Team Tarunaai

Team Tarunaai Anand Sadhana Bahuuddeshiya Sevabhavi sanstha as known as Team Tarunaai working for Vision - Every Youth Will Be Empowered To Build A Better Society.

प्रतीक्षा अखेर संपली…! २५३+ अर्ज, असंख्य स्वप्नं आणि प्रत्येक मुलाखतीतून उमटलेली एक वेगळी ओळख…त्यातून निवड झालेल्या सर्व...
13/05/2026

प्रतीक्षा अखेर संपली…!

२५३+ अर्ज, असंख्य स्वप्नं आणि प्रत्येक मुलाखतीतून
उमटलेली एक वेगळी ओळख…

त्यातून निवड झालेल्या सर्व शिबिरार्थ्यांचं मनापासून अभिनंदन !
आणि ज्यांचं नाव यादीत नाही, त्यांनी निराश होऊ नका…

कारण ‘तरुणाई’ हा फक्त शिबिर नाही, तर कायम सोबत
राहणारा प्रवास आहे.

तुमचं नाव यादीत आहे का?
लगेच तपासा…

आम्ही तुमची वाट पाहतोय! 🌿

- टीम तरुणाई



🎉

01/05/2026

It’s always a joy to be here…😊
for the warmth,
for the energy,
and for the adventure that turns strangers
into a family..

Last 5 days to apply…

Register Now For This incredible Experience
Scan given QR tap the link

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdOGJBTNfKlwFQAax4myiLmH-0fQOs1fRFjWFWyeq-VOZndUA/viewform?usp=dialog

For more information Follow Now 🤩

https://www.instagram.com/teamtarunaai?igsh=cjhiOW1mNzZidmF5

https://www.facebook.com/share/1AYrKEfnsW/?mibextid=wwXIfr

तू पण गेले वाया , अवघा रंग एक झाला... संतांनी मांडलेल्या या गोष्टी पण खरंच असा अनुभव सध्य परिस्थिती मध्ये कधी घेतलात का ...
30/04/2026

तू पण गेले वाया , अवघा रंग एक झाला...

संतांनी मांडलेल्या या गोष्टी पण खरंच असा अनुभव
सध्य परिस्थिती मध्ये कधी घेतलात का ?

कोणताच कसलाच भेद नाही भाव नाही... मी पण नाही तर
आपले पण...आणि हो जिथे माणुसकीचा अवघा रंग एक होतो
व केंद्र स्थानी असतो तो केवळ आणि केवळ...मनुष्य, स्वातंत्र,
समता संवादातील खरा गोडवा...

हसतो ही सोबत रडतो ही सोबत... व अनुभवतो खरी ऐकता,
ज्यात तो मात्र स्वतःला नव्याने सामोरे जात असतो,
अनुभवत असतो... खरं जगणं 😊

तर हे सगळ अनुभवण्यासाठी आपण घेऊन आलोय
४२ वे तरुणाई शिबिर.. आपले नाव नोंदवण्यासाठी पोस्टर
वरचा QR scan करा अथवा खाली दिलेली लिंक Click करा..

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdOGJBTNfKlwFQAax4myiLmH-0fQOs1fRFjWFWyeq-VOZndUA/viewform?usp=dialog


28/04/2026

Meet Shubham Pramila Dashrath, a participant of the 41st Tarunaai Camp, as He shares his heartfelt experience with Team Tarunnai.

He talks about the meaningful connections He built during the 41st Tarunaai Camp and the valuable lessons he learned along the way.

Just like his, Team Tarunaai continues to empower youth and adolescents to grow with confidence, clarity and a commitment to build a sustainable society.

If you wish to be part of this incredible journey, you can register through the link or scanner provided.

📅 Camp Dates: 05 to 13 June 2026

📍 Location: Prayogbhumi Jamrai, Kolkewadi
Via Alore, Taluka Chiplun, Dist. Ratnagiri

Apply Now : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdOGJBTNfKlwFQAax4myiLmH-0fQOs1fRFjWFWyeq-VOZndUA/viewform?usp=dialog

चला, भाकरी पलीकडचं जगणं शोधूया! 🌿💫
आम्हाला नक्की follow करा.
https://www.instagram.com/teamtarunaai?igsh=cjhiOW1mNzZidmF5

https://www.facebook.com/share/1AYrKEfnsW/?mibextid=wwXIfr

शेवटी प्रतिक्षा संपली..🥳माणसाने माणसाकडे माणूस म्हणून पाहणे.. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे शिकवते तरूणाई.....तुम्ही जसे...
23/04/2026

शेवटी प्रतिक्षा संपली..🥳

माणसाने माणसाकडे माणूस म्हणून पाहणे.. आणि त्यांच्यावर
विश्वास ठेवणे शिकवते तरूणाई.....तुम्ही जसे आहात तसे,
तुमच्यातले गुण, दोष या सगळ्यांना सामावून घेते तरूणाई...

