घर बचाओ घर बनाओ

घर बचाओ घर बनाओ हम चाहते है, हर नागरिक को मिले आवास, रोजगार, शिक्षा, स्वास्थ और सम्मानपूर्वक जीने का अधिकार..

युवा प्रेरणा शिबिर से घर बचाओ-बनाओ आंदोलन का सशक्तिकरण!घर बचाओ घर बनाओ आंदोलन के युवा और बुजुर्ग कार्यकर्ताओं का 20-21 ज...
22/06/2026

युवा प्रेरणा शिबिर से घर बचाओ-बनाओ आंदोलन का सशक्तिकरण!

घर बचाओ घर बनाओ आंदोलन के युवा और बुजुर्ग कार्यकर्ताओं का 20-21 जून 2026 के रोज दो दिन का शिबिर सफल हुआ। शिबिर में मुंबई के मालाड से मानखुर्द तक के बस्ती बस्ती के साथी तथा माहुल से प्रदूषणग्रस्त होने पर पुनर्वसन हुए 2000 से अधिक परिवारों के प्रतिनिधी दोनों दिन हाजिर रहे। महिलाओं की संख्या अधिक रही और हिंदू मुस्लिम एकजुटता भी प्रखर हुई। करीबन 120 सहभागी शिबिरार्थी रहे।

शिबिर का उद्घाटन हेरंब कुलकर्णीजी के द्वारा हुआ तो महात्मा फुले, सावित्रीबाई आदि के योगदान और जीवनपाठ उजागर किया साथ ही उन्होंने एकल महिलाओं के साथ कार्य का GBGBA आंदोलन से आगे बढ़ाने की प्रेरणा भी दी!

बाबा नदाफ जी ने काफी जोर शोर से भावभरे, अर्थपूर्ण गीत से शिबिर में स्फूर्ती दायक वातावरण सबके साथ प्रस्तुत किये तो हर बस्ती में कलापथक बनाने सबको प्रेरित किया। कोल्हापुर से रावसाहेब आलासे भी उपस्थित रहे। पूजा ताई पंडित ने भी गीत से संघर्ष की प्रेरणा दी।
शहरी गरीब और विकास पर मेधाताई पाटकर ने गैरबराबरी को उजागर करते हुए 'बराबरी का बसंत' याने समता, न्याय के लिए संघर्ष और निर्माण की दिशा और संगठन-जनशक्ति-जनतंत्र की प्रक्रिया भी प्रस्तुत की। रेखा गाड़गे और महातम मौर्य, दयाशंकर भाई ने प्रतिसाद प्रतिसाद दिया। विजयाताई चौहानजी ने भी महिलाओं की समस्याओं पर कार्यरत रहने का आवाहन किया।

संदीप बर्वे और नीलम पंडितजी ने हँसते-खेलते संविधान की प्रत्येक बात सबके सामने रखी तो मनीष देशपांडे ने 'सूचना अधिकार' के कानूनी, जिसका आधार आंदोलन के लिए महत्वपूर्ण है। जगदीश खैरालिया ने श्रमिकों के एकजुट होने और हासिल किये अधिकारों की हकीकत समझाकर श्रमिक जनता संघ और GBGB आंदोलन के समन्वय को आगे बढ़ाने का प्रयत्न किया।
साथियों ने पहले दिन शाम को बैठकर कुछ नियोजन किया तो कई साथियों ने रात को वहीं मुक्काम किया। कृष्णा नायरजी ने सभी दोनों दिन भोजन की व्यवस्था की।

दूसरे दिन नशामुक्ती के साथ राशन-अन्न सुरक्षा के अधिकार पर मुक्ता श्रीवास्तव ने, SIR पर राजेंद्र चव्हाणजी ने तथा सांप्रदायिकता की चुनौती पर इरफान इंजीनियर ने, विविध माध्यमों के द्वारा हर मुद्दे पर कार्य की पद्धती, जागृती और प्रक्रिया संबंधी काफी विस्तार से प्रबोधित किया तो सभी साथी खुश होकर कार्यरत रहने का संकल्प लेकर ही लौटे।
शिबिर में ज.आ. रा. समन्वय के साथी, विजया चौहानजी, जनता केंद्र के दिनेश राणे जी आदि का सहयोग अमूल्य रहा। पूनम कनोजिया और रेखा गाड़गे ने सूत्र-संचालन किया । सभी सहभागी बस्तियोंके स्वयंसेवक, कार्यकर्ता दोनों दिन कार्यक्रम और व्यवस्थापन में कार्यरत रहे।

