Chhatrapati Shivaji Brigade

Chhatrapati Shivaji Brigade Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chhatrapati Shivaji Brigade, Non-Governmental Organization (NGO), 240, Navsari Bldg, 2nd floor, Above ICICI Bank, Drive D. N. Road, Fort, Mumbai.

सामाजिक जाण असलेल्या समाजातील समाज प्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजोद्धारासाठी व समाजाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू असलेले सामाजिक अभियान म्हणजे छत्रपती शिवाजी ब्रिगेड महाराष्ट्र.
जय भवानी,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय भारत.

22/08/2025
निषेध निषेध निषेध...श्री.प्रवीण दादा गायकवाड यांच्या वरील हल्ला हा आपल्याच बहुजनांना वापरून आपल्याच बहुजन माणसावर घडवलेल...
13/07/2025

निषेध निषेध निषेध...

श्री.प्रवीण दादा गायकवाड यांच्या वरील हल्ला हा आपल्याच बहुजनांना वापरून आपल्याच बहुजन माणसावर घडवलेला भ्याड हल्ला आहे आणि हा भ्याड हल्ला केवळ व्यक्तीवर नसून विचारधारेवर आहे.
मीडिया ज्या बातम्या दाखवत आहेत त्यात सनातनी नेरेटिव्ह आहे..

भाजपा युवा मोर्चाच्या दीपक काटे याने हा हल्ला मराठा समाजाचे नेते व संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला केला आहे

काही दिवसापूर्वीच या काटेला पुणे विमानतळावरती पिस्तुलासहित अटक केलं होतं परंतु वरदहस्त असल्यामुळेच हरामखोर त्यातून बाहेर पडला.आता त्या चौकशीचे काय झालं आणि पिस्तूल बरोबर का होते आणि आता कुठे आहे याचे उत्तर गृहमंत्री देणार का? असो

बहुजन द्वेषी असलेले ठराविक लोक आज बहुजनांची माथी भडकवून त्यांचा स्लीपर सेल सारखा वापर करतात आणि बहुजनांवरच वार करतात ही शोकांतिका फक्त सत्तेचे लालची सत्ताधारी व विरोधातील बहुजन राज्यकर्त्यांमुळे आणि प्रशासनामुळे आहे.

बहुजन आज जर जागा झाला नाही तर एकमेकांना संपवण्यात या नत भ्रष्ट सणातनींचे बाहुले बनवून राहील.

श्री प्रवीण दादा गायकवाड यांची संभाजी ब्रिगेड संघटना ही काही आज स्थापन झालेली नाही मग अचानक हा नावाचा विषय आला कुठून आणि का? आत्ताच का याचा विचार करा आणि समजूतदारपणे आणि सुप्तपणे यांना यांची जागा दाखवा अन्यथा समाजा समाजातील वाढत चाललेली दरी अधिक रुंदावेल आणि बहुजनच एकमेकांचे शत्रू बनवून सनातन्यानची सत्ता उपभोगण्याची लालसा आपल्यामुळे पूर्ण होईल आणि बहुजन कायमच ताटाखालचे मांजर होईल.

*समाज जाहीर निषेध करणार नाही तर या काटेचा आणि तत्सम विचारसरणीचा करेक्ट कार्यक्रम करणार*

छत्रपती शिवाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

https://youtu.be/Tv9sV3w55hM?si=QIo59RZvwasCqwbp

https://www.facebook.com/share/v/1Ge7nTic55/

राम कृष्ण हरी 🌹*रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया. जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर. तुकाराम महाराज पालख...
24/06/2025

