृह चेंबूर येथील -50 मुले.
कार्यक्रमाला उपस्थित होती.
युवा आधार फाउंडेशन चे मेंबर आणि वस्तीग्रहाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

21/07/2023

**महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक वस्तीग्रह लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी सातत्याने युवा आधार फाउंडेशन करत आहे.**

महाराष्ट्र राज्यातील महिला व बाल विकास अंतर्गत (चाइल्ड वेल्फर कमिटी) अनाथ निराधार मुलांसाठी वय वर्ष झिरो ते 18 पर्यंत,ऑडिशनल ऑब्झर्वेशन होम, रिमांड होम,काळजी वाहक कायद्या अंतर्गत असलेल्या संस्था तसेच शासकीय आणि निमशासकीय संस्था मध्ये अठरा वर्षापर्यंत मुला-मुलींचे पालन पोषण केले जाते.
अशा मुलांना वयाच्या 18 वर्षां नंतर शिक्षण घ्यायचा असेल तर,विशेष सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहाव्यतिरिक्त पर्याय उरत नाही.वस्तीग्रहच्या जागा मर्यादित असल्यामुळे कमीत कमी मुलांना शिक्षणाची संधी मिळते. अनाथ मुलांच्या शिक्षणाला घेऊन राज्य शासन किंवा केंद्र सरकारने कोणती पॉलिसी बनवली नाही. त्यामुळे अनाथ निराधार हा वर्ग कायमस्वरूपी शिक्षणा वाचून वंचित राहत आला आहे.
या मुलांना न्याय देण्यासाठी-शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 100 मुलांचे वस्तीग्रह चालू करण्याची आवश्यकता आहे.
विशेष सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 441 वसतिगृह अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी चालविले जातात.
अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शासकीय वसतिगृहात 80 टक्के रिझर्वेशन आहे.
उर्वती 20 टक्के रिजर्वेशन मध्ये अनुसूचित जमाती, ओबीसी, एनटी,यांना पंधरा टक्के रिझर्वेशन आहे. उर्वती फिजिकल हॅंडीकॅप, ब्लाइंड आणि अनाथांना एकत्रित पाच टक्के रिझर्वेशन आहे. त्या अनुषंगाने दोनच अनाथ विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश मिळतो.अनाथ निराधार मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने वस्तीगृहाची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे.
आम्ही युवा आधार फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून राज्यातील सहा विभागीय स्तरावर त्याच प्रमाणे राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक एक वस्तीगृह लवकरात लवकर चालू करण्यात यावे.याची मागणी सातत्याने करत आहोत.

युवा आधार फौंडेशन-अध्यक्ष
ऑड-गोरख चं उबाळे।

Address

Yuva Aadhar Foundation . , Gorakh Ubale. , Ajay Suryawanshi, , 1st Floor, Office No. 10, , Prakash Kunj Building
Mumbai
400071

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Aadhar Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share