Salunke Rescue Team

Salunke Rescue Team Rescue Team based in Mahad .working all over raigad

08/10/2025

teams Raigad

19/08/2024
माननीय,       पोलीस निरीक्षक ,           श्री राजेंद्र जी पाटील सर .        आम्हाला अत्यंत दुःख वाटत आहे की आपण आमच्या ग...
11/07/2024

माननीय,
पोलीस निरीक्षक ,
श्री राजेंद्र जी पाटील सर .
आम्हाला अत्यंत दुःख वाटत आहे की आपण आमच्या गावातून दूर दुसऱ्या गावात जात आहात .आपण पोलीस अधिकारी नाही तर रेस्क्यू टीमचा आधारस्तंभ म्हणून कायम आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात.
अनेक लोकांच्या संकटात वाईट परिस्थितीमध्ये धैर्याने व शौर्याने खंबीरपणे आपण मदत केलीत.आमच्या टीमला बळ व प्रोत्साहन देण्याचे काम नेहमी आपण केलेत .
आपल्या माध्यमातून आमच्या टीमला एक 🚨ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आयुष्यभर आपले ऋणी आहोत.
आपणा सारखा अधिकारी आम्हास लाभला हे आमचे नशीबच पण आपण जरी दूर गावी गेलात तरी नेहमी आपण आमच्या मनात राहणार याबाबत शंका नाही .
आपण जाताना आमची ताकद मात्र घेऊन जात आहे एवढं मात्र नक्की सर .
आपल्यासारखा अधिकारी आम्हाला व आमच्या माणगाव शहराला लाभला हे आमचे भाग्य
पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमच्या चांगल्या कामाने तुम्ही खूप मोठे होणार यात शंका नाही.तुमचा प्रेम आमच्यावर कायम असू दे एवढीच आमची प्रार्थना 🙏
🙏🙏🙏🙏धन्यवाद सर
शुभेच्छुक- साळुंके रेस्कु टिम सर्व मेंबर्स🙏🙏🙏

01/07/2024

धाडस नको रे बाबानो
भलतं धाडस करणं एका कुटुंबाच्या अंगाशी आलं आहे.
लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात 5 जण बुडाले. तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध अद्यापही सुरू आहे. आग्राहून आलेलं हे कुटुंब भुशी डॅमच्या मागच्या बाजूला असलेल्या धबधब्यात पोहोचलं गुडगाभर पाण्यानी रुद्र रुप धारण करुन कुटुंबावर घाला घातला..
हे सर्व 27 तारखेला आग्रा इथून ते एका लग्नासाठी आले होते. लग्नसोहळा पार पडला. 30 जूनला रिसेप्शन होतं ते देखील पार पडलं आणि त्यांनी लोणावळा फिरयाचा प्लॅन केला होता, 1 जुलैला ते मुंबईला जाणार होते. सकाळी सगळे निघाले, येता येता छोट्या धबधब्यावर थांबायचं होतं मात्र तिथे पार्किंग मिळालं नाही व ते पुढे आले. लोकांच्या मागून त्यांनी ही अडनिड्या धबधब्याची जागा शोधली.
भुशी डॅमऐवजी ते इथे लोकांच्या मागून धबधब्यावर जाण्यासाठी आले. तेथे ५०-६० लोक होते ते धबधब्याच्या ठिकाणी गेले आणि अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि पाच जण वाहून गेले. आग्राहून आलेल्यांपैकी पती-पत्नी आणि त्यांची मेहुणी आणि चार वर्षांचं बाळ वाहून गेलं. अन्सारी कुटुंबातील चार जण वाहून गेलं आहे .
त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून कोणत्याही धबधब्यावर जाऊ नका, कुठल्याही अडचणीच्या जागी जाऊ नका. खास करुन कुटुंबाला अशा ठिकाणी घेऊन जाऊ नका,पावसाळ्यात पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने जीव धोक्यात घालून कुठेही जाऊ नका असं आवाहन साळुंके रेस्कु टिम कडुन वारंवार केलं जाते…अनेक म्रुतदेह आम्ही शोधुन काढतो ..काय कुटुंबाची परीस्थिती होते ते आम्हाला माहीते..या सोबत प्रशासकीय यंत्रणा सुध्दा आपण कामाला लावतो… म्हणुन सांगतो पाण्याशी खेळ करु नका आपला व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात टाकु नका…🙏🙏🙏🙏
✍️प्रशांत साळुंके..अध्यक्ष साळुंके रेस्कु टिम. महाराष्ट्र@highlight

Address

Mahad

Telephone

+919702446444

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Salunke Rescue Team posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Salunke Rescue Team:

Share