22/09/2026
छोटा शास्त्रज्ञ शिवम खरपुडे
सिमु सॉफ्ट एका युरोपियन कंपनीचा ब्रँड अँबेसिडर
जगात पहिला क्रमांक मिळवणारी जिल्हा परिषदेची मराठी शाळा जालंदर नगर आणि ही शाळा निर्माण करणारे दत्तात्रय वारे गुरुजी यांचा हा विद्यार्थी अशा स्वरूपाच टॅलेंट आणि प्रचंड कॉन्फिडन्स असलेली मुले या मराठी शाळेतून निर्माण होतात .
बोगस शिक्षण पद्धतीचे सर्व नियम बदलणाऱ्या शाळा....
संपूर्ण देशात एक नंबरची शाळा जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी
संपूर्ण जगात एक नंबरची शाळा जिल्हा परिषद शाळा जालिंदर नगर
दोन्ही शाळा जिल्हा पुणे
आधुनिक जगात मुलांचे करिअर करायचे असेल तर
1 मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये आणि सीबीएससी सारख्या बोर्ड मध्ये शिक्षण दिले पाहिजे
2 1 लाख 2 लाख 5 लाख फी घेणाऱ्या अतिशय अत्याधुनिक इंटरनॅशनल स्कूल मध्ये मुलांना शिकवले पाहिजे
3 गावात चांगल्या शिक्षणाच्या सुविधा नाही म्हणून आम्ही मुंबई पुण्यात किंवा शहरात मुलांना घेऊन आलो मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही गाव सोडले
4 इंग्लिश मिडीयम च्या मोठ्या आधुनिक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळते
मुलांना डॉक्टर इंजिनिअर किंवा मोठे शिक्षण द्यायचे असेल तर खाजगी दुकानदारी शिक्षण संस्थांमध्ये करोडो रुपये खर्च करावे लागतात
हे सर्व नियम जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेच्या माध्यमातून खोटे ठरवणारे गुरुजी दत्तात्रय वारे आणि त्यांच्या जिल्हा परिषदेच्या गावातील शाळा
जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी
जिल्हा परिषद शाळा जालिंदर नगर
जिल्हा पुणे
1 या दोन शाळांमधील मराठी माध्यमात शिकणारी मुले
मराठी इंग्रजी हिंदी जापनीज आणि संस्कृत पाच भाषा शिकतात
अतिशय दर्जेदार इंग्रजीमध्ये सुद्धा बोलतात (ज्या शाळेत मुले पाच भाषा बोलतात ते ग्लोबल शाळा ) चार आणि पाच वर्षाची मुले असताना या मुलांना भाषा शिकवल्या जातात,
2 या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दुसरी आणि तिसरी मध्ये आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवता येते, शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त लहानपणापासूनच हे विद्यार्थी त्यांना जो विषय आवडतो त्या विषयात इंटरनेट आणि आता AI च्या माध्यमातून शिकायला सुरुवात करतात
3 केवळ ॲकेडमीक शिक्षण नाही, या शाळेतील विद्यार्थी आपल्याला काय आवडतं त्याचे शिक्षण घेतात आणि म्हणूनच यशस्वी होण्याची शक्यता 90% जवळपास शंभर टक्के बनते, हा रिझल्ट जगातील कुठली शिक्षण पद्धती देऊ शकणार नाही. अर्थात ही शिक्षण पद्धती भारतीय प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धती च्या जवळपास जाणारी आहे.
4 शाळेत मार्क लागतात, चांगले मार्क मिळवण्यासाठी पुस्तकी शिक्षण या शाळेतले विद्यार्थी चार-पाच महिन्यात पूर्ण करतात, याशिवाय भरपूर वेळ उरतो या वेळेत त्यांना आवडते ते शिकतात
5 या शाळांमध्ये चार विद्यार्थ्यांच्या मागे एक कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आहे, अगदी हँडीक्राफ्ट पासून, चित्रकला डिझाईनिंग, आर्किटेक्ट डिझाईन, विविध कला ही मुले ऑनलाइन शिकतात , आपली आवड आणि कला जपण्यासाठी एक स्वतंत्र दिवस आणि सर्व व्यवस्था या शाळेमध्ये आहे. त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे विद्यार्थी घडतात
6 केवळ गुरुजींवर अवलंबून न राहता लहानपणापासूनच मुलांना सेल्फ स्टडी ची सवय लावली जाते आठवी आणि दहावीची मुले बाकी मुलांना शिकवतात,
शाळेत वर्गात शिकण्यापेक्षा मुलांचे पाच सहा विद्यार्थ्यांचे ग्रुप बनवले आहेत, सर्व वर्गाची मुले एकत्र बसून शिकतात, त्यांना शिकवणारा दादा किंवा ताई तेच ठरवतात, अडचणी आल्या तर एकमेकांना विचारतात, आवश्यकता असेल तरच गुरुजींची मदत घेतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्वतः शिकण्याची वृत्ती वाढते, या सर्व प्रक्रियेमध्ये गुगल इंटरनेट ,चॅट जीपीटी ,आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची खूप मदत होते. जगातील विविध भाषा सुद्धा ही मुले इंटरनेटवर शिकतात
7 टेक्नॉलॉजीचा प्रचंड आणि अतिशय प्रभावी उपयोग दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये केला जातो
8 या शाळांचे स्वतःचे मंत्रिमंडळ आहे शाळेचे नियम विद्यार्थी ठरवतात आणि शाळा विद्यार्थी चालवतात त्यामुळे कोणतीही मोडतोड किंवा बेशिस्त या शाळेत नाही . शाळेतील कॉम्प्युटर डिजिटल बोर्ड सर्व मुले सांभाळतात
या शाळांमध्ये डिजिटल शाळा डिजिटल बोर्ड, रोबोटिक लॅब अगदी विमान बनवणे dron बनवणे सर्व प्रकारचे प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे दुसरी तिसरीची मुले dron उडवतात
9 सातवी नंतर यातील बरीचशी मुलं ओपन स्कूल हा पर्याय निवडतात, आणि त्यामुळे पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये न शिकता दिल्ली बोर्ड ओपन स्कूलमध्ये शिकून आठवीला असताना दहावीची परीक्षा देतात, दहावीला असताना बारावीची परीक्षा देतात आणि सर्वजण अतिशय चांगले मार्क घेऊन पास होतात, या परीक्षा इंग्लिश मीडियम मध्ये देतात त्यामुळे इंग्रजीमध्ये मुलांनी शिकले पाहिजे हा विषय सुद्धा संपून जातो. ओपन स्कूलच्या नियमाप्रमाणे चौदाव्या वर्षी दहावी आणि सोळाव्या वर्षी बारावी पास झाल्यामुळे या मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पारंपारिक शाळेच्या विद्यार्थ्यांपेक्षा दोन वर्ष मिळतात, या वेळेत या विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून घेतला जातो आणि यातील खूप सारे मुले NEET,JEE सारख्या परीक्षा उत्तीर्ण लाखो रुपयांच्या
ट्युशन क्लासेस ला न जाता थेट एमबीबीएस किंवा इंजीनियरिंग साठी सिलेक्ट होतात, अनेक मुलांनी देश-विदेशातील स्कॉलरशिप मिळवल्या आहेत .
