Tanvi Kamlekar

Tanvi Kamlekar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tanvi Kamlekar, Youth Organization, Miraj.

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने बेळंकी येथे आयोजित मशाल यात्रेत सहभागी झालो. भारताच्या स्वातंत्र्यासा...
10/08/2026

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने बेळंकी येथे आयोजित मशाल यात्रेत सहभागी झालो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या शौर्याला आणि हौतात्म्याला यावेळी विनम्र अभिवादन केले.

ऑगस्ट क्रांतीची ही मशाल पुढील पिढीपर्यंत पोहोचवत लोकशाही, संविधान आणि देशहितासाठी सदैव सज्ज राहण्याचा संकल्प यावेळी केला.
यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेच्या हृदयातील 'सभापती' तन्वीताई कमलेकर!सत्ता आणि पदे येतात अन् जातात, पण जनतेचा विश्वास आणि प्रेम कमावणं हीच खरी काम...
05/08/2026

जनतेच्या हृदयातील 'सभापती' तन्वीताई कमलेकर!

सत्ता आणि पदे येतात अन् जातात, पण जनतेचा विश्वास आणि प्रेम कमावणं हीच खरी कामाची ताकद असते. अवघ्या २१ व्या वर्षी मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान होऊन आपल्या गावाची आणि तरुण पिढीची मान अभिमानाने उंचवणाऱ्या तन्वीताई कमलेकर यांच्या पाठीशी संपूर्ण गाव आणि परिसर आज खंबीरपणे उभा आहे.

राजकारणातील घडामोडींमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे आज हे पद हातातून गेले असले, तरी यामुळे आमचा सेवेचा ध्यास आणि संघर्षाची धार अजिबात कमी होणार नाही. पदावर असताना किंवा नसतानाही जनतेचे प्रश्न सोडवणे, गावाच्या विकासासाठी धावून जाणे हीच आपली खरी ओळख आहे.

हे पद केवळ एका व्यक्तीचे नव्हते, तर ते संपूर्ण गावच्या अस्मितेचे आणि विश्वासाचे प्रतीक होते. पद गेले म्हणून लोकांचे काम थांबणार नाही; उलट आता अधिक ताकदीने आणि निष्ठेने आपण सगळे पुन्हा लोकांच्या सेवेत उभे राहू.

माझा हा प्रवास इथे संपलेला नाही, तर ही एका नव्या, मोठ्या संघर्षाची आणि वाटचालीची सुरुवात आहे! माझ्या पाठीशी माझी संपूर्ण जनता कालही होती, आजही आहे आणि उद्याही खंबीरपणे राहील.

#सभापती

मिरज तालुक्याचे भाग्यविधाते गोरगरीब जनतेचे कैवारी धवलक्रांतीचे प्रणेते सहकार महर्षी माजी आमदार कै. मोहनरावजी शिंदे (म्है...
02/08/2026

मिरज तालुक्याचे भाग्यविधाते गोरगरीब जनतेचे कैवारी धवलक्रांतीचे प्रणेते सहकार महर्षी माजी आमदार कै. मोहनरावजी शिंदे (म्हैशाळकर) यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी
25/07/2026

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
राम कृष्ण हरी

महाराष्ट्र राज्याचे लोकनेते, दिवंगत स्व. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या 'महिला मेळाव्यास' महिलांनी ...
23/07/2026

महाराष्ट्र राज्याचे लोकनेते, दिवंगत स्व. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या 'महिला मेळाव्यास' महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सदर कार्यक्रम पार पडला. या मेळाव्या मध्ये अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर आयोजित केलेल्या महिला मेळाव्या मध्ये महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांचे व व्यवसायांचे मार्गदर्शन देखील करण्यात आले. सदर मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, मा. आमदार. मा. अजितराव घोरपडे सरकार, विधान परिषदेचे आमदार.मा. इद्रिसभाई नाईकवडी साहेब, महिला व बालकल्याण सभापती सौ स्नेहल मोरे , पंचायत समिती सदस्या, सौ. सुप्रियाताई तवटे व सौ. सुजाताताई पाटील व अन्य मान्यवर, अधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन 💐💐💐
22/07/2026

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन 💐💐💐

राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक दादा जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
19/07/2026

राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक दादा जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जेजुरीजवळ दिंडीत सहभागी असलेल्या वाहनाच्या धडकेत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील तीन वारकऱ्यांचा  दुर्दैवी दुःखद मृत...
13/07/2026

जेजुरीजवळ दिंडीत सहभागी असलेल्या वाहनाच्या धडकेत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी दुःखद मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुःखद दुर्घटनेत आपले प्राण गमावलेल्या वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातात जखमी झालेले सर्व वारकरी लवकरात लवकर बरे होवोत हीच प्रार्थना करते.

Address

Miraj
416410

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tanvi Kamlekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share