आपला देश, वेश, संकृती भाषा यांमधील विविधता जपून त्यांचा
आदर करून एकमेकांबद्दल प्रेम व समभावाची सांगड कशी
घालायची, हे शिकवते तरुणाई....माणूस कितीही मोठा झाला तरी
त्यानं त्याच्यातलं बालपण, बालमन जपलं पाहिजे.. स्वतःवर, स्वतःच्या जगण्यावर, आप्तगाणांवर प्रेम करायला शिकवते तरुणाई...

तर तुम्हा सर्वांना हे अनुभवायचय..?

तर तुमच्या साठी सज्ज आहे "टीम तरुणाई आयोजित"
४२ वे टीम तरुणाई शिबिर तर लगेच खाली दिलेल्या लिंक वर
जाऊन आपलं नाव नोंदवा..

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdOGJBTNfKlwFQAax4myiLmH-0fQOs1fRFjWFWyeq-VOZndUA/viewform?usp=dialog

[Teamtarunaai, 42 Camp, Ratnagiri, Kokan]



22/04/2026

The wait is over..🥳

42nd Team Tarunaai Camp is here..
Registrations start from 23 April 2026

Want to build yourself ?
Ready for new friendships, powerful experiences, and unstoppable energy !
Then don’t miss this chance !

Your transformation begins here..

Register now and become a part of
Team Tarunaai..🌱

लवकरच घेऊन येतोय ४२ वे तरुणाई शिबिर..🌱नवीन स्वप्नं, नवीन ऊर्जा आणि नवी दिशा घेऊन यंदाचं तरुणाई शिबिर तुमच्यासाठी लवकरच घ...
08/04/2026

लवकरच घेऊन येतोय ४२ वे तरुणाई शिबिर..🌱

नवीन स्वप्नं, नवीन ऊर्जा आणि नवी दिशा घेऊन यंदाचं तरुणाई
शिबिर तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहोत !
स्वतःला ओळखण्याची, घडवण्याची आणि नवीन मित्रांसोबत अविस्मरणीय क्षण जगण्याची हीच वेळ !

ज्ञान, कौशल्य आणि प्रेरणांचा संगम तुमच्या आयुष्यात नवा
बदल घडवेल चला, एक पाऊल पुढे टाकूया आणि या रोजच्या
जगापेक्षा वेगळ्या वाटेवर जाऊन काही तरी नवीन अनुभव घेऊयात..

तर चला मग भाकरी पलीकडचं जगणं जगण्यासाठी सज्ज रहा..🥳


🌎

दिवस आठवा - निरोपाच्या क्षणी जिथे स्वतःपण, आपुलकी आणि आपली माणसं सापडतात, तिथून निघणं खरंच कठीण असतं… नाही का?आज ४१ व्या...
02/04/2026

दिवस आठवा - निरोपाच्या क्षणी

जिथे स्वतःपण, आपुलकी आणि आपली माणसं सापडतात,
तिथून निघणं खरंच कठीण असतं… नाही का?

आज ४१ व्या शिबिराचा अखेरचा दिवस.आजचा सूर्योदय जरा संथच वाटत होता…वातावरणात एक अनामिक हुरहूर दरवळत होती.अनुभवांनी समृद्ध झालेल्या मनाला कळत होतं...आज इथून निघायचं आहे.

सकाळचा काढा, प्रार्थना… सगळं रोजच्यासारखंच, पण आज प्रत्येक क्षण जपून जगण्याची एक वेगळीच ओढ होती.
जणू मनच सांगत होतं..हे शेवटचे काही तास आहेत… मनसोक्त जगून घे.
सालईबनही जणू बोलत होतं…“तुम्ही इथे आलात, आणि आम्ही धन्य झालो.”

या आठवणींच क्षण साठवण्यासाठी प्रज्ञामंच्याकडे फोटो सेशन करण्यात आल, ज्यात चेहऱ्यावरचं हसू कैद झालं,
पण डोळ्यांतील भावना मात्र अजूनही बोलत होत्या. आणि इकडे समता सदनकडे सेवाधारी यांनी एक शेवटची अँक्टिव्हिटी ठेवली होती. हातात हात गुंफून तयार झालेली साखळी फक्त एक रांग नव्हती ती होती जोडलेली प्रेम , विश्वास , आणि नात्यांची काळजी...

