महाराष्ट्राचा इतिहास

  • Home
  • India
  • Mumbai
  • महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राचा इतिहास Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्राचा इतिहास, Mumbai.
(8)

“वीरभूमीच्या शौर्यकथा, गड किल्ल्यांचा अभिमान, आणिशूरवीरांच्या बलिदानाची गाथा आम्ही आहोत ‘महाराष्ट्राचा इतिहास’.
शिवछत्रपतीं पासून मराठेशाहीपर्यंत, आजच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशापर्यंत प्रत्येक अभिमानास्पद क्षण जपण्यासाठी आम्ही आहोत तुमच्या सोबत!

सरसेनापती येसाजी कंक यांचा ऐतिहासिक वाडा.येसाजी कंक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पराक्रमी सरसेनापती ...
19/08/2026

सरसेनापती येसाजी कंक यांचा ऐतिहासिक वाडा.

येसाजी कंक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पराक्रमी सरसेनापती होते. स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्पण केला. हा वाडा म्हणजे त्यांच्या शौर्याचा आणि स्वराज्यनिष्ठेचा साक्षीदार आहे.

नदीची नांगरणी का करावी?नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर....शहादा तालुख्यातील घटनाअवश्य वाचा व आपल्या गावातह...
19/08/2026

नदीची नांगरणी का करावी?

नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर....शहादा तालुख्यातील घटना

अवश्य वाचा व आपल्या गावातही अंमलात आणा.

शेत नांगरावे लागते ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे , पण नदी नांगरणे हे ऐकायला कसेसेच वाटते ना ? सतरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ,पण तिचे समकालीन मूल्य मात्र आजही तितकेच आहे.
शहादा तालुक्यातील गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेडा हे गाव . गोमाई मध्यप्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
*२००० ची गोष्ट आहे. डांबरखेडा परिसरात अचानक असे लक्षात आले की , परिसरातील बऱ्याच विहिरी , बोअरवेलना पाणी येत नव्हते. चारसहा महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहीरी , बोअर मृत . पाचशे ते सातशेफुटापर्यंत जलस्तर खोल गेला . लोक बोअरची खोली तेवढी वाढवत होते. पण पाणी वरती येत नव्हते .असे का ? शेतकरी हैराण. कुणाकडे नीट उत्तर नव्हते.
मोतीलाल पाटील ( पटेल ) तात्या. नांदरखेडा त्यांचे गाव. शहाद्याला त्यांना डांबरखेड्यावरून जावे लागते . त्यामुळे डांबरखेड्याची पाणी समस्या मोतीलाल तात्यांच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली होती. तात्या पुणे विद्यापीठाचे १९७० चे एम एस्सी ऍग्री . डांबरखेड्याची ही समस्या सार्वजनिक होती. गावात नदी असून विहरी , बोअर कोरड्या होत्या. सर्वचजण विचारात पडले होते , पण उत्तर सर्वांकडे नव्हते.
तात्यांनी एकेदिवशी डांबरखेड गावाच्या सरपंचांना मनातल्या चार गोष्टी सांगितल्या . खूप दिवसानंतरच्या आपल्या चिंतनाचा परिपाक लोकांपुढे ठेवला. समस्येचा मुळापर्यंत जाऊनच उत्तर सापडतात. आणि ती चिरस्थायी असतात. जलस्तर खोल गेला या समस्येवर तात्यांनी सांगितलेला उपाय अगदीच वेगळा होता. काहीसा वेडेपणाचा , पण त्यामागे अभ्यास , संशोधन आणि चिंतन होते. लोकांनी तात्यांचे ऐकले आणि पाचशे ते सातशे फुटावर गेलेला जलस्तर चक्क नव्वद फुटावर आला.
डांबरखेडच्या लोकांसाठी तात्यांनी स्वतः डिझल पुरवले , ट्रॅक्टर , लाकडी नांगर , लोखंडी नांगर अशा साधनांनी गोमाई नदी उन्हाळ्यात नांगरायला सुरुवात केली. लोखंडी फाळ वाकले. चार किमी. नदी आडवी नांगरायचा हा अजब प्रयोग काहीसा चेष्ठेचा विषय झाला. गावकऱ्यांनी फक्त फक्त एक किलोमीटर इतकीच नदी नांगरली. जून कोरडा गेला , जुलैत पहिला पाऊसपूर आला . मात्र गोमाईचा हा पूर तापीला भेटायला गेला नाही. नांगरलेल्या नदीने रात्रीच सर्व पूरपाणी पिऊन टाकले . अवघ्या चोवीस तासात पाचशे फुटावरचे पाणी नव्वद फुटावर आले.लोक आनंदले.सकाळी परिसरातील मोटारींनी फोर्सने पाणी फेकले.
तत्कालीन जिल्हाधिकारी असीमकुमार गुप्ता यांनी नदी नांगरण्याच्या या अभिनव प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मोतीलाल तात्यांना " वॉटर मॅन ऑफ शहादा " असे संबोधून तात्यांचे तोंडभरून कौतुक केले होते .महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मोतीलाल तात्यांच्या या जगावेगळ्या प्रयोगाची पाहणी करून कौतुक केले.
नदी नांगरण्याची ही अभिनव कल्पना कशी सुचली ? या विषयी सांगताना तात्या बोलले , " दरवर्षी येणाऱ्या गढूळ पूरपाण्यातले 'फाईन पार्टीकल' वाळूत साचून साचून दोन-तीन फुटावर हे पार्टीकल सेटल होतात , थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत जाते. अर्थातच पाणी खाली न झिरपता वाहून जाते. माझ्या अनेक वर्षांच्या अभ्यास आणि चिंतनातून मला समस्येचे हे कारण लक्षात आले. "
खेतीया या मध्यप्रदेशातील शहारापर्यंतच्या अनेक गावातील लोकांनी नंतर सातत्याने गोमाई नदी नांगरली आहे , आणि वाहून जाणारे पाणी आपल्याच गावात जिरवले आहे. हे तात्यांच्या कल्पक प्रयोगाचे फलित आहे. निराश न होता , आत्महत्येचा पर्याय न अवलंबता शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीचा जलस्तर जिवंत करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतल्यास उत्तर नक्की सापडेल. मोतीलाल तात्या पटेल या वेड्या माणसासारखा परिपक्व विचार शेतकऱ्याने करावा बस.

