03/08/2026
लढवय्ये स्वातंत्र्य सैनिक, प्रतिसरकारचे प्रणेते, मार्क्सवादी - कम्युनिस्ट नेते, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील यांना जन्मदिनी SFI तर्फे क्रांतिकारी अभिवादन !
ब्रिटीश राजवटीला सळो की पळो करून सोडले, प्रतिसरकार चालविले, ज्यांचे भाषण ऐकून जनता अक्षरशः उठून उभी राहायची, झुंजार स्वातंत्र्य सैनिक, संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, साम्यवाद - मार्क्सवादावर प्रचंड निष्ठा असणारे, कम्युनिस्ट नेते, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील यांना जन्मदिनी क्रांतिकारी अभिवादन ! त्यांच्या क्रांतिकार्याला लाल सलाम !
क्रांतिसिंह नाना पाटील अमर रहे !