दर वेळी सरकारचा विकास गरिबांच्या निवाऱ्यावर येतो. आणि शेकडो नागरिक आपल्या वृद्ध माता पित्यांसह, महिला आणि मुलांसह बेघर ह...
28/02/2026

दर वेळी सरकारचा विकास गरिबांच्या निवाऱ्यावर येतो. आणि शेकडो नागरिक आपल्या वृद्ध माता पित्यांसह, महिला आणि मुलांसह बेघर होऊन उघड्यावर रहायला हतबल होतात. मेधाताई पाटकर यांच्याकडून या कुटुंबांसाठी छोटासा हातभार म्हणून ताडपत्री देण्यात आली. यात घर बचाओ घर बनाओ आंदोलन आंबुजवाडी कार्यकर्ता लाला काळे,रिजवान भाई यांच्यासह अनेक साथी सहभागी झाले.

ना हिंदू बन ना मुसलमान बन..., इंसान की औलाद है तू पहले इंसान बन..अमनवेलफेयर सोसाइटी अम्बुजवाड़ी मे आज इफ्तार दावत हुई,अम्...
28/02/2026

ना हिंदू बन ना मुसलमान बन..., इंसान की औलाद है तू पहले इंसान बन..

अमनवेलफेयर सोसाइटी अम्बुजवाड़ी मे आज इफ्तार दावत हुई,अम्बुजवाड़ी के रहिवाशी जमाते इस्लाम हिन्द के साथी,मेधा ताई, अँधेरी के साथी मुलुंड के साथी सभी लोग इस दावत मे शामिल हुए , एक दूसरे से मिलकर खुशी हुई सब ने इफ्तारी किया उसके बाद जमाते इस्लाम हिन्द के अनेक कार्यकर्त्ता जो की खाना, नास्ता, व्यवस्था, डॉक्टर की सहायता सब का इंतजाम किये थे जब कारगिल रोड के 250 घर तोड़े गए थे, आज मेधा ताई और सहकारियों द्वारा इन साथियो का शाल देकर सम्मानित किया गया, सभी को धन्यवाद और जिंदाबाद सब एक दूसरे के साथ ऐसे ही आगे बढ़ते रहेंगे ✊🏽✊🏽✊🏽आज कार्यक्रम मे मेधा ताई द्वारा गीत जो सुना वो बहुत ही दिल छू लेने वाला था

इश्वर अल्लाह तेरे जहाँ मे
नफरत क्यों है जंग है क्यों l
तेरा दिल तो इतना बड़ा है
इंसान का दिल तंग है क्यों ll

काम प्रचार, प्रसार यासाठी नाही तर केवळ न्यायासाठी...कोणतेही काम करताना फक्त काम करायचं.. कुठलाही दिखावा किंवा फोटोग्राफी...
01/01/2026

काम प्रचार, प्रसार यासाठी नाही तर केवळ न्यायासाठी...

कोणतेही काम करताना फक्त काम करायचं.. कुठलाही दिखावा किंवा फोटोग्राफी करण्याचा प्रयत्न सुद्धा चालत नाही. हेच या माऊलीने आम्हाला शिकवलं. काम करताना फक्त आणि फक्त कामावर लक्ष केंद्रित करणं आणि आपण केलेल्या कामाच्या परिणामातून पीडित व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद हाच काय तो स्वार्थ.. म्हणूनच जाणीवपूर्वक कोणत्याही मंत्रालयीन, प्रशासकीय बैठकींचे फोटो आणि व्हिडिओ तयार करून त्याला प्रसिद्धी दिली जात नाही. मग मागील अनेक दशकांपासून चालू असलेला नर्मदा बचाओ आंदोलनाच्या बैठकी असो की, श्रमिकांसाठी मध्यप्रदेश असो की, महाराष्ट्र असो किंवा त्यांच्याकडे मदतीसाठी गेलेला एकमेव असहाय्य पीडित असो त्यासाठी सबंधित मंत्री, सचिव, आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अभियंते, लिपीक , इतकेच काय तिथले शिपाई आणि सुरक्षा रक्षक यांच्याशी सुद्धा आदराने संवाद करणं त्यांचा स्वभाव आहे.

आजपर्यंत लाखो पीडितांना न्याय मिळवून देताना अनेक आव्हाने पेलत सतत काम करणं. केवळ आणि केवळ न्याय मिळवून देणं हाच अट्टाहास असतो आणि आमच्याही मनावर ते कोरलं जात. असे तर गर्दी करून आंदोलनाचे खंबे कार्यकर्ते म्हणणारे आपले फोटो video आणि सेल्फी काढण्यातच दंग दिसतात. पण खरे काम करणारे मात्र कामातच गुंतलेले असतात.