माझी सर्वाना विनंती आहे की हा प्रयोग प्रत्येक गावाने केला तर आपले गाव पण पाण्याच्या समस्येतून मुक्त होईल.
Milind Panpatil Sir.

वाईट बातमी 😢😢😢
19/08/2026

वाईट बातमी 😢😢😢

18/08/2026

घाटकोपर रेल्वे स्थानकावर घडलेली घटना रेल्वे पोलिसांनी तरुणाला सुखरूप वाचवले
लिंक कंमेंट मध्ये

१९७४ सालचा रायगडावरचा फोटो ❤️
18/08/2026

१९७४ सालचा रायगडावरचा फोटो ❤️

१८ ऑगस्ट १७०० कुशल सेनापती श्रीमंत बाजीराव पेशवे...🚩बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा तर चिमाजी आप्पा धाकटा...
18/08/2026

१८ ऑगस्ट १७०० कुशल सेनापती श्रीमंत बाजीराव पेशवे...🚩

बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा तर चिमाजी आप्पा धाकटा आईचे नाव राधाबाई बाजीरावांचे मूळ नाव विसाजी मात्र बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते वयाच्या १३ व्या वर्षी काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३) बाजीरावांना चार मुलगे झाले त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपुर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (मे १७३९) या मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले...

थोरल्या बाजीरावांना पराभूत करणे त्यांच्या शत्रूला कधीही शक्य झाले नाही हिंदवी स्वराज्य सैन्य भिमथडीच्या तट्टांना नर्मदा, यमुनेचे पाणी पाजणारा बाजीराव हा पहिलाच योद्धा होय...

बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्रा च्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली...

बाजीरावांचा हिंदुस्थानभर मोठा दरारा होता १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केल तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला...

असा धुरंधर की ज्याचा कधी पराजय झाला नाही ज्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते अशा रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या अशा थोरले बाजीराव पेशवे तथा बाजीराव बाळाजी भट यांची आज जयंती...

थोरल्या बाजीरावांची मुद्रा :
“।। श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान......।।”

उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यानी अतुल पराक्रम गाजवला...🙏🚩

🔥 “मुघलांना थरकाप उडवणारे विजयी शूर – सरसेनापती संताजी घोरपडे”
18/08/2026

🔥 “मुघलांना थरकाप उडवणारे विजयी शूर – सरसेनापती संताजी घोरपडे”

18/08/2026

महाराष्ट्राच्या मातीतील हरवत चाललेला खेळ नक्की पहा!
लिंक कंमेन्ट मध्ये

🚩“बाजी” म्हणजे पराक्रम,छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पताका अविरत फडकवत ठेवणारा शूर मराठा योद्धा 🚩बाजीरा...
17/08/2026

