राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

  • Home
  • India
  • Mumbai
  • राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना This is the centralized Union for state government employees in Maharashtra.
(1)

आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप सातव्या दिवशी सुरूच
22/06/2026

आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप सातव्या दिवशी सुरूच

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप बेदखल केला. त्यामुळे शासनाचा सुम...
18/06/2026

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप बेदखल केला. त्यामुळे शासनाचा सुमारे दीडशे कोटींचा महसूल बुडाला
त्याला जबाबदार कोण?

राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा तिसरा दिवस सुरू असून या संपामुळे शासनाचा सुमारे दीडशे कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा दावा राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या अनेक वर्षांपासून रखडल्या असून त्या सोडविण्यात प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.

संपामुळे राज्यभरातील अनेक आरटीओ कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले असून वाहन नोंदणी, परवाने, कर वसुली आणि इतर महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांची कामे रखडली असून शासनालाही मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रशासन, परिवहन विभाग आणि शासनाची भूमिका काय आहे? कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत? जाणून घ्या या विशेष वृत्तातून.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आरट...

आरटीओ कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपाच्या आजच्या पहिल्याच दिवशी राज्यभरात संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. राज्यातील स...
17/06/2026

आरटीओ कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपाच्या आजच्या पहिल्याच दिवशी राज्यभरात संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांचे कामकाज पूर्णपणे ठप्प राहिले. तसेच आंतरराज्य सीमेवरील २२ चेकपोस्टही बंद असल्याने वाहतूक आणि महसूल संकलनावर मोठा परिणाम झाला.

आरटीओ कार्यालये बंद असल्यामुळे नवीन वाहन परवाना (Driving Licence), परवाना नूतनीकरण, आंतरराष्ट्रीय परवाना, वाहन हस्तांतरण, नोंदणीसह विविध सेवा आज बंद राहिल्या. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.

दरम्यान, चेकपोस्ट बंद असल्याने शासनाचा सुमारे दोन कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती समोर आली आहे. संपाच्या पहिल्या दिवशी शासन अथवा प्रशासनाच्या स्तरावर कोणतीही ठोस हालचाल दिसून आली नसल्याने कोणतीही चर्चा झाली नाही.

या पार्श्वभूमीवर आपल्या प्रलंबित न्याय्य व हक्काच्या मागण्यांसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने व ताकदीने संघर्ष सुरू ठेवावा, असे आवाहन आरटीओ कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी केले आहे.

बेमुदत संप पुढेही सुरू राहणार असून शासन आणि कर्मचारी संघटना यांच्यातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

17/06/2026

Address

409, Shreyas Chambers, 175 D. N. Road, Fort. Mumbai 400 001
Mumbai
400001.

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm

Telephone

+919967286718

Alerts

Be the first to know and let us send you an email when राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना:

Shortcuts

Share

Category