आता सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे
लाखो रुपये फी घेऊन शिकवणाऱ्या व्यावसायिक शाळांच्या ऐवजी ही जिल्हा परिषदेची मराठी शाळा शून्य फी घेऊन या मुलांना या दर्जाची शिक्षण देते,
कोणताही मोठा खर्च न करता मुले एमबीबीएस किंवा उच्च शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षा क्लियर करून प्रवेश घेतात
एमपीएससी यूपीएससी आय ए एस, आय पी एस सारख्या सरकारी परीक्षा तयारी लहानपणापासून करतात त्यामुळे सिलेक्ट होण्याची शक्यता वाढत जाणार आहे, अतिशय शिस्तबद्ध वातावरणात आणि दर्जेदार आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण या मुलांनी घेतल्यामुळे ही सगळीच मुले आयुष्यात यशस्वी होणार आहेत, यातील अनेक मुले आपल्याला शिक्षक म्हणून करिअर करायची आहे असा विचार करून वॉलेंटियर स्वयंसेवक म्हणून आपल्या शाळेत शिक्षक म्हणून संस्थेला मदत करतात. खूप सारी मुले केवळ विदेशात आणि मुंबईत जाऊन नोकरी करणार असं न म्हणता पुन्हा गावाकडे येऊन आपले उद्योग उभा करणार असाही विचार करू लागली आहे.
आता सर्वात महत्त्वाचं
वाबळेवाडी ची शाळा ही संपूर्ण भारतात सर्व खाजगी शाळा न मागे टाकून देशातील एक नंबरची शाळा आहे
चार-पाच वर्षांपूर्वी सुरु झालेली जालिंदर नगरची जिल्हा परिषदेची मराठी शाळा
ही भारतातल्या नव्हे जगातल्या मोठमोठ्या उद्योगपतींच्या खाजगी शाळांना मागे टाकून जगातली एक नंबरची शाळा आहे
आणि ही सर्व क्रांती केली आहे एका जिल्हा परिषदेचे शिक्षकांने, दत्तात्रय वारे
या शिक्षकाच्या जिद्दीला शतशत नमन
कौतुक आहे या दोन गावातील गावकऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे कुठेही आमचं नाव पाटीवर लावा असं न म्हणता या गावकऱ्यांनी करोडो रुपये किमतीची जागा शाळेला दिली आहे, स्वतःच्या पैशातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर बनवले आहे, गावकरी स्वतः येऊन शाळेचे व्यवस्थापन पाहतात,
शाळा ऑटो पायलट मोडवर चालते,
भारताच्या किंबहुना जगाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती करणारे हे शिक्षक आणि हे गावकरी खरंच हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे खरी क्रांती याच महाराष्ट्रतून होते आणि होईल.
शिवस्वराज्य लोक चळवळीची प्रमुख कार्यकर्त्यांची टीम घेऊन काल आम्ही दिवसभर या दोन शाळांमध्ये जाऊन माहिती घेतली, दत्तात्रय वारे गुरुजींबरोबर पुढच्या काळात मराठी माध्यमाच्या शाळा या विषयात कोकणात मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवस्वराज्य लोक चळवळ काम करणार आहे.
ज्या गावकऱ्यांना वाटतं आपल्या शाळा या दर्जाच्या विकसित व्हाव्यात, आणि त्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची ज्या गावकऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची तयारी आहे त्यांनी संपर्क साधा, दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या मदतीने हे मिशन आता राज्यभर नेऊया
संपर्क निरंजन अहेर +919833638989
समन्वयक शिवस्वराज्य मराठी शाळा संवर्धन समिती
पुन्हा एकदा दत्तात्रय वारे गुरुजी आपल्या जिद्दीला आणि गावकऱ्यांच्या परिश्रमाला प्रणाम
जय शिवराय
संजय यादवराव / किशोर धारिया /निरंजन आहेर /प्रशांत पाटील /बाबासाहेब भोसले / अजय पाताडे / गणेश लाड