🚩
“बाजी” म्हणजे पराक्रम,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पताका अविरत फडकवत ठेवणारा शूर मराठा योद्धा 🚩
बाजीरावांनी ऐसा पराक्रम केला की मराठ्यांचा दरारा व दबदबा दिल्लीपर्यंत झाला" इतिहासातील एक असे पर्व जे नेहमी मनाच्या अंतकरणात राहील आणि इतिहासातील असे एक व्यक्तिमत्त्व जे मनात नेहमी घर करून राहील.
मराठा साम्राज्याचे प्रधान बाजीराव बल्लाळ.
जिनके अस्तित्व पे टीका,
इतिहास का हर एक लम्हा था,
वो "राऊ" थे, जिनकी तलवार और प्यार,
दोनो ही काफी गहरा था ☝️
बाळाजी विश्वनाथ भट या पहिल्या पेशव्याचा ज्येष्ठ मुलगा.
आईचे नाव राधाबाई.
बाजीरावाचे मूळ नाव विसाजी.
बाजीराव बल्लाळ व थोरले बाजीराव या नावांनीही ते इतिहासात प्रसिद्ध आहेत.
बालपणी वडिलांच्या बरोबर स्वारी-शिकाऱ्यांत राहिल्याने युद्धकलेचे व राजकारणाचे ज्ञान त्यास लाभले.
सय्यद बंधूंच्या मदतीस दिल्लीला गेलेल्या १७१८ मराठी सैन्यातील एक तुकडी बाजीरावाव्या हाताखाली होती.
छत्रपती शाहूंनी त्याची कर्तबगारी ओळखून इतर ज्येष्ठ सरदारांच्या विरोधास न जुमानता १७ एप्रिल १७२० रोजी त्यास पेशवेपदाची वस्त्रे दिली.
बाजीरावानी मराठेशाहीची शान वाढविली. निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यांसारख्या शत्रूंशी टक्कर देऊन मराठी राज्याचे आसन स्थिर कले आणि मराठी फौजांच्या पराक्रमाला नवी क्षितिजे निर्माण केली.
पेशव्याच्या चपळाईच्या हालचालींपुढे प्रचंड मोगली फौजा आणि त्यांचे तोफखाने कुचकामी ठरले, याबद्द फील्ड मार्शल मंगमरी याने बाजीराव पेशव्याची प्रशंसा केली आहे.
त्यानी दिल्ली दरबारात मराठी सत्तेला मानाचे स्थान प्राप्त करून दिले; तथापि राजकारभारात त्यांस शिस्त निर्माण करता आली नाही आणि राज्य सुसंघटित करता आले नाही.
बाजीराव पेशवा स्वत:च एक बलाढय सरंजामी सरदार बनले आणि मराठ्यांचे राज्य बलाढय सरदारांच्या जहागिरीचा संघ बनले.
🚩
अशा या वीर योध्यास जयंतीनिमित् अभिवादन🙏

पोलीस अधिकाऱ्याची कहाणी! पोटची मुलगी गमावली; अनाथ मुलीला घेतले दत्तक...अर्धी संपत्ती केली मुलीचे नावेश्रीरामपूर येथील अप...
17/08/2026

पोलीस अधिकाऱ्याची कहाणी! पोटची मुलगी गमावली; अनाथ मुलीला घेतले दत्तक...अर्धी संपत्ती केली मुलीचे नावे

श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्वतःच्या अवघ्या 21 दिवसांच्या मुलीला गमावल्यानंतर, एका अनाथ मुलीला दत्तक घेऊन तिच्या नावे अर्धी संपत्ती करत मानवतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. भुसावळ येथे कार्यरत असताना वाघचौरे यांची मुलगी 'अवनी' एका गंभीर आजारामुळे अवघ्या २१ दिवसांची असताना दगावली. या प्रचंड मानसिक धक्क्यातून आणि दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी 'कारा' (CARA) या शासकीय संकेतस्थळावरून एका अनाथ मुलीला दत्तक घेतले व तिचे नावही अवनी ठेवले. याच वैयक्तिक वेदनेतून प्रेरणा घेत त्यांनी बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या राज्यव्यापी गुन्ह्याचा छडा लावला. श्रीरामपूर येथे दिवस-रात्र तपास करून त्यांनी ८ डॉक्टर्स आणि ४ मेडिकल चालकांसह २४ आरोपींना तुरुंगात डांबले. एका पित्याची ही करुण कहाणी आणि त्यांनी कर्तव्याच्या जोडीने दाखवलेला हा विशेष करुणाभाव समाजात एक अत्यंत सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.....
याच करुणामय स्वभावामुळे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांचे पळून गेलेल्या मुली तसेच अपहरण झालेल्या मुली यांच्या संदर्भात विशेष लक्ष असते.या मुलींना कसे परत आणता येईल यासाठी त्यांची धडपड चालू असते.पोलीस खात्यामध्ये सोमनाथ वाकचौरे यांच्यासारखे संवेदनशील व्यक्तिमत्व दूर्मिळ आहे असे म्हणावयास हरकत नसावी.

Somnath Waghchaure

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्राचा इतिहास posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share