मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Mumbai
  • मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य

मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य, Community Organization, Mumbai.

एकच ध्येय एकच ध्यास, मराठी भाषा,राज्य, शाळा, संस्कृतीचे संवर्धन व विकास.
मराठी माणसाच्या हक्कासाठी बिगरराजकीय संघटना
अध्यक्ष- गोवर्धन देशमुख
इंस्टा- एक्स X- युट्युब
https://www.marathiekikaransamiti.org मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्रातील बिगरराजकीय लोकचळवळ...
मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी नोंदणीकृत संघटना.
मराठी भाषा, राज्य, संस्कृतीचे संवर्धन, मराठी शिक्षण व्यवस्था, मराठी उद्योजक व अर्थकारण.
जात पात, पक्ष भेद विसरून एक व्हा. सामील व्हा.

अभिनंदन व खूप शुभेच्छा ! गोंधळ मराठी चित्रपटाचा ऑस्कर प्रवेश.. दमदार, जोरदार मराठीचा आवाज. #गोंधळ  #ऑस्कर  #मराठीचित्रपट...
19/09/2026

अभिनंदन व खूप शुभेच्छा ! गोंधळ मराठी चित्रपटाचा ऑस्कर प्रवेश.. दमदार, जोरदार मराठीचा आवाज.
#गोंधळ #ऑस्कर #मराठीचित्रपट
#मराठीअभिमान #पुरस्कार #मराठीसिनेसृष्टी

महाराष्ट्रात स्थलांतरित कायदा झालाच पाहिजेपरप्रांतीय लोंढ्याच्या गर्दीला नियंत्रण असलेच पाहिजे,  #प्रवेशनोंदणी    परप्रा...
18/09/2026

महाराष्ट्रात स्थलांतरित कायदा झालाच पाहिजे
परप्रांतीय लोंढ्याच्या गर्दीला नियंत्रण असलेच पाहिजे,
#प्रवेशनोंदणी
परप्रांतीय गुन्हेगारीवर आळा घातलाच पाहिजे
स्थानिक नोकरी, रोजगार, शिक्षण, राजकारण, अर्थकारण हक्क अबाधित राहिलेच पाहिजेत.
#मराठीएकीकरणसमिती #महाराष्ट्र स्थलांतरितकायदा लोंढेआवरा अनियंत्रितस्थलांतर मराठीराज्य

विद्यार्थ्याची मातृभाषा मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली, गुजराती, मल्याळम, ओडिया किंवा घटनात्मक मान्यताप्राप्त अन्य भा...
18/09/2026

विद्यार्थ्याची मातृभाषा मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली, गुजराती, मल्याळम, ओडिया किंवा घटनात्मक मान्यताप्राप्त अन्य भारतीय भाषा असली, तरी त्याची बौद्धिक क्षमता, तर्कशक्ती, विश्लेषणात्मक आणि प्रशासकीय क्षमता ही भाषेवर अवलंबून नसते.

UPSC Prelims Regional Language: यूपीएससी पूर्व परीक्षेत २२ भाषांत उत्तरे लिहिण्याची मुभा असताना प्रश्नपत्रिका हिंदी-इंग्रजीतच का? .....

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! मुक्ती संग्राम लढ्यातील सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन !! #मराठवा...
17/09/2026

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मुक्ती संग्राम लढ्यातील सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन !!

#मराठवाडा_मुक्ती_संग्राम_दिन
#मराठीएकीकरणसमिती

महाराष्ट्र एकमेव बहुभाषिक राज्य? अमित शाह यांच्या वक्तव्यावर मराठी एकीकरण समितीचा संताप…
16/09/2026

महाराष्ट्र एकमेव बहुभाषिक राज्य? अमित शाह यांच्या वक्तव्यावर मराठी एकीकरण समितीचा संताप…

ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘महाराष्ट्रासारखे दुसरे बहुभाषिक राज्य संपूर्ण भारतात नाही’ असे वक्तव.....

16/09/2026

महाराष्ट्राला बहुभाषिक म्हणणारे, स्वतःच्या राज्याची गुजराती ओळख मात्र अभिमानाने जपून ठेवतात!

पंतप्रधान मोदी -
गुजरातमध्ये हिंदी चालेल का?
गुजराती नागरिक - नाही.

