Kamathipura Ki Awaz

Kamathipura Ki Awaz Kamathipura Ki Awaz gives voice to Kamathipura residents who have been fighting for their identity for decades.

Join Us & support us to close down Red Light Area of Kamathipura. Sign our petition https://www.change.org/SaveKamathipura

नमस्कार मी एक छोटासा प्रयत्न करत आहे की या गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रातील लोकांनी कामाठीपुरा विभागाला कामा...
18/09/2026

नमस्कार मी एक छोटासा प्रयत्न करत आहे की या गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रातील लोकांनी कामाठीपुरा विभागाला कामाठीपुरातील गणेश मंडळांना भेट द्यावी जेणेकरून प्रसिद्धीच्या उघापासून दूर असलेला आपला विभाग लोकांच्या समोर आणि जगाच्या समोर यावे जेणेकरून आपल्या मंडळांना जी आर्थिक उणीव दरवर्षी जाणवते पुढे चालून ती जाणवणार नाही अशी आशा व्यक्त करतोय त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पुनर्विकास होत असताना कामाठीपुरातील किती मंडळ पुढे चालून राहतील हे तर गणरायालाच माहिती आहे त्या कारणास्तव हा वर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोस्ट पोहोचवा आपल्या स्टेटस वरती ठेवा आपल्या परिजनांना आपल्या मित्रांना कामाठीपुरातील सर्व मंडळांना भेट देण्यासाठी सांगा

आपला

रुकेश गिरोल्ला

15/09/2026

📰 गणरायांच्या भक्तीत रंगला ऐतिहासिक कामाठीपुरा!

३० हून अधिक गणरायांचे भव्य दर्शन; गल्लीबोळात भक्तीचा जल्लोष, आकर्षक सजावट आणि उत्साहाचे वातावरण

मुंबई | कामाठीपुरा : मुंबईतील ऐतिहासिक कामाठीपुरा परिसर गणेशोत्सवाच्या उत्साहाने फुलून गेला आहे. कामाठीपुरातील विविध गल्ल्यांमध्ये ३० हून अधिक गणरायांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, गणेशभक्तांसाठी हा उत्सव विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

पी.पी. रोडचा राजा, कामाठीपुराचा राजा, मुंबईचा मोरया, कामाठीपुराचा महागणपती, कामाठीपुराचा सम्राट, मुंबईचा विघ्नेश्वर, कामाठीपुराचा महाराजा,बाप्पा बर्फानी, मुंबईचा वरसिद्धिविनायक, कामाठीपुराचा गणराज, मुंबईचा गणाध्यक्ष, दक्षिण मुंबईचा कैवारी, कामाठीपुराचा लंबोदर, कामाठीपुराचा इच्छापूर्ती गणराज, सुंदर गल्लीचा सुखकर्ता, कामाठीपुराचा चिंतामणी यांसह अनेक प्रसिद्ध गणरायांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

“एक गल्ली – एक वेगळा गणराया, पण भक्ती एकच!”

कामाठीपुरातील प्रत्येक गल्लीमध्ये गणेशोत्सवाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली असून, आकर्षक सजावट, रोषणाई आणि विविध धार्मिक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.

🙏 कामाठीपुरातील ३० हून अधिक गणरायांचे दर्शन घ्या!

मुंबईकर आणि गणेशभक्तांनी यंदाच्या गणेशोत्सवात ऐतिहासिक कामाठीपुराला आवर्जून भेट देऊन विविध गणेश मंडळांतील गणरायांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

**गणपती बाप्पा मोरया!

मंगलमूर्ती मोरया!**

रुकेश गिरोल्ला

12/09/2026
कामाठीपुराचा टेंडर निघालं कामाठीपुराचा वर्क ऑर्डर निघालं कामाठीपुरातली इमारत चाळीस वरुन 65 माळ्यावरती गेली,10 लाख कॉर्पो...
19/05/2026

कामाठीपुराचा टेंडर निघालं कामाठीपुराचा वर्क ऑर्डर निघालं

कामाठीपुरातली इमारत चाळीस वरुन 65 माळ्यावरती गेली,

10 लाख कॉर्पोरस फंड मिळणार म्हणून आस वरती ठेवलं होतं आणि अता ते पाच लाख झालं

कामाठीपुराचा विकास होत असताना सोळाशे करोड रुपये मालमत्ता हे म्हाडाला विकण्यासाठी देण्याचा ठरलं

प्रत्येकाला कार पार्किंग न देता चारच्या मागे एक कार पार्किंग ठरली

अजून खूप काही गोष्टी ठरलेल्या आहेत तरीसुद्धा कामाठीपुरा विकास समितीला कामाठीपुरातील रहिवाशांचि एकत्र बैठक घेऊन या सर्व गोष्टी सांगाव्या असं वाटलं नाही 🙂

जणू काही या कामाठीपुरा समितीला लोकांनी निवडून दिले आहे 😌 लोकांच्या सहमतीने कामाठीपुरा समिती ही कामाठीपुरा तिल रहिवाशांनी बनवली आहे ?

कामाठीपुरातील लोकांना गरज आहे म्हणून मनाला वाटेल तसं सर्व गोष्टी होत आहेत आणि लोक गप्प बसलेले आहेत

आता तरी उठा नाही तर कायम चे झोपा

आपणा सर्वांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की मागील महिन्याच्या 22 किंवा 24 तारखेला आशाताई मामेडी यांनी समितीला पत्र दिले होते की पुनर्विकासंबंधी चर्चा करण्यासाठी वेळ देण्यात यावी,

समितीने वेळ न देता त्यावरती एक असे पत्र दिले ज्यामध्ये असे लिहिले होते की आपली प्रश्नावली आम्हाला देण्यात यावी त्यानुसार आम्ही तुम्हाला वेळ देऊ एवढा कसला मजूरपणा आशाताई यांना कामाठीपुरा येथील दहा हजार मतदानापैकी 8,000 मतदान झाले आहे, याचा विसर पडला का आणि त्यांच्या पाठी तुम्ही फिरत आहे, ते कोणाच्या जीवावरती निवडून आले हे सर्वांना माहिती आहे आणि हे देखील विसरून चालणार नाही त्यांना लोकांनी कामाठीपुरातील नाकारलेला आहे...

आशाताईंनी त्यावरती 11 प्रश्नांची एक पत्र समितीला दिले आहे आज ते पत्र देऊन सुद्धा 15 दिवस झाले आहे

हे जर असे चालू राहिले तर खूप कठीण होणार आहे रहिवाशांसाठी एवढा मात्र नक्की

Asha Mamidi Asha Vichare Mamidi ताई तुला उभ राहाव लागेल, कामाठीपुरा चा पर्याय बनाव लागेल... कामाठीपुरा मधील लोकानी नगरसेवक म्हणुन तुलाच मतदान केले

Kamathipuracha Raja Asha Vichare Mamidi

19/12/2025

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kamathipura Ki Awaz posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share