सन १९७५. भांडुपमधील लोकवस्ती तेव्हा विरळ व रस्ते, विद्युत या सारख्या प्राथमिक सुविधांची या विभागात वानवाच होती. येथील बहुतांश रहिवाशी गिरणी कामगार, गोडी कामगार विशेषतः कोकणपट्टीतून आलेले उत्सवप्रिय. नोकरी आणि घर एवढ्यापुरताच आपलं आयुष्य मर्यादित राहाण शक्यच नव्हतं. कोकणातील संस्कृती, गणेशोत्सव, होळीसारखे सण साजरे होऊ लागले होते. या सणांबरोबर गणेश नगर, सर्वोदय नगर , शिवाजी नगर , आणि आसपास परिसरातील
विशीतील तरुणांनी एकत्र येऊन कबड्डी संघाची स्थापना केली. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी सर्वानुमते त्याचे नामकरण स्वस्तिक क्रीडा मंडळ असे केले. मंडळाची स्थापना झाल्यानंतर खेळाबरोबरच शरीरशौष्ठावासाठी व्यायामशाळा असावी म्हणून जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले . त्यात मंडळाचे सर्व सभासद श्रीकांत शिंदे, शेखर तावडे , अजित परुळेकर, प्रदीप शिंदे, प्रकाश आयरे, सुभाष चव्हाण, सदा सावंत, मोहन शिंदे, विश्वनाथ दळवी, प्रदीप शिर्के , पंकज घाग, शिरीष-गिरीश नांदगावकर , सुधाकर चव्हाण, श्रीपाद सागवेकर, दीपक मयेकर , श्रीकांत कानाडे, बाळा आगलावे, आनंद नाईक, सुरेंद्र कांबळी, विलास म्हापणकर, स्वामिनाथ करगुटकर, जीवन राणे, विभागातील ज्येष्ठ दादा शिरगावकर , सुरेश पराडकर, मनोहर कदम, रमेश हरयाण यांच्या सहकार्याने मंडळाचे सल्लागार कै. रघुनाथ कदमशेठ व अशोक देसाई यांच्या माध्यमातून कै. शिवराम लालाशेठ यांनी त्यांच्या मातोश्री रामकलीदेवी यांच्या हस्ते जागा उपलब्ध करून दिली.
१९७७ मध्ये तात्कालीन आमदार कै. दिना बामा पाटील यांचे मोलाचे सहकार्य व्यायामशाळा बांधताना लाभले. व्यायामशाळा सुरु झाल्यावर सर्व कार्यकर्ते रोजच एकत्र येऊ लागले. इतर मंडळांच्या गणेशोत्सवाना भेटी देता देता आपल्या विभागातही उत्सव साजरा करावा असा विचार पुढे आला परंतु आसपास गणेशोत्सव साजरा होत असल्यामुळे आपल्या विभागात नवरात्रौत्सव साजरा करण्याचे सर्वानुमते ठरले.
१९७८ मध्ये प्रथम मंडळाच्या व्यायामशाळेत सर्व सभासदांनी नवरात्रौत्सावला सुरवात करून दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली. उत्सव काळात पुजा आरती , होमहवन, भजन, गरबा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमामुळे परिसरातील वातावरण प्रसन्न व उत्साही राहू लागल्यामुळे रहिवाशांचाही सहभाग लाभू लागला. त्यामुळे व्यायामशाळेतील उत्सव बाहेरील मोकळ्या जागेत मंडप घालुन साजरा करायला सुरवात झाली. देवीची ओटी भरण्यासाठी नवसासाठी लेकी - सुना माहेरवाशिणी संपूर्ण मुंबई आणि आसपास परिसरातील उत्सव काळात गर्दी करू लागल्या आणि अल्पावधीतच "नवसाला पावणारी देवी" म्हणून "स्वस्तिकची दुर्गामाता" प्रसिद्ध झाली.
उत्सवकाळात धार्मिक विधींबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम मुलांसाठी विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव, महिलांसाठी हळदीकुंकू व विविध स्पर्धा घेतल्या जातात व सर्वांच्या कलागुणांना वाव करून दिला जातो. उत्सव मंडपात देखणी सजावट करता करता मंडळाचे कार्यकर्ते मोहन शिंदे, प्रफुल पेडणेकर यांनी व्यावसायिक कला क्षेत्रात चांगले नाव कमावले आहे.
भाविकांकडून मिळालेल्या देणगीमधून धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक क्षेत्रातील चांगल्या कार्यामुळे मंडळाची ३ मजली इमारत उभी असून त्यात सुसज्ज व्यायामशाळा, महिलांसाठी विविध प्रशिक्षण वर्ग, अंगणवाडी, पोलीस लसिकरण केंद्र, नृत्यशाळा आदी उपक्रम चालविले जातात. गरजूंना शैक्षणीक व आरोग्य विषयक मदत केली जाते. विविध शिबिरांचे आयोजन केले जाते.
मंडळाची सामाजिक पार्श्वभूमी पाहून मान. नगरसेवक श्री. सुरेशभाई कोपरकर यांनी मंडळाला वातानुकुलीत रुग्णवाहिका भेट दिली. त्याचाही जनसेवेसाठी चांगला उपयोग होतो.
अशा या मंडळाची धुरा अध्यक्ष म्हणून नगरसेवक कै. के. टी. थापा, माजी आमदार शाम सावंत, सीता मुखिया, चंद्रकांत बोबडे, यांनी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने वाहिली. त्याच परंपरेने १९९७ पासून श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जीवन राणे, संतोष करलकर, प्रदीप शिंदे, अजित परुळेकर, सुनील कदम, नितीन नाईक, किशोर पार्टे, राजू तावडे, सुधीर घोसाळकर या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या जोडीने नितीन करलकर, रोशन सावंत, वैभव-मनोज रोहीलकर , अंकुश कदम, निलेश राणे, संजू पानपट्टे, शशिकांत सागवेकर, संजू कवठणकर, किशोर घोसाळकर,अनिल कदम, निखील बागवे, अजित आंब्रे व असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे मंडळाचे कार्य अविरत चालू ठेवले आहे.