कोकण जनकल्याण परिषद

कोकण जनकल्याण परिषद कोकण औद्योगिकरणात सक्षम करून नोकरी व उद्योगाच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील संस्था.

पाठीशी पहाडासारखा उभा असणारा सह्याद्री आणि पायाशी लोळण घेणारा अरबी समुद्र या दोहोंच्या बाहुपाशात वसलेला प्रदेश म्हणजे कोकण. परशुरामाने एका बाणात समुद्र मागे रेटवून बनवेला प्रदेश म्हणून हा कोकणाचा पौराणिक इतिहास.

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कोकण आता मात्र लोकांअभावे ओस पडत चालला आहे, हाती काही फारस काम नसल्याने पोटापाण्याच्या शोधात मुंबई पुण्यासारख्या शहराकडे मोठ्या प्रमाणावर होणारे विस्थापन हे याच

े मुख्य कारण आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्यासारखा जरी हा प्रदेश असला तरी मुख्य पायाभूत सुविधांचा असणाऱ्या अभाव आणि वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी हाती नसलेला पैसा याने कोकणात पर्यटन हे उद्योगाचे साधन बनू शकेल याची अपेक्षा धुसरच..

जगाच्या पाठीवर कोणतंही पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण घ्या, तिथे असणारी मनोरंजनाची साधने, बाजारपेठ, आरोग्याच्या सोयी, दळणवळणाच्या सोयी, राहण्यासाठीच्या उत्तम सोयी अशा मूलभूत सोयी असल्याशिवाय पर्यटक त्या ठिकाणी येत नाहीत.

यासर्व सुविधा होण्यासाठी प्रथम येथील होणारे विस्थापन कुठेतरी थांबणे महत्वाचे आहे आणि याचसाठी येथील हातांना नोकरी किंवा उद्योगाच्या सोयी त्यांच्याच मातीत होणं ही काळाची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारे रोजगार हे फक्त औद्योगिकरणच करू शकते यासाठी आता पर्यन्त झालेले जिंदाल, फिनॉलेक्स आणि पुढे होऊ घातलेले असे स्टरलाईट, जैतापूर अणुऊर्जा, आयलॉग, सी वर्ल्ड, रत्नागिरी रिफायनरी इत्यादी प्रकल्प कोकणात होणे गरजेचे आहे.

कोकण जनकल्याण परिषद ही अशा प्रकल्पांद्वारे निसर्गाचा ऱ्हास होऊ न देणे अथवा त्याला तितक्याच ताकदीचा पर्याय निर्माण करून कोकणाला औद्योगिकरणात सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणारी संस्था आहे. कोणत्याही प्रकल्पबद्दलच्या गैरसमजुती आणि अंधश्रद्धा शास्त्रीयदृष्ट्या दूर करणे हा या संस्थेचा मुख्य हेतू असेल.

तर चला मग, शुभस्य शीघ्रम..

कोकणचा सर्वांगीण शाश्वत विकास, हाच आमचा ध्यास..!

Address

Vakola Pipelines
Mumbai
400055

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोकण जनकल्याण परिषद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to कोकण जनकल्याण परिषद:

Share