राम कृष्ण हरी 🌹

*रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया. जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर. तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये मोफत आरोग्य सेवा वर्ष तेविसावे* मोफत आरोग्य सेवेचे उद्घाटन संपन्न लिज्जत पापड उद्योग समूहाचे महाव्यवस्थापक रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे अखिल भारतीय चे अध्यक्ष सुरेश कोते साहेब यांच्या शुभहस्ते जॉईन एमडी अशोकराव शिंदे तथा रेड स्वस्तिकचे पुणे जिल्हा अध्यक्ष उदयोजक संतोष दादा बारणे यांच्या हस्ते सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ सेवा हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा डॉ स्मिता वाबळे डॉ सुपे मॅडम. यांच्या हस्ते.उद्घाटन संपन्न देहूते पंढरपूर रेडस्व तिक सोसायटी ऑफ इंडियाचे वारी नेतृत्व प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष राजगुरू, यांनी सुत्रसंचालन केले,यावेळी उपस्थित प्रोजेक्ट डायरेक्टर नंदू भाऊ रायगुडे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ उमाकांत वाबळे.सर डॉ संतोष सुपे सर कोषाध्यक्ष कमलेश जी राक्षे पुणे जिल्ह्याचे सेक्रेटरी सचिन जी भामरे सर सौ, भामरे मॅडम विशाली खेमनार चि,प्रथमेश भोसले डॉक्टर सांडभोर डॉ, विनोद ठाकरे रिटायर डेप्युटी डायरेक्टर डॉ दत्ता खुणे गेल्या अनेक वर्षापासून मार्गदर्शन करणारे जयसिंगराव पवार साहेब वसंत गायकवाड श्रीकांत माळी नंदकुमार गावडे माऊली जाधव राहुल भागवत मोटरकर, अपासाहेब आतकरे, राजेंद्र सिद्धू बेडगे, माऊलीजाधव. विजय पायमल्ले सेवा बजावत आहेत,उपस्थित संपन्न. रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया पुणे ब्रांच वतीने वारकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त आरोग्य सेवा देणार स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे प्रोजेक्ट डायरेक्टर तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे चे नेतृत्व करणारे संतोष राजगुरू रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया ही आरोग्य प्राधान्य करणारी संस्था लोकांसाठी आरोग्य जपण्याचं काम करत खूप जोमाने तळमळीने करत आहे.
दिनांक १८ /६ /२०२५.रोजी पालखी देहु मधुन प्रस्थान.. दिनांक ५/ ७/२०२५ रोजी. रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया पुणे ब्रांच च्या वतीने लोणी काळभोर येथुन तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये मोफत सेवा सुरु असुन रेड स्वस्तिक चे आरोग्य सेवेचे तेविसावे वर्ष आहे याचा सार्थ अभिमान आहे. या मोफत आरोग्य सेवेमधे पुणे जिल्हयाला मोलाचं मदत सहकार्य मार्गदर्शन. मा. पोलीस महासंचालक रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक तथा मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय डॉ. श्री टी.एस. भालसाहेब रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे ऑल इंडियाचे अध्यक्ष व लिज्जत पापड उद्योग समूहाचे एमडी आदरणीय श्री. सुरेश कोते साहेब केमिस्ट असोसिएशनचे अ.भा.अध्यक्ष आदरणीय श्री. जगन्नाथ राव अप्पासाहेब शिंदे रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे जॉईंट एमडी.मा श्री. अशोक शिंदे साहेब पुणे जिल्हाध्यक्ष संतोषदादा बारणे प्रोजेक्ट डायरेक्टर नंदू रायगडे, पुणे जिल्हा कार्यध्यक्ष, डॉ, उमाकांत वाबळे, डॉ, संतोष सुपे, डॉ सांडभोर, डॉ, विनोद ठाकरे, डॉ, स्मिता वाबळे, डॉ, सुपे मॅदम,, पुणे जिल्हाचे सेक्रेटरी श्री सचिन शिवाजीराव भामरे,, या देहू ते पंढरपूर वारी नेतृत्व प्रोजेक्ट डायरेक्टर रेड स्वस्तिक तथा, सावता परिषदेचे कार्यध्यक्ष, तथा प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी ओबीसी विभाग, संतोष राजगुरू करत आहेत, रिटायर डेप्युटी डायरेक्टर डॉ, दत्ता खुणे मार्गदर्शक मेडिकलऑफीसर म्हणून सेवा बजावत आहेत
www.redswastik.org

22/06/2025

महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई, थोरले शाहू महाराज यांच्या माहुली संगम येथील समाध्यांचा (स्मृति स्थळांचा) जीर्णोद्धार व सुशोभीकरणाचा शासनाचा अभिनंदनिय निर्णय!

