प्रेरणा वाचनालय

प्रेरणा वाचनालय Prerna Library is the only one Government recognized library in jogeshwari. We have more than 4500 b

प्रेरणा वाचनालय हे जोगेश्वरीतील एकमेव सरकारमान्य " क " वर्गातील वाचनालय आहे. 22 वर्षांपेक्षा जास्त वर्षे हे वाचन चळवळीने प्रबोधनाचे काम करत आहे.
वाचनालय हे वस्तीतल्या युवकां व युवतीं मार्फत वस्तीतील विविध प्रश्नांवर विचार मंथन व सामाजिक विकास आकारीत कार्यरत आहे.

15/10/2024

वाचन प्रेरणा दिन

१५ आँक्टोबर
*वाचनप्रेरणा दिन*

डाँ एपीजे अब्दुल कलाम यांचा स्मृतीदिन,
वाचाल तर वाचाल,
पुस्तकांसारखा गुरु नाही.
पुस्तकांसारखा मित्र नाही.
असे वाचनासंबधी कितीतरी सुविचार आपण वाचतो आणि सोडून देतो.
"वाचन" हि आपल्या माणुसपणाची खुण आहे. आपल्या संवेदनशीलतेची खुण आहे.
शालेय पाठ्यपुस्तकातलं वाचन तर होतचं, खुपवेळा ते सक्तीचही असतं, त्यापलीकडे जावूनही वाचन व्हायला हवं, तेच वाचन दिशादर्शक ठरतं.
आज सोशल मिडियामुळे माणसाचं वाचन वाढलयं, फेसबुक, ट्विटर, व्हाटसअप या माध्यमातून खुप लोक खुप काही वाचत आहेत असं एक आभासी चित्र निर्माण होत आहे. हा काळाचा महिमा असला तरी सोशल मिडियावरच वाचन हे जंकफुड सारखं आहे. भुक भागल्यासारखी वाटते, पण सकसपणा नसतोच.
त्यासाठी छापील,पुस्तकांना पर्याय नाही.
मी मुंबईला आलो त्या काळात ट्रेनमधून माझ्या डब्यात एखादा सहप्रवासी वाचताना दिसायचा. आता अशी दृष्य दुर्मिळ होत चाललेत. कधी कधी सकाळच्या ट्रेनमध्ये एखादा धार्मिक पोथीची, मिनी आवृती किंवा अभ्यासाचं काही वाचताना दिसतो. तेवढचं.
असं म्हटलं जातं कि,
पुस्तक नसलेलं घर म्हणजे
खिडकी नसलेलं घर, अशी खिडकी नसलेली घरे वाढलेत. आणि तसं असण्याचं कोणाला काही वाटेनासं झालयं.
अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
पण सोशल मिडियावरील शेंडाबुडखा नसलेल्या पोस्टवरनं आपली मत बनवणाऱ्यांनी पुस्तकं वाचून आपली मतं बदलल्याची उदाहरणे विरळा झालीत.
आज गांधी/नेहरुबद्दल विखारी प्रचाराला बळी पडणारे, प्रत्यक्ष नेहरु-गांधी म्हणालेत हे समजून घेत नाहीत.
"मी नथुराम गोडसे बोलतोय" नावाच्या एकाकी अनैताहासिक प्रचाराला बळी पडलेले "नथुरामायण" नावाचं यातला फोलपणा उघड करणारं पुस्तक आहे हेही माहिती नसती.
पूर्वी लोकांचे आवडते लेखक, आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे असायचे. त्याव्यतिरीक्त विविधता बघणार कोण?
वपु काळे, वि स खांडेकर, गदिमाडगुळकर,
व्यकटेश माडगुळकर
शंकर पाटील
श्री ना पेंडसे
राजन खान
राजन गवस
अनिल अवचट
रत्नाकर मतकरी
शिरीष कणेकर
अच्युत गोडबोले
हि यादी वाढत जाईल,
पण आज अगदी सोशल मिडियावरही काही लोक खुप छान लिहतात,
तेही वाचल जायला हवच ना.
वाचन हि केवळ टाईमपास म्हणून उरकण्याची गोष्ट नाही.
जसं सहल, जेवण, पार्टी यासाठी आपण खास वेळ काढतो, तसा वेळ काढून वाचनाला भेटून बघा,
वाचन तुम्हाला अजूनच समृद्ध करेल.
अन्न, वस्र, निवारा या जगण्यासाठीच्या मुलभुत गरजा आहेत,
पण माणुस म्हणुन
सभ्यपणाकडे, माणुसपणाकडे, विवेकशील बनण्यासाठी,
जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी "वाचन" आवश्यक गोष्ट आहे.
वाचनाची सुरवात करायला कोणतं वय, किंवा शैक्षणिक पात्रता असण्याची गरज नाही, तुम्ही सुरवात तर करा,
आजच्या दिवसासारखा चांगला दिवस असू शकत नाही.
वाचनालय, पुस्तकांची दुकाने, खुप सारी पुस्तकं तुमची वाट पाहतायत, गरज आहे तुम्ही थोडा वेळ काढून त्यांना भेटण्याची,
पुस्तकांबरोबरचा माझा वेळ मला कधीच कंटाळवाणा झालेला नाही, उलट काहीतरी नवीन अनुभवच देणारा ठरला आहे.
हा वाचनानंद आपणा सर्वांना मिळो,
या वाचनप्रेरणा दिनानिमित्त मनपूर्वक सदिच्छा !
💐💐💐
✍ संदेश शंकर बालगुडे
१५/१०/२०१९

काही गोष्टी हायलाइट्स किंवा रेकॉर्डिंग पहायच्या नसतात. जरूर वेळ काढा.आज शुक्रवार दि १४ जुलै २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळे...
14/07/2023

काही गोष्टी हायलाइट्स किंवा रेकॉर्डिंग पहायच्या नसतात. जरूर वेळ काढा.