त्यानंतर शिबिर बोलू लागते या अॅक्टिविटी मार्फत सर्वानी शिबिराचा प्रवास आणि वाटचाल ऐकली . गांधीजींची मूल्यं आत्मसात करत, एकमेकांच्या गळ्यात गांधी घालत आणि पहिल्या दिवशी घेतलेल मोबाइल सोबत सर्वाना शिबिराचे प्रमाणपत्र देण्यात आले.
हा फक्त कागद नाही, हा आपण जगलेला प्रवास आहे.

आणि मग… निघायची वेळ आली. मिठ्या घट्ट झाल्या. शब्द हरवले. आतापर्यंत रोखून ठेवलेला भावनांचा बांध तुटला…
अश्रू आले...दुःखाचे नव्हते, ते होते नात्यांचे, माणसांचे, आपुलकीचे.
आज वारकरी म्हणून आलेले शिबिरार्थी, तरुणाईकर म्हणून परत जात आहेत.
मनभरून काहीतरी मिळालं आहे. माणसं, नाती, अनुभव आणि माणुसकी...हीच खरी संपन्नता.

शिबिर संपलं… पण वारी नाही.
ती आता प्रत्येकाच्या आयुष्यत नव्याने सुरू झाली आहे…

आणि अशा प्रकारे या वारीचा “सुखिया झाला…”

[Teamtarunaai, Camp, Buldhana, Maharashtra]

#निरोप

दिवस ७ – कृतज्ञवारी“तुका म्हणे आता जाहले कृतज्ञ,चरणी ठेविले मस्तक हे धन्य…”आजचा दिवस होता कृतज्ञवारीचा. योगायोगाने १४ फे...
02/04/2026

दिवस ७ – कृतज्ञवारी

“तुका म्हणे आता जाहले कृतज्ञ,
चरणी ठेविले मस्तक हे धन्य…”

आजचा दिवस होता कृतज्ञवारीचा. योगायोगाने १४ फेब्रुवारी बाहेरच्या जगात प्रेमाचा दिवस. पण सलाईबनात या दिवसाचा अर्थ वेगळाच होता. इथल्या मातीबद्दल, जागेबद्दल, सेवाधाऱ्यांबद्दल आणि शिबिराने दिलेल्या प्रेम आणि अनुभवांबद्दल मनात दाटून आलेल्या कृतज्ञतेचा हा दिवस होता.
सकाळी व्यायाम आणि ध्यानानंतर वारकरी शेवग्याच्या शेतात पोहोचले. श्रमदान आता शेवटच्या टप्प्यात असल्याने सगळ्यांनी उत्साहाने काम पूर्ण केलं.

यानंतर प्रज्ञामंचावर प्रीती ताईंचं सत्र रंगले. मानसिक आरोग्य, नाती आणि करिअर यावर झालेल्या मनमोकळ्या संवादातून नाती जपत असताना स्वतःला समजून घेणं आणि आयुष्याची दिशा निवडताना मनाचं भान ठेवणं ही नवी जाणीव सगळ्यांना मिळाली.
पाहुण्यांसोबत प्रेमाहार झाला आणि पुढे वरण-बाटीचा आस्वाद घेत क्षण अधिक रंगले. त्यानंतर झालेल्या अनुभवकथनात प्रत्येकाने या काही दिवसांत मिळालेल्या आठवणी, नवे मित्र आणि माणसांमधली जपलेली आपुलकी शेअर केली.

दिवसाची सांगता झाली ती एका खास कृतज्ञतेच्या अ‍ॅक्टिव्हिटीने. सालईबनातील प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथे मिळालेल्या शिकवणी, आठवणी आणि जगलेले क्षण यांना नमन करत मातीला, निसर्गाला आणि माणसांना मनापासून “धन्यवाद” दिले.
रात्री गाण्यांची सुंदर मैफल रंगली. कोणी सूर लावत होतं, कोणी ताल धरत होतं आणि सगळे त्या क्षणात हरवले होते.

मात्र दिवस संपताना मनात हलकीशी हुरहूर होती. कारण उद्या या वारकऱ्यांना सालईबनातून पुढे निघायचं आहे.
इथून मिळालेले मित्र, अनुभव आणि मातीची ही अमूल्य शिदोरी सोबत घेत तरुणाईकर म्हणून पुढचा प्रवास सुरू करायचा आहे.

अशी ही कृतज्ञवारी…इथे जे काही मिळालं, त्यासाठी मनापासून कृतज्ञ..

[Teamtarunaai, Camp, Buldhana, Maharashtra]



Address

HIWARA ASHRAM
Mehkar
443301

Opening Hours

Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Team Tarunaai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Team Tarunaai:

Share