Goa Pradesh Sane Guruji Kathamala

Goa Pradesh Sane Guruji Kathamala GPSGK is working for the creation of value based society through various Story Telling programs for Children The category includes:
a. are also conducted.

Goa Pradesh Sane Guruji Kathamala (GPSGK), is a socio-cultural and educational organisation. It started its activity in August 1962 and is affiliated to Akhil Bharatiya Sane Guruji Kathamala – Mumbai, established on 24th December 1951 as a live memorial of Late Pandurang Sadashiv Sane popularly known as Sane Guruji. Sane Guruji was a multi-talented and multi-faceted person. He was an ideal teacher

, social worker, veteran freedom fighter, author, poet, translator, good organiser and orator. He was a firm believer that the children could be shaped as ideal citizens imbibing moral values through the most popular, effective and traditional medium of storytelling at a tender age. GPSGK conducts various activities across Goa to achieve the dreams of Sane Guruji. These activities aim to encourage participants to read and narrate good stories. Main activities include:

STORYTELLING PROGRAMS BY STUDENTS

1) Organizing Story Telling Programs for School students in different eighteen centers spread across 12 Talukas of Goa. Primary (First to Fourth standard),
b. Upper Primary (Fifth to the seventh standard),
c. Secondary (Eight to Tenth standard)

2) Story Telling Programs for Higher Secondary Students are conducted with preliminary at district levels and final at State Level. STORY TELLING PROGRAMS BY PARENTS & TEACHERS

Story Telling Programs for Parents and Teachers. The preliminary is conducted at district levels and finals at the state level. STORYTELLING PROGRAMS FOR STUDENTS

Storytelling programs are organized in various schools for 2-5 hours emphasizing the stories of Great Revolutionaries, scientists, social workers, social leaders, martyrs from wars, and the freedom movement,etc. Various prayers, songs and slogans are also included. ELOCUTION COMPETITION

This competition is conducted in the memory of the founder of Kathamala, Late Shri. Prakashbhai Mohadikar for the students of Colleges and Goa University. The topics for the elocution are based on scientific temper, eradication of superstitions, democratic values, human values, environmental awareness, social issues,etc.. STORYTELLING WORKSHOPS

GPSGK conducts periodic storytelling workshops for students, teachers, and parents in which the participants are trained in the art of narrating stories. Various songs based on patriotism, national integration, social and environmental awareness, etc are also included in this programs. PERSONALITY DEVELOPMENT CAMPS

Regular camps are conducted for the holistic development of students. The camps impart values through various storytelling methods such as narration, dialogue, delivery, public speaking, story writing. The students are also taught songs based on patriotism, environment, humanity, national integration, etc. BAL ANAND MELAVA

Bal Anand Melava is a cultural festival for students conducted in collaboration with several educational institutions based in Goa. Activities such Art, Craft, handcraft, Theatre, Singing, Clay Sculpting, traditional games are conducted during the full-day event. OTHER ACTIVITIES

Additionally, activities such as lecture series, story readings, conferences, training of judges for fairselection of Story Tellers at Centre or District levels and State Level, etc. GPSGK has been always supported by the members, volunteers and various business groups as and when we approach for financial support. We could have our own office premises at Sapana Gardens, Porvorim- Goa in 1996 and now at Raj Durga Heritage, Daag-Ponda, Goa through the blessings of Shri Krishna Nanu Naik and his family for which we are indebted to our most beloved Shri Krishnabhau. GPSGK is registered under Societies Registration Act 1860 and recognized under section 12A of Income Tax Act 1961.

13/04/2026

V *प्रसिद्धी पत्रक*

*कथामालेचा वार्षिक कार्यकर्ता मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभा २६ एप्रिल, २०२६ रोजी*

गोवा प्रदेश साने गुरुजी कथामालेचा वार्षिक कार्यकर्ता मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक, २६ एप्रिल, २०२६ रोजी सकाळी ०९.३० वाजता कथामालेच्या कृष्णा नानु नायक कार्यालयांत आयोजित करण्यात आली आहे. चहा व अल्पोपाहाराची सोय करण्यात आली आहे.

कथामालेच्या माशेल केंद्राचे सक्रीय कार्यकर्ते तसेंच सहकार चळवळीतील गोव्यातील नामवंत कार्यकर्ते व वकील एड. विनायक नार्वेकर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

दुपारी १२.३० वाजता कथामालेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. भोजनानंतर कार्यक्रम संपणार आहे.

सर्व विश्वस्त, पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, हितचिंतक, देणगीदार, इत्यादी व्यक्तींना वैयक्तिक सूचनापत्रे पाठविण्यात आली आहेच.