आज शुक्रवार दि १४ जुलै २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २:३४ वाजता इस्रोच्या चांद्रयान_३ चे उड्डाण होणार आहे!...

आजची आपली कामे त्याप्रमाणे शेड्यूल करा, आणि एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हा!
Live streaming link 👇👇
https://www.youtube.com/live/q2ueCg9bvvQ?feature=share

राजं ...🤔कॉपी पेस्ट पुन्हा शेअर करावीशी वाटली.   क्षमस्व :🙏आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय....
19/02/2023

राजं ...

🤔कॉपी पेस्ट पुन्हा शेअर करावीशी वाटली. क्षमस्व :🙏

आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय...

शिवबा काय होते कसे घडले,
कुणास ठाऊक ते कुणासाठी लढले?
जाऊ दे तो इतिहास कोण विचारतय,
आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय...

माँ जिजाऊंनी शिवबा घडवले,
मावळ्यांनी रक्त सांडून स्वराज्य उभारले,
आम्ही नुसते झेंडे घेऊन मिरवतोय,
आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय....

करून गोळा अठरा पगड जाती,
शिवबानी दिली तलवार त्यांच्या हाती,
आम्ही एकमेकांवर तलवारीने हल्ला करतोय,
आता मी पण दाढी वाढवावी म्हणतोय,
थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय...

शत्रुच्याही मनात घर होतं शिवबाच,
गडकिल्ले जिंकून ध्येय जिंकलं स्वराज्याच,
आम्ही गड किल्ल्यांच्या नावाने पानटपऱ्या काढतोय,
आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय....

संत तुकारामांची ऐकून गाथा,
शिवबानी घातल्या कर्मकांडास लाथा,
आम्ही अजून मुहूर्त पंचांग शोधतोय,
आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय...🤔

📚📚
10/12/2022

📚📚

📚📚📖📖
10/12/2022

📚📚📖📖

६ डिसेंबरसाठी किती भाव , किती श्रध्दा ठायी ठायी । ना थंडी ना वारा , बा भिमा तुझ्याचसाठी ।। 'वाचाल तर वाचाल ' 📘📚📖चैत्यभूम...
05/12/2022

६ डिसेंबरसाठी किती भाव , किती श्रध्दा ठायी ठायी । ना थंडी ना वारा , बा भिमा तुझ्याचसाठी ।।
'वाचाल तर वाचाल ' 📘📚📖चैत्यभूमी दादर 🙏🙏🌹🌹

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवास विनम्र अभिवादन ।🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
05/12/2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवास विनम्र अभिवादन ।🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

24/10/2022

*दिपावली साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणा सर्वाना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!*
💥⚡✨💫🎉🎊..... *हे नववर्ष आपणा सर्वाना आनंददायी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो ह्याच मनोकामना..!!*🎉🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊

Share the festive vibe with deliciously Chocolate & Dry Fruits gift boxes from ORIOLE GIFTS. Enquire Now. Gift your busi...
20/09/2022

Share the festive vibe with deliciously Chocolate & Dry Fruits gift boxes from ORIOLE GIFTS. Enquire Now. Gift your business associates and employees a customized token of gratitude. Spread the love with our royal range of Diwali Gift boxes.

BOOK YOUR ORDERS TODAY !!!!
CALL ON +91 98708 94911

Not just rakhi, give great gifts to brother. Buy specially curated gift hampers at Amazon. Hurry!!! Order Your Gift Hamp...
29/07/2022

Not just rakhi, give great gifts to brother. Buy specially curated gift hampers at Amazon. Hurry!!! Order Your Gift Hamper.

👉 9 Pcs Premium Chocolates Bites in 4 Best Flavours (Coffee, Hazelnuts, Orange & Butterscotch)
👉 1 Designer Rakhi
👉 Free Shipping

Click on Link -

Raksha Bandhan is special, for it celebrates the very special bond between a brother and a sister. And, so, this Rakhi, put in a little more thought behind your gift hamper and let your sibling know how much you care. Oriole Gifts bring you some of the best Rakhi Gift Hampers for Brother and Sist...

If you haven't contributed yet, now is the time ➡️" ONLY 2 DAYS LEFT ".....
15/07/2022

If you haven't contributed yet, now is the time ➡️
" ONLY 2 DAYS LEFT ".....

Address

Mumbai
400060

Telephone

9870894911

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रेरणा वाचनालय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to प्रेरणा वाचनालय:

Share