#मराठीएकीकरणसमिती

"तिसरी-चौथी मुंबई: विकासाच्या नावाखाली एमएमआरचा अवाढव्य विस्तार महाराष्ट्राच्या अखंडतेला धोका — मराठी एकीकरण समितीचा इशा...
16/09/2026

"तिसरी-चौथी मुंबई: विकासाच्या नावाखाली एमएमआरचा अवाढव्य विस्तार महाराष्ट्राच्या अखंडतेला धोका — मराठी एकीकरण समितीचा इशारा"

— आनंदा पाटील (प्रतिनिधी, मराठी एकीकरण समिती)

15/09/2026

📌 'महाराष्ट्र बहुभाषिक की #मराठी भाषिकांचे राज्य?' —

गृहमंत्र्यांचे विधान आणि वस्तुस्थितीनुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी "महाराष्ट्रापेक्षा मोठे बहुभाषिक राज्य संपूर्ण देशात दुसरे नाही" असे वक्तव्य केले. या विधानावरून सध्या मोठी चर्चा सुरू आहे. यावर नक्की वस्तुस्थिती काय आहे?

१. कायदेशीर आणि ऐतिहासिक सत्य: ⚖️१ मे १९६० रोजी झालेली महाराष्ट्राची स्थापना ही प्रामुख्याने 'मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य' म्हणूनच झाली होती. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. महाराष्ट्राची अधिकृत #राजभाषा 'मराठी' हीच आहे आणि नुकताच तिला 'अभिजात भाषेचा दर्जा' मिळाला आहे.
२. व्यावहारिक आणि सांस्कृतिक सत्य: 🤝 #मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातून विविध भाषा बोलणारे लोक रोजगारासाठी आले. महाराष्ट्राने नेहमीच या परप्रांतीय भाषांचा आदर केला, त्यांना आश्रय दिला. पण आश्रय देणे म्हणजे आपली मूळ ओळख बदलणे नव्हे!
३. गृहमंत्र्यांचे प्रथम कर्तव्य काय?
🏛️भारताच्या गृहमंत्र्यांचे हे प्रथम कर्तव्य आहे की त्यांनी देशाच्या विविधतेचे कौतुक करतानाच, संविधानाने दिलेल्या भाषावार प्रांतरचनेचा आणि राज्यांच्या ऐतिहासिक अस्मितेचा सर्वोच्च आदर करावा. महाराष्ट्रात इतर भाषा बोलल्या जात असल्या तरी, हे राज्य प्रामुख्याने मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचेच आहे या सत्याला धक्का लागणार नाही, याची काळजी घेणे ही शासनकर्त्यांची जबाबदारी आहे.

🎯 निष्कर्ष:इतर भाषांचे स्वागत करण्याच्या महाराष्ट्राच्या औदार्याला आमची 'हक्काची ओळख' पुसण्याचे साधन बनवता येणार नाही.

#महाराष्ट्र हे मराठीचेच राज्य आहे आणि राहील!

जय महाराष्ट्र! 🚩

आनंदा मारूती पाटील ९८६९३८५८७८
#मराठीएकीकरणसमिती

15/09/2026

वा रे वा..
स्वतःच्या राज्यात गुजराती आणि महाराष्ट्र बहुभाषिक ??
मराठी माणसांनी यांना डोक्यावर घेतले आणि हे महाराष्ट्राप्रति खरे चेहरे दाखवू लागले..

#मराठीएकीकरणसमिती

15/09/2026

किती माज असतो बघा या परप्रांतीयाना
फक्त ही एक महिला नव्हे तर असे असंख्य लोक या राज्यात आहे जे मराठीचा द्वेष करतात मराठीला मराठी माणसाला शिव्या घालतात

या व्हिडीओमुळे लज्जा प्राप्त होतेय, अर्वाच्य भाषा, धमकी, स्थानिकांना शिवीगाळ, प्रांतिक/जातीय तेढ, अपमानित करणे असे अनेक कलमे लागू शकतात.
मुंबई पोलीस Mumbai Police
Maharashtra Cyber कृपया हे बघा
कारवाई व्हावी.

Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे उदय सामंत tv9 marathi ABPmajha

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य:

Shortcuts

Share