Vijay Shikshan Sanstha

Vijay Shikshan Sanstha Late Shrimati Mainatai Ramchandra Gokhale's dedication towards educating these students, and her hard work laid the foundation of Vijay Shikshan Sanstha

विजय शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्यालयामध्ये गणपती उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या लेझीमच्या तालावर...
15/09/2026

विजय शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्यालयामध्ये गणपती उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या लेझीमच्या तालावर गणरायाचे आगमन झाले. तसेच विद्यार्थिनींनी सुंदर मंगळागौर सादर केली.

भारताचे दुसरे राष्ट्रपती, महान शिक्षक आणि तत्त्ववेत्ते, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस ५ सप्टेंबर, म्...
08/09/2026

भारताचे दुसरे राष्ट्रपती, महान शिक्षक आणि तत्त्ववेत्ते, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस ५ सप्टेंबर, म्हणजेच शिक्षक दिन, विजय शिक्षण संस्थेच्या प्रगति विद्यालयात,अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका उत्तम रित्या पार पाडली. विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांसाठी स्नेह भोजन आणि मनोरंजनात्मक खेळ आयोजित केले होते. सर्वांनी या खेळांचा आनंद घेतला.
शिक्षक दिनाच्या या सर्व कार्यक्रमाचे नियोजन, तयारी आणि आयोजन भाषा शिक्षक सौ. मानसी शिंदे व वाचा उपचार तज्ञ सौ. नीता धुरी यांनी उत्तम प्रकारे केले होते. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहभाग आणि सहकार्यासाठी त्यांचे मन: पूर्वक आभार !

विजय शिक्षण संस्थेचे प्रगति विद्यालय (कर्णबधिरांसाठी), दादर, पश्चिम येथे, आज गोपाळकाला उत्सव  अतिशय उत्साहात साजरा करण्य...
05/09/2026

विजय शिक्षण संस्थेचे प्रगति विद्यालय (कर्णबधिरांसाठी), दादर, पश्चिम येथे, आज गोपाळकाला उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. श्री कांबळे सर व सौ मानसी शिंदे यांनी जन्माष्टमी आणि दहीहंडी ची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रगती विद्यालयामध्ये मराठी विज्ञान परिषदेतर्फे "संसर्गजन्य व पावसाळ्यातील आजार" या विषयावर श्रीम...
28/08/2026

दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रगती विद्यालयामध्ये मराठी विज्ञान परिषदेतर्फे "संसर्गजन्य व पावसाळ्यातील आजार" या विषयावर श्रीमती अरुणा मुणगेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विजय शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्यालयात, अग्रोहा विकास ट्रस्ट तर्फे रक्षाबंधनचा सण साजरा करण्यात आला. संस्थेच्या देणगीद...
28/08/2026

विजय शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्यालयात, अग्रोहा विकास ट्रस्ट तर्फे रक्षाबंधनचा सण साजरा करण्यात आला. संस्थेच्या देणगीदार श्रीमती. मधु अगरवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना राखी बांधून भेटवस्तू दिल्या.

१५ ऑगस्ट २०२६, भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन, "वंदे मातरमचे १५० वर्ष" आणि "२०४७ मध्ये विकसित भारतसाठी युवा शक्ती" या मध्...
16/08/2026

१५ ऑगस्ट २०२६, भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन, "वंदे मातरमचे १५० वर्ष" आणि "२०४७ मध्ये विकसित भारतसाठी युवा शक्ती" या मध्यवर्ती संकल्पनेवर देशभर उत्साहाने साजरा करण्यात आला.
विजय शिक्षण संस्थेच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी प्रगती विद्यालयातही भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन, आर. सी. चॅरिटेबल ट्रस्ट च्या सहकार्य आणि सहभागाने दिमाखात साजरा झाला. ज्येष्ठ कर्मचारी श्री. राजू गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून नंतर उत्तम देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आर.सी. चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक श्री. मनोज कानाबार सर आणि त्यांचे सहकारी या प्रसंगी उपस्थित होते. त्यांनी संस्थेला भरघोस आर्थिक मदत केली तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. प्रगती विद्यालय आणि विजय शिक्षण संस्था या मदतीसाठी त्यांचे आभारी आहेत.
विजय शिक्षण संस्थेचे सचिव श्री. रहाळकर सर व खजिनदार श्री. बर्वे सर यांनीही उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

"विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा." जय हिंद !!!

विजय शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्यालयात, भारतीय सैनिकांच्या उपस्थितीत ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. प्रथम पथसंचल...
12/08/2026

विजय शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्यालयात, भारतीय सैनिकांच्या उपस्थितीत ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. प्रथम पथसंचलन करीत सैनिकांना सन्मानाने शाळेत आणण्यात आले. विद्यार्थीनींनी औक्षण करून आणि सचिव श्री. रहाळकर सर यांनी पुष्प देऊन जवानांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
आपल्या प्राणांची बाजी लावून,अहोरात्र देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी त्यांना स्वहस्ते तयार केलेली भेटकार्डे दिली. मुख्याध्यापक श्री शिरसे सर यांनी सर्व उपस्थित जवानांचे आणि पाहुण्यांचे आभार मानले.
जय हिंद !

दि. १ ऑगस्ट २०२६, प्रगती विद्यालयामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची  पुण्यतिथी साजरी करण्यात आली. श्री नरेश सर यांनी ...
03/08/2026

दि. १ ऑगस्ट २०२६, प्रगती विद्यालयामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. श्री नरेश सर यांनी विद्यार्थ्यांना टिळकांची माहिती सांगितली.

दि. ३१ जुलै २०२६ रोजी विजय शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्यालयातील भाषा शिक्षिक श्री. सुरेंद्र कलोडे सर यांनी स्वेच्छा निव...
03/08/2026

दि. ३१ जुलै २०२६ रोजी विजय शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्यालयातील भाषा शिक्षिक श्री. सुरेंद्र कलोडे सर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. सर्व कर्मचारी, संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांनी सेवापूर्ती समारोहाचा कार्यक्रम आयोजित करून, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत त्यांना पुढील वाटाचाली साठी शुभेच्छा दिल्या.

शनिवार दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी " Muthoot finance"  तर्फे प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्...
03/08/2026

शनिवार दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी " Muthoot finance" तर्फे प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
विजय शिक्षण संस्था या मदतीसाठी त्यांची आभारी आहे !

Address

Plot No/773, Bhante Wadi, MTNL Road, College Gully, Dadar
Mumbai
400028

Opening Hours

Monday 9am - 4pm
Tuesday 9am - 4pm
Wednesday 9am - 4pm
Thursday 9am - 4pm
Friday 9am - 4pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay Shikshan Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vijay Shikshan Sanstha:

Shortcuts

Share