मागील 8 वर्षापासून मेधाताई सोबत माहुल साठी काम करताना त्यांचे देशभरातील कार्यकर्ते जे सतत जोडून काम करत असतात त्यांचे कधीच फोटो पाहायला मिळत नाहीत. त्यांना बैठकींचे फोटो हे महत्वाचे वाटत नाही तर महत्वाचे असते ते बैठकींची तयारी, बैठकीतील संवाद, न्याय मिळणं.... मागणी आणि मुद्दे प्रभावीपणे मांडणं.... सत्य परिस्थितीशी प्रशासनाचा परिचय करवून देणे. इतकी मोठी जबाबदारी असताना सतत एक फोटोग्राफर सोबत घेऊन फिरणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कधीच पटणार नाही कारण कार्यात कामाला हातभार लावणे आवश्यक असते. त्यावर लोकांचे हित अहित अवलंबून असते. हाच मागील 9 वर्षांचा अनुभव आहे आणि वास्तविक जीवनाला आनंद आणि समाधान देणारा आहे.

म्हणूनच माहुल प्रदूषणग्रस्त कुटुंबांच्या अनेक महत्वाच्या बैठकांचा , पाठपुराव्याचे किंवा ठरलेल्या आणि झालेल्या कामाचे फोटो आमच्याकडून काढले जात नाहीत. पण अशातही आमच्याही नकळत फोटो काढून क्षण साठवून ठेवणारे काही अवलिया असतात. ज्यांच्याकडून गत प्रसंगांचे क्षण टिपले जातात.

सध्या HDIL कुर्ला येथे शिफ्ट होणाऱ्या 1600 कामावरून जे काही चिखलफेक चालू आहे. त्याच 1600 घरांसाठी (21 डिसेंबर 2021) बैठकीची तयारी आणि चेंबूर ते सह्याद्री अतिथीगृह प्रवास, बैठक आणि आभार सुद्धा आमचे पुण्यातील साथी डॉ. दिपक बिडकर यांनी टिपलेले काही क्षण...

धन्यवाद सर...
आपण आमच्याही न कळत चित्रप्रतिमेत कैद केलेले क्षण पुन्हा इतिहासात घेऊन गेले.

27/11/2025

HDIL कुर्ला BLD 20 fire system inspection and demo

27/11/2025
27/11/2025

नागरिकांची सुरक्षा आणि सतर्कता....
तपासणी, प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण...
मार्गदर्शन ..

आज दिनांक 27/11/2025 रोजी HDIL इमारत क्रमांक 20 आणि 21 मध्ये , लिफ्ट आणि अग्निशमन यंत्रणेची तपासणी आणि प्रात्यक्षिक घेण्...
27/11/2025

आज दिनांक 27/11/2025 रोजी HDIL इमारत क्रमांक 20 आणि 21 मध्ये , लिफ्ट आणि अग्निशमन यंत्रणेची तपासणी आणि प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी अग्नीशमन व्यवस्थापक , MMRDA अधिकारी, MCGM अधिकारी, माहुल समिती, इमारत प्रतिनिधी आणि रहिवाश्यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

यात संभाव्य धोक्यांची माहिती देऊन अशा वेळेस सतर्कता आणि प्राथमिक उपचार म्हणून नागरिकांची भूमिका याबद्दल समजावण्यात आले.
इमारत क्रमांक 20 आणि 21 च्या सामूहिक जागेची आणि विंग निहाय अग्निशमन व्यवस्थेची पाहणी, तपासणी करून प्रात्यक्षिक देण्यात आले.

या यंत्रणा सुरळीत राहाव्यात यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

माहुल प्रकल्पग्रस्त समिती तर्फे या आजच्या कार्यात महत्वाची माहिती आणि प्रशिक्षण देणाऱ्या सर्व अधिकारी वर्गाचे आभार!

तसेच दक्ष नागरिक म्हणून यात सहभागी होणाऱ्या रहिवाशांचे ही आभार !

धन्यवाद !

17/11/2025

जाहीर सूचना

मुंबईच्या विविध विभागांत सुरू असलेल्या SRA क्लस्टर बायोमेट्रिक सर्वेक्षण संदर्भात, असल्फा येथील स्थानिक जन समितीचे काही सदस्य तसेच स्थानिक रहिवासी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तथापि, या सर्वेक्षणासंदर्भातील शासन निर्णय (GR) आणि इतर कागदपत्रांची संपूर्ण पडताळणी होईपर्यंत सर्व नागरिकांनी कोणतीही माहिती देण्यापूर्वी खालील सूचनांचे काटेकोर पालन करावे.

