28/01/2026
आज दिनांक 28 जानेवारी रोजी देवळा शहरातील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात प्रभू श्रीराम यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाच्या विरोधात अभाविप देवळातर्फे आंदोलन करण्यात आले. महाविद्यालय हे सर्व धर्मांचा सन्मान राखणारे शिक्षणसंस्थान असून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृती अथवा वक्तव्यांना येथे स्थान नसावे, अशी भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देवळा शहर सहमंत्री वैभव पवार यांनी यावेळी व्यक्त केली. सदर प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी होऊन संबंधित प्राध्यापकावर महाविद्यालय तर्फे कारवाई करण्यात आली. यावेळी अभाविप कार्यकर्ते व इतर विद्यार्थी उपस्थित होते.