27/09/2024
*जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन केले पाहिजे - मा. चंद्रकांत दळवी*
माढा प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथे १३७ वा कर्मवीर जयंती सोहळा व विविध इमारत बांधकामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला .
यावेळी पी.एम. उषा योजना व महाविद्यालयातर्फे बांधण्यात येणाऱ्या विविध इमारतींचे भूमिपूजन प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते केले. 400 मीटर सिक्स लेन रनिंग ट्रॅक, जनार्दन वामनराव चव्हाण मुलांचे वसतिगृह, IKS बहुउद्देशीय सभागृह इमारतीचे भूमिपूजन प्रमुख पाहुने मा. चंद्रकांत दळवी (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते केले. कौशल्य विकास केंद्र इमारतीचे भूमिपूजन माननीय रामदास (काका) भाजीभाकरे यांच्या हस्ते केले.
तसेच संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन मा. संजीव पाटील यांचे शुभहस्ते विज्ञान विभागाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. या विविध बांधकामाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीबरोबर कौशल्य व कलात्मक विकास होईल असे प्रमुख पाहुणे मा. चंद्रकांत दळवी यांनी नमूद केले.
या कार्यक्रमांमध्ये विद्यापीठ व बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व कर्मवीर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मध्य विभागाचे चेअरमन मा.संजीव पाटील होते. पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावित असे सांगितले.
जागतिक कीर्तीचे चित्रकार श्री. रत्नदीप बारबोले यांनी प्रमुख पाहुणे यांचे साकारलेले चित्र त्यांच्या हस्ते भेट दिले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कल्याणी महाबोले हिने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे रेखाचित्र तयार करून संस्था व महाविद्यालयाला भेट दिले. या दोघांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय कर्मवीर जयंती सोहळ्याचे कार्याध्यक्ष प्रा. सौदागर शिंदे यांनी केला. पारितोषिक वितरणाचे वाचन प्रा. अशोक लोंढे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अशोक कदम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चतुर्भुज गीड्डे यांनी केले.
कार्यक्रमास माजी आमदार ॲड. धनाजीराव साठे, नगराध्यक्षा ॲड. मिनलताई साठे, जनरल बॉडी सदस्य चंद्रकांत दादा गायकवाड, जनरल बॉडी सदस्य ॲड. बाळासाहेब पाटील, बाबासाहेब क्षिरसागर, के बी पी कॉलेज पंढरपूरचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे , एल.बी.पी. कॉलेज सोलापूरचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे , मुख्याध्यापक विजयकुमार डूरे-पाटील, प्रकाश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.