ना. अजित दादा पवार, ना.शिवेंद्रराजे भोसले यांचे त्रिवार अभिनंदन!

प्रथम पुढाकार घेणाऱ्या उद्योगपती श्री. अशोक भाऊ जैन चेअरमन जैन उद्योग समूह यांचेही मनःपूर्वक अभिनंदन!

मी दिनांक १९ मार्च२०२५ रोजी महाराणी ताराराणींच्या उध्वस्त समाधी बाबत,औरंगजेबची कबर तोडण्याआधी स्वराज्य मोगलांच्या टाचेखाली बेचीराख करण्यासाठी आलेल्या क्रूरकर्मा शहेनशहा औरंगजेबला हिंदवी स्वराज्य अबाधित राखण्यासाठी ज्या महाराणी ताराराणींच्या नेतृत्वाखालील मावळ्यांच्या पराक्रमा मुळे महाराष्ट्रातच स्वतःहून गाडून घ्यावं लागलं अशा मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी साहेबांच्या उध्वस्त समाधीची जरा अवस्था बघा!

हा फेसबुकवर लेख लिहिल्यानंतरराज्यभरातून अनेक शिवप्रेमी मान्यवरांनी याची दखल घेतली.मला लगेच दि. १९ मार्च रोजी रात्री आठ वाजून ३५ मिनिटांनी जैन इरिगेशन सिस्टीमचे चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती सेवाभावी व्यक्तिमत्व माननीय श्री.अशोक भाऊ जैन यांचा फोन आला.

मला आश्चर्य वाटलं की श्री.अशोक भाऊंनी यावेळी मला फोन का केला असावा.

मला मा. अशोक भाऊंनी सांगितलं की आपला
महाराणी ताराराणींच्या उध्वस्त समाधी बाबत फेसबूक वर लेख वाचला.

जैन इरिगेशन सिस्टीम, जैन उद्योग समूह या संपूर्ण परिसराच सुशभीकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने करेल असे अशोक भाऊंनी सांगितल्यानंतर मला सुखद धक्काच बसला.

दुसऱ्या दिवशी मी माझे सहकारी पै.श्री. सुहास भाऊ हगवणे, श्री. नंदू भाऊ रायगडे, श्री. कमलेश राक्षे श्री. ढमाले साहेब आम्ही सकाळी तातडीने माहुली संगम येथे भेट देऊन तेथील संपूर्ण परिसराचे अवलोकन केले. तेथील मान्यवर सरपंच उपसरपंच श्री अविनाश कोळपे श्री प्रकाश भाऊ माने श्री. अभिषेक नाले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

दक्षिण काशी म्हणून ओळखला जाणाऱ्या माहुंली संगम येथील विदिर्ण समाध्याची (स्मृती स्थळांची) अवस्था पाहिल्यानंतर दुःखान मन भरून आल.
स्वतःचीच लाज वाटली.

त्यानंतर दिनांक २२ मार्च २५ रोजी कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी सुद्धा मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या अवस्थेबाबत शासनाचे लक्ष वेधून सुशोभीकरणाची मागणी केली.