कृपया कार्यक्रमाला उपस्थित राहून सक्रीय भाग घेऊन सहकार्य करावे. सर्व कार्यकर्त्यांना बस प्रवास खर्च देण्यात येईल.

तरी इच्छुकांनी उपस्थित राहणार असल्याबद्दल कथामालेच्या कार्याध्यक्षा सौ. शैलजा बाळे अथवा प्रमुख कार्यवाह श्री.अनंत सावंत यांना वैयक्तिकरित्या कळवावे व कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन गोवा प्रदेश साने गुरुजी कथामालेतर्फे करण्यात आले आहे.

31/03/2026

*प्रसिद्धी पत्रक*

*कथामालेचा वार्षिक कार्यकर्ता मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभा २६ एप्रिल, २०२६ रोजी*

गोवा प्रदेश साने गुरुजी कथामालेचा वार्षिक कार्यकर्ता मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक, २६ एप्रिल, २०२६ रोजी सकाळी ०९.३० वाजता कथामालेच्या कृष्णा नानु नायक कार्यालयांत आयोजित करण्यात आली आहे. चहा व अल्पोपाहाराची सोय करण्यात आली आहे.

कथामालेच्या माशेल केंद्राचे सक्रीय कार्यकर्ते तसेंच सहकार चळवळीतील गोव्यातील नामवंत कार्यकर्ते व वकील एड. विनायक नार्वेकर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

दुपारी १२.३० वाजता कथामालेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. भोजनानंतर कार्यक्रम संपणार आहे.

सर्व विश्वस्त, पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, हितचिंतक, देणगीदार, इत्यादी व्यक्तींना वैयक्तिक सूचनापत्रे पाठविण्यात आली आहेच.

कृपया कार्यक्रमाला उपस्थित राहून सक्रीय भाग घेऊन सहकार्य करावे. सर्व कार्यकर्त्यांना बस प्रवास खर्च देण्यात येईल.

तरी इच्छुकांनी उपस्थित राहणार असल्याबद्दल कथामालेच्या कार्याध्यक्षा सौ. शैलजा बाळे अथवा प्रमुख कार्यवाह श्री.अनंत सावंत यांना वैयक्तिकरित्या कळवावे व कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन गोवा प्रदेश साने गुरुजी कथामालेतर्फे करण्यात आले आहे.

29/03/2026

*वै कृष्णा नानु नायक द्वितीय स्मृतिव्याख्यान संपन्न*

गोवा प्रदेश साने गुरुजी कथामालेतर्फे प्रमुख देणगीदार व उद्योजक वै. कृष्णा नानु नायक यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त कृष्णशील चॅरिटेबल ट्रस्ट, सारस्वत चेंबर ऑफ कॉमर्स आणि रवींद्र भवन, मडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २८ मार्च, २०२६ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजता रवींद्र भवन, मडगांव येथील कृष्णकक्षात वै. कृष्णा नानु नायक द्वितीय स्मृतिव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यानिमित्त वै. नायक यांच्या जीवनावर श्री. उदय कामत निर्मित व श्री. अनंत अग्नी यांच्या ध्वनी आधारित एक माहितीपट प्रदर्शित करण्यात आला व त्यानंतर श्री. श्रीराम नटराजन, संस्थापक व मुख्य कार्यकारी संचालक- मोलबिओ डायग्नॉस्टिक लिमिटेड, वेर्णा- गोवा यांचे व्याख्यान तथा मुलाखत उद्योजक श्री. प्रवीण पै काकोडे यांनी घेतली.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वै.नायक यांनी विविध उद्योग यशस्वी रित्या स्थापन केले व तरुणांमधील उद्यमशीलतेला प्रोत्साहन देऊन त्यांना उद्योजक बनविण्याच्या द्रष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी तसेंच तरुण उद्योजकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Congratulations to all the Trustees, Office Bearers, Members, Volunteers, etc. for their dedicated support.
16/01/2026

Congratulations to all the Trustees, Office Bearers, Members, Volunteers, etc. for their dedicated support.

