07/07/2026
📢 निवेदन
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस (अकलूज) येथील चोंढेश्वरवाडी येथे कै. उषा विजय साठे यांची भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत संतापजनक असून कायदा व सुव्यवस्थेला काळिमा फासणारी आहे. या घटनेचा आरक्षण बचाव समिती, महाराष्ट्र तीव्र निषेध व्यक्त करते. पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि शासनाने पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करावी, या उद्देशाने आम्ही पुढील मागण्या करीत आहोत.
प्रमुख मागण्या :
✅ आरोपींना फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा द्यावी.
✅ पीडित कुटुंबाला किमान ₹५० लाखांची आर्थिक मदत द्यावी.
✅ कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी.
✅ पीडित कुटुंबाला त्यांच्या मागणीनुसार सुरक्षित ठिकाणी घर किंवा भूखंड उपलब्ध करून द्यावा.
✅ पिस्तुलाचा परवाना ज्यांच्या नावे आहे, त्या व्यक्तीलाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे.
✅ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ व त्याअंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार पीडित कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे तसेच त्यांना मिळणारी सर्व आर्थिक मदत, शासकीय योजना व सवलतींचा लाभ त्वरित प्रदान करण्यात यावा.
✅ या प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल व जलद तपास करण्यात यावा.
न्याय मिळालाच पाहिजे!
– आरक्षण बचाव समिती, महाराष्ट्र
मा. महादेव गालफाडे
मुख्य प्रवक्ता