माननीय श्री अशोक भाऊ जैन यांनी केलेल्या सूचनेनुसार याबाबत जैन इरिगेशन सिस्टीम चे जनसंपर्क अधिकारी श्री अनिल जोशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिनांक १४ एप्रिल२५ रोजी जैन इरिगेशनचे आर्किटेक, श्री क्षीरसागर, श्री अनिल जोशी श्री. ढाके यांच्यासह मी माझे सहकारी श्री नंदूभाऊ रायगडे, पै.श्री. सुहासभाऊ हगवणे, श्री. कमलेश भाऊ राक्षे या आमच्या टीमने माहुंली संगम ला जाऊन तेथील परिसराचं सुशोभीकरण कसं करता येईल यासाठी स्थानिक मान्यवर सरपंच उपसरपंच यांच्यासोबत सविस्तर पुन्हा चर्चा केली.

त्याचा अहवाल जैन इरिगेशनचे चेअरमन श्री अशोक भाऊ जैन यांना दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली.याच बरोबर कोल्हापूरचे डॉक्टर अजित पाटील व त्यांच्या टीमने सुद्धा महाराणी ताराराणी साहेबांच्या समाधी बाबत सुशोभीकरणा साठी पुढाकार घेतला. जैन इरिगेशनच्या आर्किटेक टीमने या समाधीचा (स्मृतिस्थळांचा) सुशोभीकरणाचा संपूर्ण आराखडा तयारी केला.

आनंद याचा आहे की राज्य शासनाने याची दखल घेऊन दिनांक ११जून २५ रोजी अजिंक्यतारा किल्ल्यासह हा संपूर्ण परिसर सुशोभीकरण तेथील शेकडो वर्ष जुने मंदिरांचा जिर्णोद्धार आणि समाधीचा (स्मृती स्थळांचा) जीर्णोद्धार व सुशोभीकरणाचा करण्याचा जो निर्णय घेतला. त्यासाठी३११ कोटी रुपये मंजूर केले.हे अत्यंत अभिनंदनिय आहे.

यासाठी महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय ना.अजित दादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय ना.शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानावे ते थोडेच आहे. कारण या परिसराला पुन्हा ऐतिहासिक वैभव प्राप्त होणार आहे.

लवकरच आम्हा शिवप्रेमींच्या मनातली मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी साहेब, महाराणी येसुबाईंची साहेब व थोरले शाहू महाराज यांची समाधी( स्मृती स्थळे )यासह माहुली संगमावरील भोसले घराण्यातील अनेक अज्ञात समाध्या चा सुद्धा जीर्णोद्धार होईल. ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

यासह महाराष्ट्रातील दक्षिण काशी असणाऱ्या या परिसराला पुनर्वैभव प्राप्त होईल.
गेल्या सात-आठशे वर्षा पासून येथे उभ्या असलेल्या काशी विश्वेश्वर, संगमेश्वर, रामेश्वर या ऐतिहासिक मंदिरांना सुद्धा वैभव प्राप्त होईल. कृष्णा, कोयना, वेण्णा या नद्यांच्या त्रिवेणी संगमाला पावित्र्य प्राप्त होईल.

माननीय नामदार श्री.अजित दादा पवार, माननीय नामदार श्री. शिवेंद्रराजे भोसले ना.श्री.नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयाचे छत्रपती शिवाजी ब्रिगेड,हिंदू रिसर्च फाउंडेशन च्या वतीने आम्ही अभिनंदन करतो.

अशोक एस. शिंदे
संस्थापक
छत्रपती शिवाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य
मुंबई
विश्वस्त
हिंदू रिसर्च फाउंडेशन मुंबई
भ्रमणध्वनी ९४२२२८३२३३

www.hinduresearch.org
www.redswastik.org

19/06/2025

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२५

विठुरायाच्या गजराने दिनांक १८ जुन रोजी देहू येथून सुरू झालेला पालखी सोहळा २ जुलै रोजी लोणी काळभोर मुक्कामी येत आहे.