07/01/2026

*गोवा प्रदेश साने गुरूजी कथामालेला अखिल भारतीय साने गुरूजी कथामालेचा राष्ट्रीय उत्कृष्ट कथामाला पुरस्कार-२०२६ जाहिर*

गोवा प्रदेश साने गुरूजी कथामालेला अखिल भारतीय साने गुरूजी कथामालेचा "राष्ट्रीय उत्कृष्ट कथामाला पुरस्कार-२०२६" जाहिर झालेला आहे. हा पुरस्कार प्राप्त झाला असून श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, ऑरियंटल इंग्लिश स्कूल, विद्या संकुल, इंद्रप्रस्थ नगर, टिळकवाडी, बेळगांव (कर्नाटक). बेळगांव येथे होणाऱ्या ५८व्या राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनात रविवार दिनांक ११ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता उद्घाटन सत्रांत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

०१ ऑगस्ट, १९६२ रोजी स्थापन झालेल्या गोवा प्रदेश साने गुरूजी कथामाला आज गोव्याच्या बारा तालुक्यातील अठरा केंद्रातून कार्यरत आहे. प्राथमिक, उच्च प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा चार गटातील केंद्रवार घेतलेल्या मेळाव्यातून प्रत्यक्ष हजारावर विद्यार्थी भाग घेतात तर अप्रत्यक्षपणे दहा ते बारा हजार विद्यार्थी सहभागी होतात. राज्य स्तरीय कथाकथन मेळाव्यातून ११८ विद्यार्थी तर परीक्षक, पालक,शिक्षक, विश्वस्त, पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, हितचिंतक असे ३५० हून अधिक व्यक्ती सहभागी होतात. कथाकथनातून कथावाचन, कथाश्रवण, कथालेखन या उपक्रमातून मूल्यशिक्षण मिळत असते.

याशिवाय विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, परिक्षक मार्गदर्शन प्रशिक्षण, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी कथाकथन व गीत गायन प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास शिबीर, कथाकथन व कथालेखन कार्यशाळा, कथाकथनातून आनंददायी शिक्षण, दप्तरमुक्त शालेय दिनासाठी कथाकथन व गीतगायन प्रशिक्षण, कार्यकर्त्यांसाठी वार्षिक मेळावा इत्यादी अनेक उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात.

गोवा प्रदेश साने गुरूजी कथामालेला यापूर्वीच अखिल भारतीय स्तरावर उत्कृष्ट कथामाला पुरस्कार, स्व. अरविंद नेवगी व श्री. अशोक तिळवी यांना बालसेवा पुरस्कार तर सौ. स्मिता देसाई यांना उत्कृष्ट कथानिवेदक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

*४८ वा साने गुरुजी राज्यस्तरीय विद्यार्थी कथाकथन मेळावा उत्साहात संपन्न.* गोवा प्रदेश साने गुरुजी कथामाला, कला व संस्कृत...
28/12/2025

*४८ वा साने गुरुजी राज्यस्तरीय विद्यार्थी कथाकथन मेळावा उत्साहात संपन्न.*

गोवा प्रदेश साने गुरुजी कथामाला, कला व संस्कृती संचालनालय, पणजी–गोवा तसेच श्रद्धानंद ज्ञानप्रसारक मंडळ व श्री श्रद्धानंद विद्यालय कथामाला केंद्र, पैंगीण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४८ वा साने गुरुजी राज्यस्तरीय विद्यार्थी कथाकथन मेळावा दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी लोलये येथील श्री दामोदर विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात "खरा तो एकची धर्म" ही प्रार्थना, स्वागत गीत तसेंच "स्मरूनी गोमंत देवी " या गीताने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उद्घाटन व सत्कार समारंभासाठी क्रीडा, कला आणि संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर उद्घाटक या नात्याने उपस्थित होते. त्याचबरोबर श्रद्धानंद ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश प्रभुगावकर, श्री श्रद्धानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती खोलकर, श्री दामोदर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जितेंद्र आमशेकर, गोवा प्रदेश साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष श्री अशोक तिळवी, उपाध्यक्ष श्री पद्मनाभ प्रभुदेसाई, कार्याध्यक्षा सौ. शैलजा बाळे, सचिव श्री अनंत सावंत, संघटक श्रीकृष्ण धोंड, साने गुरुजी विश्वस्त मंडळाच्या सचिव सौ. स्मिता देसाई, आयोजन समितीचे संयोजक श्री अरुण वामन भट तसेच पैंगीण पंचायतीचे नवनियुक्त जिल्हा पंचायत सदस्य श्री अजय लोलयेकर उपस्थित होते.

साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या तसेंच गत वर्षींचे राज्य स्तरीय विजेते यांच्या हस्ते पार पडले. पाहुण्यांचे स्वागत सौ. स्वाती खोलकर यांनी केले. प्रास्ताविक श्री अशोक तिळवी यांनी सादर केले. पाहुण्यांची ओळख सौ. रुपा देसाई यांनी करून दिली, तर फुलांनी स्वागत सौ. दिया आडपईकर व सौ. कॅरल फर्नांडिस यांनी केले. या वेळी साने गुरुजी कथामालेचे माजी अध्यक्ष श्री रमेश कुलकर्णी तसेच केंद्रस्तरीय कार्यकर्ते श्री नागेश सिताराम गोसावी (पेडणे केंद्र) यांना स्व. अरविंद नेवगी स्मृती पुरस्कार तर श्री गोपाळ आप्पाण्ण गुरव ( माशेल केंद्र) यांना स्व. श्रीधर वेरेकर स्मरणिका पुरस्कार देऊन डॉ. रमेश तवडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आपल्या भाषणात डॉ. रमेश तवडकर यांनी साने गुरुजी कथामालेच्या उपक्रमांचे कौतुक केले व या चळवळीला आपला नेहमीच पाठिंबा राहील असे आश्वासन दिले. यावेळी गत वर्ष राज्य स्तरीय विजेती विद्यार्थिनी कु. श्रीजा फडते हिने आपले मनोगत व्यक्त केले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन सौ. प्रणिता नाईक गावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. साईली बांदेकर यांनी केले.

या मेळाव्यात प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा चार गटांत कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण १८ केंद्रांतून तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत प्रथम व द्वितीय बक्षीस प्राप्त ११२ विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, कथामालेचे पदाधिकारी, विश्वस्त, कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते, हितचिंतक, देणगीदार असे जवळपास ३५० व्यक्तींचा सहभाग सकाळी ०९.०० ते संध्याकाळी ०५.०० पर्यंत चाललेल्या या राज्यस्तरीय मेळाव्यात सहभागी झाले होते.

भोजनानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अरुण सगुण भट, निवृत्त मुख्याध्यापक, श्री. दामोदर विद्यालय, लोलये हे उपस्थित होते. विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चिन्मय आमशेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. संपदा प्रभुदेसाई यांनी केले.

हा मेळावा विद्यार्थ्यांच्या कथावाचन, कथाकथन, कथाश्रवण कौशल्यांना चालना देणारा तसेच साने गुरुजींच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा ठरला.

15/12/2025

अखिल भारतीय साने गुरूजी कथामालेचे ५८ वे वार्षिक अधिवेशन शनिवार दिनांक १० जानेवारी व रविवार दिनांक ११ जानेवारी, २०२६ रोजी बेळगांव ( कर्नाटक) येथे आयोजित करण्यात आले आहे. सविस्तर कार्यक्रम तसेंच नक्की स्थळ/ सभागृह यथावकाश कळविण्यात येईल.

गोव्यातील जे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे त्यांनी कृपया कथामालेचे कार्याध्यक्ष सौ. शैलजा बाळे किंवा संघटक श्री. श्रीकृष्ण धोंड यांच्याकडे नांव नोंदणी करावी म्हणजे आयोजकांना उपस्थित राहणाऱ्यांची संख्या कळविणे शक्य होईल.

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस, ता.मंठा जि.जालनाआयोजित ============'जागर श्यामच्या कथांचा'=============• प्रा...
13/07/2025

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस, ता.मंठा जि.जालना
आयोजित
============
'जागर श्यामच्या कथांचा'
=============
• प्रारंभ : १६ जुलै २०२५ पासून

सप्रेम नमस्कार,

हेलस साने गुरुजी कथामालेने तीन दशकांची वाटचाल पूर्ण करून ३१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने शिक्षणाबरोबरच सुसंस्कार व मनोरंजनही व्हावे, या उद्देशाने पूज्य साने गुरुजींच्या ' श्यामचीआई ' पुस्तकातील ४२ कथांचा समावेश असलेल्या
============
' जागर श्यामच्या कथांचा'
============
हा उपक्रम या वर्षी १६ जुलै २०२५ बुधवार पासून राबविण्यात येणार आहे. या कथांची उत्कृष्ट अभिवाचन निर्मिती श्री. राजेंद्र जोशी ( छत्रपती संभाजीनगर) यांची आहे, तर उपविभागीय अधिकारी अंजली धानोरकर यांनी आपल्या गोड वाणीतून अभिवाचन केले आहे. या कथा प्रत्येक मुलांपर्यत शैक्षणिक ग्रुपच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी शिक्षक, पालक, कथामालेचे कार्यकर्ते यांचे बहुमोल सहकार्य नेहमीच लाभत आले आहे. त्यातूनच या उपक्रमाला या आधीही मोठा प्रतिसाद मिळाला. विविध शाळांतील हजारो विद्यार्थी सहभागी झाले. त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्रही देण्यात आले. यावर्षीही सर्वांनी सहकार्य करावे व उपक्रमांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागासाठी प्रोत्साहन द्यावे ही विनंती.
=====
□उपक्रम असा राहील...

