KDGB Vidhyavriddhi Samaj

KDGB Vidhyavriddhi Samaj Inspired by the idea of supporting and assisting needs of children in the KDGB Samaj , a few visiona

कु.अर्पिता  अमेय सामंत परुळे
07/10/2024

कु.अर्पिता अमेय सामंत परुळे

दि.२ ऑक्टोबर रोजी शालांत  आणि इतर परीक्षां मध्ये  अतुलनिय यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणि बक्षीस वितरण स...
07/10/2024

दि.२ ऑक्टोबर रोजी शालांत आणि इतर परीक्षां मध्ये अतुलनिय यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणि बक्षीस वितरण सोहळा शारदाश्रम विद्यामंदिर शाळेच्या सभागृहात संपन्न झाला. प्रमूख पाहूणे म्हणून प्रख्यात डॉ. प्रकाश वासुदेव धोंड M.S.(BOM), D.O.R.L.उपस्थित होते.

* या कार्यक्रमात ५००/५०० ( १००%) गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आलेल्या कु. अर्पिता अमेय सामंत ,परुळे हिचा गौरव करण्यात आला.
असा सुवर्णयोग ज्ञातीच्या इतिहासात प्रथमच आला.

25/09/2024
प्रमुख पाहुण्या प्रा. बिना खानोलकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण
11/10/2023

प्रमुख पाहुण्या प्रा. बिना खानोलकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण

रविवार दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी मुंबईत दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेच्या हॉल मध्ये कुडाळदेशस्थ गौडब्र...
11/10/2023

रविवार दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी मुंबईत दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेच्या हॉल मध्ये कुडाळदेशस्थ गौडब्राह्मण विद्यावृद्धि समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रा.बिना खानोलकर ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते १०वी,१२वी, पदवी,पदविका आणि शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून यशस्वी झालेल्या सुमारे ६० मुलांचा पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.

या कौतुक सोहळ्याची निवडक क्षणचित्रे.

सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढिल वाटचालीस शुभेच्छा.

दि.२५/०६/२३ रोजी कुडाळदेशकर सहयोग डोंबिवली व विद्यावृद्धी समाज ह्यांच्या साथीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा क...
28/06/2023

दि.२५/०६/२३ रोजी कुडाळदेशकर सहयोग डोंबिवली व विद्यावृद्धी समाज ह्यांच्या साथीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा कार्यक्रम कुडाळ येथे मराठा मंदिर समाज हॉल मधे संपन्न झाला.
सकाळी ९:०० ते १:०० कार्यक्रम स्थळी खाली विद्यावृध्दि समाज च्या
टेबलापाशी one man army प्रमाणे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंद घेऊन त्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार पारितोषक अर्ज व आर्थिक परिस्थिती नुसार शिष्यवृत्ती अर्जांच वाटप त्यांच्या दरवर्षीच्या कार्यपद्धती नुसार किरण सामंत साहेब करत होते.
कार्यक्रमाचं हे नववे वर्ष होते.

किरण सामंत यांचे मनःपूर्वक आभार.

13/06/2023

कु. चैत्र नितीन सामंत अंधेरी याने सिईटी मध्ये ९९.९५ % आणि बारावी सायन्स मध्ये ९०% मिळवुन भरघोस यश संपादन केले आहे.
त्याचे विद्यावृद्धि समाज आणि समस्त ज्ञातिबांधवा तर्फे हार्दिक अभिनंदन

वसंत प्रसाद दाभोलकर यांने UPSC परीक्षेत ७६ वा क्रमांक पटकावला. आता त्याचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होईल.वसंत प्...
02/06/2023

वसंत प्रसाद दाभोलकर यांने UPSC परीक्षेत ७६ वा क्रमांक पटकावला. आता त्याचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होईल.वसंत प्रसाद दाभोलकर यांने मिळवलेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी विद्यावृद्धी सामाजा कडुन मान:पुर्वक शुभेच्छा💐

कुडाळदेशस्थ गौड ब्राह्मण विद्यावृद्धि समाजाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर कमलाकर दिनकर देसाई यांचे मुंबईतील गोरेगाव येथे त्यां...
17/04/2023

कुडाळदेशस्थ गौड ब्राह्मण विद्यावृद्धि समाजाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर कमलाकर दिनकर देसाई यांचे मुंबईतील गोरेगाव येथे त्यांच्या राहत्या घरी काल दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी दुःखद निधन झालं. विद्यावृद्धि समाजाच्या अनेक वर्षाच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा होता. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संस्थेने आपल्या कारभारात करावा असा त्यांचा आग्रह असे आणि त्यासाठी ते प्रयत्नशील होते. कोकणातील पाट या त्यांचा मूळ गावातील एस एल देसाई हायस्कूल या संस्थेचेही ते मार्गदर्शक होते. आपल्या कोकणात शिक्षणप्रसार व्हावा म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबविले.
संस्थेच्यावतीने देसाई साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली.
न.ना.पंतवालावलकर
विद्यावृद्धि समाज
१७.४.२०२३

07/04/2023

विद्यावृद्धि समाजाच्यावतीने सन २०२३-२४ सालात देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे अर्ज स्विकारण्याबाबत काही सूचना....
१. मागील वर्षी (२०२२-२३) मध्ये ज्यांना संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळाली आहे त्यांना पुढील वर्षासाठीचे अर्ज संस्था पोस्टाने पाठवते... तो मे २०२३ अखेर मिळाला नाही तर संस्थेशी संपर्क करावा.
२. अर्जाचा फॉर्म संस्थेच्या वेब साईटवरून (http://kdgb-vidhyavriddhisamaj.com/) डाऊनलोड करून घेता येईल.
३. फॉर्म पूर्ण व्यवस्थित भरून, त्यावर आपल्या ज्ञातीतील दोन मान्यवर व्यक्तींच्या शिफारशीसह आणि सोबत मार्क लिस्ट, बोनाफाईड सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला ( तहसीलदार प्रमाणपत्र, पगारपत्रक, आयकर विवरण) जोडून संस्थेकडे पाठवावेत.
४. परीक्षा निकाल उशिराने लागतात त्यामुळे एडमिशन घेऊन बोनाफाईड certificate मिळायला वेळ लागणार असेल तर तसे नमूद करून अर्ज वेळेत पाठवावा व बोनाफाईड certificate नंतर पाठवावे.
५. अधिक माहिती साठी संस्थेत संपर्क करावा
कार्यालय: ०२२ २३८२१६७५
चिटणीस किरण सामंत ९८६९००१३३८
चिटणीस संजय सामंत ९३२२२५०३१५

न.ना.पंतवालावलकर
अध्यक्ष, विद्यावृद्धि समाज
६.४.२०२३

Address

30, Kudaldeshkar Brarhmin Nivas, Jss Road, Girgaon
Mumbai
400004

Alerts

Be the first to know and let us send you an email when KDGB Vidhyavriddhi Samaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to KDGB Vidhyavriddhi Samaj:

Share