रेड स्वस्तिक सोसायटी इंडियाचे संस्थापक महाव्यवस्थापक आदरणीय आयपीएस डॉ. टी.एस भाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री सुरेश राव कोते यांचे नेतृत्वाखाली गेली २२ वर्ष विठुरायाच्या माऊलींना वारीदरम्यान अखंड वैद्यकीय सेवा देण्याच्या रेड स्वस्तिकच्या आरोग्य सेवेचे हे २३ वे वर्ष.

२०२५ च्या या पालखी सोहळ्याला आरोग्य सेवा देण्यासाठी रेड स्वस्तिक मार्फत सालाबादप्रमाणे दोन रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी व सेवेकरी लाखोंच्या अत्यावश्यक औषधांसह सेवा देण्यास सज्ज आहेत.

या सेवेच्या शुभारंभ प्रसंगी रेड स्वस्तिक परिवार व आरोग्य सेवेकरी परिवाराला खेडेकर पेट्रोल पंप लोणी काळभोर येथे उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण.

दिनांक : २२ जुन २०२५

ठिकाण : खेडेकर पेट्रोल पंप लोणी काळभोर

वेळ : सायंकाळी ५ वाजता

शुभहस्ते :

श्री सुरेश कोते साहेब, अध्यक्ष रेड स्वस्तिक सोसायटी, महाव्यवस्थापक लिज्जत पापड समूह
श्री. भगवान राऊत, कार्याध्यक्ष
डॉ. श्री प्रमोद नांदगावकर,सह महा व्यवस्थापक

रेड स्वस्तिक पंढरपूर वारी सेवा नेतृत्व : श्री संतोष राजगुरू , प्रकल्प संचालक

मार्गदर्शक:

श्री अशोकराव शिंदे ,सह महा व्यवस्थापक
श्री संतोष भाऊ बारणे, जिल्हाध्यक्ष पुणे
श्री. क्रांतीकुमार महाजन ,राष्ट्रीय समन्वयक, श्री. सुनिल पवार साहेब -नि.पणन संकचालक, श्री. मोहन वर्दे साहेब नि.उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क,
डॉ. उमाकांत वाबळे , डॉ. बबन डोळस, श्री नंदू भाऊ रायगडे ,
डॉ. संतोष सुपे,श्री सचिन भामरे

माननीयांची मोलाची साथ :

डॉ. जयसिंगराव पवार, डॉ दत्ता खुणे से.नि. उपसंचालक आरोग्य विभाग,
डॉ. प्रशांत महाजन , डॉ. पोंडकुले, श्री कमलेश राक्षे , श्री काशिनाथ मिसाळ,
श्री सुहास हागवणे,श्री गुलाब भाऊ दगडे,श्री.निलेश पाटील,श्री.दीप पाटील

स्वागतोत्सुक:

पुणे जिल्हा रेड स्वस्तिक परिवार

आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩www.Re...
26/02/2025

आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩

आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩

www.RedSwastik.org

Chhatrapati Shivaji Brigade Pudhari Ashok Shinde Times Now Navbharat Maharashtra Times Sachin Bhamare Mavalsatya News Dainik Bhaskar Sakal Dainik Jagran Red Swastik Society NHQ Santosh Barne Sakal Vidya Loksatta (newspaper) Maratha Dainik Zunjar @

प्रयागराजच्या यापूर्वीच्या महाकुंभमेळ्या वेळीं रेल्वे स्टेशनवरील चेंगरा चेंगरीत  रेड स्वस्तिक सोसायटी ने वाचवले होते शेक...
29/01/2025

प्रयागराजच्या यापूर्वीच्या महाकुंभमेळ्या वेळीं रेल्वे स्टेशनवरील चेंगरा चेंगरीत रेड स्वस्तिक सोसायटी ने वाचवले होते शेकडो भाविकांचे प्राण!

बरोबर बारा वर्षांपूर्वीची घटना!

