Mahadevkoli Yuva

Mahadevkoli Yuva "महादेवकोळी युवा" - आम्ही युवा नव्या युगाचे.. घडवू क्रांती पर्व महादेव कोळी समाजाचे...! www.mahadevkoliyuva.com

जय आदिवासी । हर हर महादेव ।

प्रत्येक जाती जमातीला स्वतःचा असा इतिहास, संस्कृती, चालीरीती, परंपरा आणि वहिवाट असते, प्रत्येक जाती जमातीचे चे नात्यागोत्याचे, लग्न सम्बधांचे, गोत्र-कुळांचे, भौगोलिक क्षेत्राचे एक ठराविक परीघ असते त्या परिघातच त्यांचा सामाजिक व्यवहार चालतो. पिढ्यांपिढ्यांची नाती त्यातून निर्माण झालेली असतात.

आदिवासी समाजाचा, आदिवासी महादेवकोळी जमातीचा देखील एक स्वतंत्र पुर्वेइतिहास आ

हे, लोकसंस्कृती, चालीरीती, परंपरा, रीतीरिवाज, वहिवाट आहे ती आपल्याला माहित असणे गरजेचे आहे काळाच्या ओघात या सर्व गोष्टी कुठेतरी मागे पडत चालल्या आहेत तथा काहीना त्याचा विसर देखील पडला आहे त्यांचं जतन करून येणाऱ्या नव्या पिढीला त्याची माहिती देणे व त्यातून या सर्व गोष्टींचे संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य, जबाबदारी आहे. आज आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर आपण आपली संस्कृती समजून घेतली पाहिजे व ती जपण्यासाठी वेळीच पाऊल उचलले पाहिजे..

त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात विकासाच्या प्रवाहासोबत आजही मार्गदर्शन अथवा काही मूळ समस्यां अभावी मागे राहणाऱ्या विशेषता ग्रामीण भागातील युवा पिढीला प्रवाहासोबत आणणे देखील गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये शैक्षणिक जागरुकता, करिअर विषयक मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, नोकरी - स्वयंरोजगार मार्गदर्शन, शेतीप्रधान समाजाला कृषी विज्ञान माहिती पुरवणे, विविध शासकीय योजना संबंधी माहिती व मार्गदर्शन करणे समाज विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

महादेवकोळी युवा फाउंडेशन च्या या समाजविकास व युवा सशक्तीकरण उपक्रमात काही माहिती, मार्गदर्शन हे ऑन लाईन स्वरुपात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. काही माहिती तथा कार्यप्रणाली प्रत्यक्षरित्या समाजातील बांधवांपर्यंत येऊन अमलात आणली जाईल त्याकरिता तुम्हा सर्वांना सहभागी होणे गरजेचे आहे. तुम्हाला विविध क्षेत्रात येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण करणे तथा त्यावर काही उपाययोजना अमलात आणणे हे प्राथमिक कार्य आपल्याला करावयाचे आहे.

चला तर मग लागुयात ना कामाला ? तुमच्या समस्या, अभिप्राय, सूचना तुम्ही आम्हाला फोन द्वारे अथवा ई मेल द्वारे आमच्यापर्यंत पाठवू शकता.

आमचा ई मेल पत्ता :

मदत अथवा समस्या : [email protected]
माहिती प्रसारण : [email protected]
सूचना किंवा अभिप्राय : [email protected]

मोबाईल क्र. 8424857878

संकेतस्थळ : www.mahadevkoliyuva.com

जय आदिवासी ।
हर हर महादेव ।

-- "महादेवकोळी युवा" - आम्ही युवा नव्या युगाचे.. घडवू क्रांती पर्व महादेव कोळी समाजाचे...!

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahadevkoli Yuva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mahadevkoli Yuva:

Share