23/08/2024
जागृत मरीमाता देवस्थान शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्ट बोदवड येथे मरीमाता देवस्थान महापूजेचा कार्यक्रम व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण संपन्न झाला...
----------------------------------------
सालाबादाप्रमाणे श्रावण महिन्यात करण्यात येणारी मरीमाता महापूजा या वर्षी दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी मंदिराचे पुजारी व संस्थापक श्री. देविदास राखोंडे व सभासद तसेच समस्त गावकरी मंडळी यांचे हस्ते देवीची पूजा व आरती करण्यात आली.
जे.एम.डी शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्ट व आर एस आर्ट स्टुडिओ आर्ट गॅलरी मुंबई यांनी होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही, पेन वितरण प्रमुख पाहुणे देविदास राखोंडे संस्थापक, सविता कपले शिक्षिका, राधाबाई माळी शिक्षिका, लीलाबाई राखोंडे विश्वस्त, यशोदास राखोंडे लासलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई, अध्यक्ष निवृत्ती राखोंडे, उपाध्यक्ष संतोष तेली यांचे हस्ते करून कार्यक्रमाचे समारोपन करण्यात आले.
सहकार्य- सरला नायडू Artequest art gallery, भिका भाऊ नन्नवरे, कैलासभाऊ मंत्री, प्रशांत बनकर, मुकेश कपले, जीवन माळी, सुनील जैस्वाल, विवेक सूर्यवंशी,बाळू नेरकर, पांडुरंग कदम, भूषण मराठे,रेखा राखोंडे, दिनकर कुसुंबे, धर्मेश राखोंडे, राजश्री राखोंडे, कृष्णा मराठे, गजानन बिल्होरे, एकनाथ धुमाळे, पुंडलिक माळी, रवी मराठे, ज्ञानेश्वर कारले , अंबादास राखोंडे, रवींद्र नेरकर.
जे एम डी ट्रस्ट विद्यार्थी व महिलांना प्रोत्साहन देण्याकरिता असेच कार्य प्रत्येक वर्षी राबवित असते. NGO ला जॉईन होण्याचे आव्हान जागृत मरीमाता शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्ट बोदवड यांनी केले आहे. 8108280280/9029028889