रेड स्वस्तिक सोसायटीच्या मानवतावादी आरोग्य सेवेच्या माध्यमातून प्रयागराज येथे महाकुंभमेळ्या मध्ये आलेल्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा पुरवण्याचे उपक्रम सुरू असताना माझ्याकडे या आरोग्य सेवेचा उपक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असल्यामुळे मी माझे मित्र, मार्गदर्शक, पोलीस उपाधीक्षक पांडुरंग सोनवणे, आरटीओ अधिकारी श्री मिलिंददादा खानोरे श्री राजेश सोनवणे आम्ही प्रयागराज येथे मौनी अमावस्या आदल्या दिवशी पोहोचल्यानंतर सकाळी अकराच्या दरम्यान मला आमच्या शेजारच्या तंबू मध्ये राहणारे संरक्षण विभागाचे गोपनीय काम बघणारे मेजर यादव भेटायला आले. त्यांनी सांगितलं की रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाल्याची बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे का? त्यांना सांगितले की माझ्याकडे कुठली माहिती नाही. काही मिनिटातच मला माझे औरंगाबादचे (संभाजीनगर) रेड स्वस्तिक सोसायटी सहकारी श्री. नंदूभाऊ राऊत यांचा मोबाईल आला. त्यांनी सांगितले प्रयागराजला आपली ओळख आहे का? त्यांनी सांगितले की रेल्वे स्टेशनवर कठडा कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झालेली असून औरंगाबाद परिसरातील काही महिला व पुरुष या चेंगराचेंगरीत जखमी किंवा मृत झाल्याची आम्हाला भीती आहे. आपल्या रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून काही मदत करता येईल का?
मी तातडीने डॉ. अजित जाधव सर, डॉ. देशमुख साहेब, डॉ. गणेश पाटील, डॉ. मनोज ठाकरे, डॉ. पाटणकर, डॉ. आर.सी. मिश्रा सर ( कुलगुरू महा कौशल्य विद्यापीठ जबलपूर) श्री. राजेश सोनवणे, श्री.रोहित पांडे पोलीस उपाधीक्षक श्री पांडुरंग सोनवणे साहेब, आरटीओ अधिकारी श्री मिलिंद दादा खानोरे यांना याबाबत माहिती दिली असता आम्ही तातडीने पाच सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टर सह रेल्वे स्टेशन कडे पाठवल्या.
मौनी अमावस्येच्या दिवशी भाविकांच्या प्रचंड गर्दीचा सामना करत रुग्णवाहिका रेल्वे स्टेशनच्या जवळ पोहोचल्या तेव्हा असं लक्षात आलं की रेल्वे स्टेशन मध्ये जाण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आलेली आहे.
आत मध्ये कोणालाही जाऊ दिले जात नव्हते स्थानिक पोलीस अधिकारी कुणाचही ऐकायला तयार नव्हते. तेव्हा रेड स्वस्तिक चे नागपूरचे ज्येष्ठ पदाधिकारी पोलीस उपाधीक्षक श्री पांडुरंग सोनवणे आरटीओ अधिकारी श्री मिलिंद दादा खानोरे यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना त्यांची ओळख देऊन रेल्वे स्टेशन मधील चेंगराचेंगरीची वस्तुस्थिती सांगितल्यानंतर तातडीने त्यांना रेल्वे स्टेशनमध्ये ॲम्बुलन्स सह प्रवेश देण्यात आला. तिथली परिस्थिती अत्यंत अवघड होती अनेक लोक जखमी अवस्थेत पडलेले होती. अनेक जण बेशुद्ध व निपचित पडलेले होते. रेड स्वस्तिक सोसायटीच्या सर्व डॉक्टरांनी तातडीने सर्वांची तपासणी करून गंभीर अवस्थेतील रुग्णांना स्ट्रेचर वर टाकून रुग्णालयाकडे पाठवण्याची व्यवस्था केली. काहींवर जागेवरच उपचार केले. काही वेळे नंतर तेथील शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर, प्रशासकीय यंत्रणा दाखल होऊन सर्वांना सुरक्षित करण्यासाठी कार्यरत झाली.
दुसऱ्या दिवशी आम्ही औरंगाबाद च्या ( संभाजीनगरच्या) जखमी रुग्णांना ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलो असता तेथील जिल्हाधिकारी, कुंभमेळ्याचे प्रमुख अधिकारी, उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री.अखिलेश यादव यांनी आम्हाला बोलवून रेड स्वस्तिक मुळे चेंगरा चेंगरीत गंभीर जखमींचे प्राण वाचल्याचे सांगून रेड स्वस्तिक सोसायटी चे विशेष आभार मानले व रेड स्वस्तिक सोसायटी च्या मानवतावादी आरोग्य सेवेच्या कामाचा गौरव केला होता .

