09/09/2026
*आज दहीहंडी फुटली नाही, आज ११८ मराठी कष्टकरी घरं फुटली!*
BMC ची आजची अधिकृत आकडेवारी -
*जखमी: ११८ | मृत्यू: २ | रुग्णालयात: ८० | गंभीर: ५*
ही आकडेवारी वाचली का? आता एकदा त्या थराकडे नीट बघा.
*तिथे जोशी दिसतो का? आपटे दिसतो का? कारखानीस, गुप्ते, कामत, कुलकर्णी दिसतो का?*(चांगल्या अर्थाने घ्या)
नाही दिसणार! एका अपवाद वगळता ते कधीच दिसणार नाहीत.
कारण ते हुशार आहेत.तसेच त्याच्या पालकांना माहितीये एक चूक म्हणजे मुलाचे आयुष्य बरबाद, हात-पाय जायबंदी आणि लागलो भिकेला. म्हणून ते नसतात आणि ते *मुळीच चूक* नाही आहे ते बरोबरच करतात!त्यांना असल्या धोकादायक खेळा पेक्षा C.A ,MBBS, IT Engineer,LLB असे उच्चविभूषित अभ्यासक्रम याला प्राधान्य देतात.तिकडे जीव तोडून अभ्यास करतात आणि यश प्राप्त करतात. हा आदर्श या दहीहंडीच्या गोविंदांनी नक्कीच ठेवावा.
*मग तिथे कोण असतं?*
तिथे असतात कामगारांची पोरं. मराठा आणि बहुजन समाजातली पोरं. ज्यांच्या आई-बापाला वाटतं पोरगा थर लावतोय म्हणजे मोठं काहीतरी करतोय.
आणि स्टेजवर कोण असतं?
राजकारणी, धनाढ्य व्यापारी! ते चिमूटभर पैसे - ५ हजार, १० हजार फेकतात आणि आपला तमाशा बघतात.
*खरा खेळ काय आहे माहितीये का?*
ते मदारी आहेत आणि आपण माकडं आहोत!
ते आपल्यात चार पैसे टाकून स्वतः करोडो कमवतात. मतं मिळवतात, प्रसिद्धी मिळवतात.
*आणि त्याहून हरामखोर कोण? तर हे न्यूज चॅनल वाले!*
दुपारी ४ वाजेपर्यंत "बघा थरारक दहीहंडी LIVE" म्हणून TRP साठी आपल्या पोरांचं पडणं, आपटणं दाखवून करोडोच्या जाहिराती खातात.
आणि संध्याकाळी ७ वाजता त्याच स्टुडिओत बसून "दहीहंडीचा खेळ किती धोकादायक आहे" यावर प्रायोजित चर्चा घडवतात!
दुपारी तमाशा विकायचा आणि संध्याकाळी त्यावर ज्ञान पाजायचं!
*क्रिकेटकडून तरी शिका!*
करोडो कमावणारा कोहली सुद्धा हेल्मेट, पॅड, ग्लोव्हज शिवाय मैदानात उतरत नाही. त्याला माहितीये एक बॉल वर्मी बसला तर आयुष्य संपवेल.
आणि आपल्या पोरांना? अनवाणी, उघड्या अंगाने, डोक्यावर कसलीही टोपी नाही, खाली कसलीही जाळी नाही - थेट ४० फुटावर फेकतात!
काल रात्री राजकारणी, आयोजक, व्यापारी, चॅनलवाले गाढ झोपले असतील.
आणि ८० कष्टकरी आई-बाप सायन, केईएमच्या दारात औषधाच्या चिठ्ठ्या घेऊन रडत उभे असतील.
मृत्युमुखी पडलेल्या २ तरुणांना श्रद्धांजली. 🙏
कष्टकरी आई-बापांनो - डोळे उघडा. तुमच्या पोराला मदारीच्या हातातलं माकड बनवू नका. त्याला थरावर नाही, शाळेच्या आणि खेळाच्या मैदानात पाठवा.
*हंडी पुन्हा बांधता येईल, तुटलेला मणका आणि गेलेला जीव नाही.*
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