१. सर्वेक्षणापूर्वी पोच-पावती (Acknowledgement) घेणे अनिवार्य

स्वतःच्या सुरक्षेसाठी, कोणत्याही घर किंवा दुकानाचे आत-बाहेरचे व्हिडिओ सर्वेक्षण, तसेच आधार कार्ड, वीज बिल किंवा इतर कागदपत्रे देण्यापूर्वी रहिवाशांनी स्वतः तयार केलेल्या पोच-पावतीवर सर्वेक्षण अधिकाऱ्यांची खालील माहिती नोंदवून त्यांची स्वाक्षरी घ्यावी:

सर्वेक्षण अधिकारी/प्रतिनिधीचे पूर्ण नाव

मोबाईल क्रमांक

पद

संस्थेचे नाव

संबंधित वर्क ऑर्डर / अधिकृत निर्देश पत्र

सर्वेक्षणाचा उद्देश आणि संकलित माहितीचा नेमका उपयोग

वरील सर्व तपशीलांची स्पष्ट नोंद करून स्वाक्षरी घेतल्याशिवाय कोणतीही माहिती देऊ नये.

२. स्लम क्लस्टर सर्वेक्षण फक्त स्थानिक पुनर्वसनासाठीच असावे

हे सर्वेक्षण फक्त रहिवाशांच्या स्थानिक पुनर्वसनासाठी असणे अनिवार्य आहे.

कोणताही नियम, अट, कागदपत्र किंवा घोषणापत्र आपल्या हक्कांच्या विरोधात असल्याचे वाटल्यास त्यावर स्वाक्षरी करू नका.

३. सर्वेक्षणानंतर अधिकृत पोच-पावती घेणे आवश्यक

सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित सर्वेक्षकाकडून अधिकृत पोच-पावती (Acknowledgement) घेणे बंधनकारक आहे.

विकासाचा खरा अर्थ म्हणजे—लोक जिथे मागील २५ ते १०० वर्षांपासून राहतात, त्याच परिसरात किंवा ते शक्य नसल्यास जवळपासच्या (२–३ किमी अंतरातील) जागेत सर्वसुविधांसह पुनर्वसन करणे.

४. अन्यायकारक पुनर्वसनाची पुनरावृत्ती होऊ नये

मागील काही वर्षांत मुंबईतील अनेक प्रकल्पांमध्ये बाधित कुटुंबांना अत्यंत अस्वच्छ, प्रदूषित आणि आरोग्यास घातक ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. उदाहरणार्थ—

चेंबूरमधील HPCL आणि BPCL रिफायनरी, तसेच अन्य धोकादायक रासायनिक उद्योगांच्या परिसरात असलेली माहुल MMRDA कॉलनी, जिथे नागरिकांना अक्षरशः “कचऱ्यासारखे डंप” करण्यात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.

अशा प्रकारचे पुनर्वसन आम्हाला मान्य नाही. आमची सध्याची झोपडीही आम्हाला ताजमहालाप्रमाणेच मूल्यवान आहे.

५. मुंबईतील वास्तव

मुंबईतील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६०% नागरिक फक्त ७–८% जमिनीवर स्लममध्ये राहतात. परिस्थिती कठीण असली तरी विकासाच्या नावाखाली अन्यायकारक स्थलांतर स्वीकारले जाणार नाही.

६. नागरिकांना सामूहिक आवाहन

मुंबईचा खरा विकास साधायचा असल्यास—

प्रत्येक रहिवाशाचे पुनर्वसन त्यांच्या मूळ वास्तव्याजवळ (२–३ किमीच्या परिसरात) आणि सर्व मूलभूत सुविधांसह करणे अत्यावश्यक आहे.

सर्वेक्षण, बायोमेट्रिक माहिती आणि कागदपत्रे देताना जागरूकता, पारदर्शकता आणि हक्कांचे संरक्षण यांना प्राधान्य द्यावे.
……..…...........................................................

सार्वजनिक सूचना

मुंबई के विभिन्न विभागों में चल रहे SRA क्लस्टर बायोमेट्रिक सर्वेक्षण के संदर्भ में असल्फा के स्थानीय जन समिति के कुछ सदस्य तथा स्थानीय निवासी संबंधित अधिकारियों से चर्चा कर चुके हैं।
फिर भी, इस सर्वेक्षण से जुड़े शासन निर्णय (GR) एवं अन्य दस्तावेजों की पूर्ण जांच-पड़ताल होने तक सभी नागरिकों से अनुरोध है कि कोई भी जानकारी देने से पहले नीचे दिए गए निर्देशों का कड़ाई से पालन करें।