अशोक एस.शिंदे
सहमहाव्यवस्थापक
रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया मुंबई दि.२९/०१/२०२५
मोब.९४२२२८३२३३

Chhatrapati Shivaji Brigade Pudhari Ashok Shinde Times Now Navbharat Maharashtra Times Sachin Bhamare Mavalsatya News Dainik Bhaskar Sakal Dainik Jagran Dainik Zunjar Loksatta (newspaper) Jalgaon Maratha Sakal Vidya Maharashtra Police Red Swastik Society NHQ Santosh Barne

www.RedSwastik.org

Chhatrapati Shivaji Brigade Pudhari Maharashtra Times Times Now Navbharat Sachin Bhamare Ashok Shinde Dainik Bhaskar Sak...
26/01/2025

Chhatrapati Shivaji Brigade Pudhari Maharashtra Times Times Now Navbharat Sachin Bhamare Ashok Shinde Dainik Bhaskar Sakal Mavalsatya News Dainik Jagran Dainik Zunjar Loksatta (newspaper) Jalgaon Maratha Maharashtra Police Sakal Vidya Red Swastik Society NHQ कमलेश राक्षे @

“प्रौढ प्रताप पुरंदर” “महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्” “सिंहासनाधीश्वर”“महाराजाधिराज” “महाराज” “श्रीमंत”श्री छ...
16/01/2025

“प्रौढ प्रताप पुरंदर” “महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्” “सिंहासनाधीश्वर”“महाराजाधिराज” “महाराज” “श्रीमंत”श्री छत्रपती संभाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!

Chhatrapati Shivaji Brigade Pudhari Times Now Navbharat Ashok Shinde Maharashtra Times Sachin Bhamare Dainik Bhaskar Sakal Dainik Jagran Dainik Zunjar Loksatta (newspaper) Jalgaon Maratha Sakal Vidya Maharashtra Police Red Swastik Society NHQ Santosh Barne @

छोट्यांचे बोरन्हाण,मोठ्यांची पतंगबाजीसुवासिनींचे हळदीकुंकू,सर्व घेऊन आला मकरसंक्रांतीचा उत्साह,मकर संक्रांतीच्या हार्दिक...
14/01/2025

छोट्यांचे बोरन्हाण,
मोठ्यांची पतंगबाजी
सुवासिनींचे हळदीकुंकू,
सर्व घेऊन आला मकरसंक्रांतीचा उत्साह,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपला,
छत्रपती शिवाजी ब्रिगेड महाराष्ट्र परिवार
www.hinduresearch.org
www.Redswastik.org

Chhatrapati Shivaji Brigade Pudhari Ashok Shinde Maharashtra Times Times Now Navbharat Sachin Bhamare Mavalsatya News Dainik Bhaskar Sakal Dainik Jagran Dainik Zunjar Loksatta (newspaper) Jalgaon Maratha Maharashtra Police Sakal Vidya Red Swastik Society NHQ Santosh Barne Vikas Modhave

Address

240, Navsari Bldg, 2nd Floor, Above ICICI Bank, Drive D. N. Road, Fort
Mumbai
400001

Telephone

+919422283233

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhatrapati Shivaji Brigade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chhatrapati Shivaji Brigade:

Share