•दररोज एक कथा या प्रमाणे ४२ दिवस ४२ कथा शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये पाठविण्यात येतील.

• कथा परिपाठामध्ये मुलांना ऐकविण्याची व्यवस्था व्हावी.

• शिवाय मुलांच्या वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये पाठविता येईल.

• ४२ कथा ऐकून झाल्यावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.

• सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईन मिळेल.

• सर्व सहभागी शाळांनाही ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येईल.
=========..चला तर मग मुलांना 'श्यामच्या कथा' ऐकवूया...संस्काराचे वारकरी बनूया..!

अधिकाधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया शिक्षकांनी व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हावे.‌ ग्रुपमध्ये असल्यास लिंक पुढे फॉरवर्ड करून सहकार्य करावे ही विनंती.

Follow this link to join my WhatsApp community: https://chat.whatsapp.com/CFRkLFQIysH0TuoSyUEBNq
============

कल्पना दत्तात्रय हेलसकर
संयोजक तथा अध्यक्ष
9420036935
==========

□संयोजन समिती

•डॉ.सुहास सदाव्रते
9404536767
•बाबासाहेब हेलसकर
9881525510
•विजय वायाळ
7588089360
•सतीश कुलकर्णी
7588412852
•प्रमोद देशमुख
9890806400
•मंताजी ढाकरे
8412803595
•आर.आर.जोशी
9421474340
•जमीर शेख
9421327062
=============

WhatsApp Group Invite

13/07/2025

*कथाकथन परीक्षक मार्गदर्शन शिबीर*

गोवा प्रदेश साने गुरुजी कथामाला प्रतिवर्षाप्रमाणे रविवारी दिनांक २० जुलै, २०२५ रोजी सकाळी ०९. ३० ते दुपारी १२.३० पर्यंत कथामालेच्या स्व. कृष्णा नानू नायक कार्यालय, २०१- राज दुर्गा हेरिटेज, फोंडा दुर्भाट रस्ता, दाग-फोंडा, गोवा येथे "कथाकथन मार्गदर्शन शिबीर " आयोजित करण्यात आले आहे. यापूर्वी ज्यांनी परीक्षक म्हणून काम केले आहे व जे परीक्षक म्हणून काम करु इच्छित आहेत त्यांनी आवर्जून या शिबीरात उपस्थित राहावे.
उपस्थितांसाठी प्रवास खर्च दिला जाईल तसेच सकाळी चहा-पान व दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली जाईल .

इच्छुकांनी कृपया आगाऊ नोंदणी करण्यासाठी खालील पदाधिका-यांना संपर्क करावा.

१.अरुणा पाटणेकर, उपाध्यक्ष
9822११8763.
२.शैलजा बाळे, कार्याध्यक्ष
9673196094.
३.अनंत सावंत, प्रमुख सचिव
9422847213.

27/04/2025
27/04/2025

*गोवा प्रदेश साने गुरूजी कथामालेचा कार्यकर्ता मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभा*

गोवा प्रदेश साने गुरूजी कथामालेतर्फे वार्षिक कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आज *रविवार दिनांक २० एप्रिल, २०२५ रोजी सकाळी ०९.३० वाजता व त्यानंतर कथामालेची वार्षिक सर्वसाधारण सभा १२.३० वाजता* कथामालेच्या "कृष्णा नानू नायक कार्यालय",राज दुर्गा हेरिटेज, फोंडा-दूर्भाट रस्ता, दाग- फोंडा, गोवा येथे संपन्न झाली.

मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मोहन सावंत, निवृत्त शिक्षणाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा व माजी प्रमुख संघटक, अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला, मुंबई हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते व त्यांनी आपल्या भाषणातून कथामालेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून कथामाला कशी चालवावी यासंदर्भात मार्गदर्शन केले.

सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी कथामालेचे अध्यक्ष प्राचार्य पांडुरंग नाडकर्णी होते. कार्याध्यक्ष श्री.अशोक तिळवी, प्रमुख कार्यवाह श्री. अनंत सावंत, कोषाध्यक्ष सौ. शैलजा बाळे व अन्य पदाधिकारी तसेंच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री. माधव तालक, विश्वस्त प्राचार्य भास्कर नायक, विश्वस्त समीर अरविंद नेवगी, विश्वस्त अश्मा पागी उपस्थित होते.

Address

C/o Ashok Tilvi, Ganesh Nagar
Marcela
403410

Telephone

+919923110938

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Goa Pradesh Sane Guruji Kathamala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share