1. सर्वेक्षण से पहले पावती (Acknowledgement) लेना अनिवार्य

अपनी सुरक्षा के लिए, किसी भी घर या दुकान का अंदर-बाहर का वीडियो सर्वेक्षण, या आधार कार्ड, बिजली बिल, या अन्य दस्तावेज देने से पहले नागरिक स्वयं द्वारा तैयार की गई पावती पर सर्वे टीम से निम्नलिखित विवरण लिखवाकर उनकी हस्ताक्षर ज़रूर लें:

सर्वेक्षण अधिकारी/प्रतिनिधि का पूरा नाम

मोबाइल नंबर

पद

संस्था का नाम

संबंधित वर्क ऑर्डर / अधिकृत निर्देश पत्र

सर्वेक्षण का उद्देश्‍य, तथा एकत्र की जाने वाली जानकारी का सटीक उपयोग

उपर्युक्त सभी बिंदुओं का स्पष्ट उल्लेख एवं हस्ताक्षर लेने के बाद ही कोई भी जानकारी उपलब्ध कराएँ।

2. स्लम क्लस्टर सर्वेक्षण केवल स्थानीय पुनर्वास हेतु होना चाहिए

यह सर्वेक्षण केवल निवासियों के स्थानीय पुनर्वास के उद्देश्य से होना चाहिए।

कोई भी नियम, दस्तावेज, शर्त या घोषणा यदि आपके अधिकारों के विरुद्ध प्रतीत होती है, तो उस पर हस्ताक्षर न करें।

3. सर्वेक्षण पूर्ण होने पर आधिकारिक पावती प्राप्त करना आवश्यक

सर्वेक्षण पूरा होने के बाद सर्वेक्षक से आधिकारिक पावती (Acknowledgement) लेना अनिवार्य है।

विकास का अर्थ है—जिन स्थानों पर लोग पिछले 25 से 100 वर्षों से रह रहे हैं, उसी क्षेत्र में या संभव न होने पर पास-पड़ोस (2–3 किमी) के दायरे में सभी सुविधाओं सहित पुनर्वास उपलब्ध कराया जाना चाहिए।

4. अन्यायपूर्ण पुनर्वास की पुनरावृत्ति नहीं होनी चाहिए

पिछले कुछ वर्षों में मुंबई के अनेक प्रोजेक्ट्स में प्रभावित परिवारों को अत्यंत अस्वच्छ, प्रदूषित और स्वास्थ्य के लिए खतरनाक स्थानों पर विस्थापित किया गया है। उदाहरण के लिए—

चेंबूर स्थित HPCL और BPCL रिफाइनरी तथा अनेक रासायनिक उद्योगों के बीच स्थित माहुल MMRDA कॉलोनी, जहाँ नागरिकों को मानो “कचरे की तरह डंप” कर दिया गया था।

इस प्रकार का पुनर्वास हमें स्वीकार नहीं है। हमारी झोपड़ी भी हमें ताजमहल की तरह मूल्यवान है।

5. मुंबई की वास्तविकता

मुंबई की कुल आबादी में से लगभग 60% लोग केवल 7–8% भूमि पर बसे स्लम क्षेत्रों में रहते हैं। हालात कठिन होने के बावजूद विकास के नाम पर अन्यायपूर्ण विस्थापन स्वीकार नहीं किया जाएगा।

6. नागरिकों से सामूहिक अपील

मुंबई का वास्तविक विकास तभी संभव है जब—

प्रत्येक नागरिक का पुनर्वास उनके मूल निवास स्थान के पास (2–3 किमी क्षेत्र में) सभी बुनियादी सुविधाओं के साथ किया जाए।

सर्वेक्षण, बायोमेट्रिक डेटा और दस्तावेज़ देते समय सतर्कता, पारदर्शिता और अधिकारों की रक्षा को सर्वोच्च प्राथमिकता दें।

MMRDA मुख्य अभियंता.. श्री. चामलवार आणि कार्यकारी अभियंता श्री.तितरे साहेब यांच्या  सेवानिवृत्ती दिनी..मेधाताई , घर बचाओ...
01/08/2025

MMRDA मुख्य अभियंता.. श्री. चामलवार आणि कार्यकारी अभियंता श्री.तितरे साहेब यांच्या सेवानिवृत्ती दिनी..
मेधाताई , घर बचाओ घर बनाओ आंदोलन आणि माहुल प्रकल्पग्रस्त समिती कडून सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करताना ची छायाचित्र..

Address

29/A, Haji Habib Building, Naigaon Cross Road, Dadar/E
Mumbai
400014.

Alerts

Be the first to know and let us send you an email when घर बचाओ घर बनाओ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share