श्रीशिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थान नाशिक

  • Home
  • India
  • Lonavla
  • श्रीशिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थान नाशिक
22/06/2026

!! श्रीशिवछत्रपती परंपरा !!

अतोनात उंदीर कुणी त्रस्त झाला ।
तयानें त्वरे पाळणें मांजराला ।।
परंतू दुधापासूनी दूर ठेवा ।
जगीं हिन्दु अष्टावधानी असावा ।।

#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी ⛳
#श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान🚩
#श्लोकमालिका
#जगीं_हिन्दु_अष्टावधानी_असावा

आपण खूप जण संभाजीराव भिडे गुरुजी या व्यक्तीला ब्राह्मण आहे म्हणून शिव्या देत आहात पण त्या व्यक्तीने काय काय केले आहे ते ...
22/06/2026

आपण खूप जण संभाजीराव भिडे गुरुजी या व्यक्तीला ब्राह्मण आहे म्हणून शिव्या देत आहात पण त्या व्यक्तीने काय काय केले आहे ते तुम्हाला समजून घ्यायला हवं.
1986 ते 1990 या पाच वर्षात केलेले उपक्रम हे महाराष्ट्र राज्यात 40 वर्ष झालं सुरू आहेत.

1 ) श्री दुर्गामाता दौड. नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी असते, रोज सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये एकत्रितपणे भगवा झेंडा घेऊन प्रत्येक गावपातळीपासून जिल्हापर्यंत तरुण आपापल्या भागात दुर्गा माता दौड काढतात उद्या भागातून दौड जात असते तेथील महिला त्या ध्वजाची पूजा करतात.
2) धर्मवीर बलिदान मास. संभाजी महाराजांचा बलिदान मास म्हणजे काय कशासाठी आहे तो का करावा कशासाठी पाळायचा ही भिडे गुरुजींनी तरुणांच्या मध्ये रुजवले. हा महिना दुःखाचा सूतकाचा पाळायचा म्हणजे या महिन्यांमध्ये कोणीही सुखाचा क्षण साजरा करत नाही प्रत्येकाला स्वतःच्या आवडीची वस्तू सोडण्यासाठी भाग पाडले. जसे की कोणी एक वेळचा चहा सोडते, कोणी गोड सोडते, कोणी अंथरुणावर झोपायचे सोडते, कोणी चप्पल सोडते, तर कोण मुंडन करते, ही भिडे गुरुजींनी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सांगितले. आपल्या महाराजांना एक महिना हाल हाल करून मारले ते तरुणांच्या बिंबवण्यासाठी गुरुजींनीही जागरूकता निर्माण केली. प्रत्येक गल्लीमध्ये चौकामध्ये संभाजी महाराजांचा फोटो लावून ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हटला जातो. आणि शेवट दिवशी अमावस्येला संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणून मूकपद यात्रा काढली जाते.
3) शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा. सांगली पासून सुरुवात केली. आज महाराष्ट्रामध्ये कर्नाटकचा काही भाग यामध्ये जिथे जिथे संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्या त्या भागात रोजच्या रोज पूजाही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या धारकऱ्यांमार्फत केली जाते. नाहीतर बाकीची पण आपापल्या गावात महापुरुषांची पुतळे आहेत तेथे नगरपालिकेची कर्मचारी पगारावर पूजेचं काम करतात.
4) गडकोट मोहीम. 40 वर्ष झाले गडकोट मोहीम ही सुरू केलेली आहे. एका गडावरून सुरुवात करून दुसऱ्या गडावर चालत जायचे. शिवाजी महाराज कसे जगले कसे लढले, याचा अनुभव घेण्यासाठी, त्यांचे स्मरण करण्यासाठी, ज्या किल्ल्यांवर आपले मावळे गतप्राण झाले, ती माती कपाळा वर लावून आशीर्वाद घेण्यासाठी गडकोट मोहीम असते. यामध्ये चार दिवस हे बाहेरचे काही खायचे नसते. घरचेच जेवण हे बांधून घेतले जाते, दिवसभर चालायचे सायंकाळ झाली की थांबायचे आणि महाराष्ट्रातील थोर व्याख्याते शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यावर व्याख्यान सांगतात. चार दिवस मोकळ्या पटांगणातच झोपायचे असते.
5) शिवराज्याभिषेक दिन. आपण आपल्या घरी सर्व कार्यक्रम हे तिथीनुसारच करत असतो. जसे की दसरा दिवाळी, बुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, मयत झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध. घरी लग्नकार्य असेल तर आपण मुहूर्तावरच करतो. लहान मुलांचे बारसे, डोहाळ जेवण मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीनुसारच करावा गेली 40 वर्ष गुरुजींनी सुरू केलेला आहे.
6) शिवाजी महाराजांचे समाधीची पूजा. गेली 40 वर्ष सांगली वरून हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये सांगली वरूनच हार जात असतो रायगडच्या पूजेसाठी. अखंडपणे चाललेली महाराजांची सेवा ही गुरुजींनीच सुरू केली त्याचे टिप्पण गुरुजींकडे असते ज्याला कोणाला हे पाहायचं आहे त्यांनी माहिती घ्या एका वर्षाचं नियोजन गुरुजींकडे असतं कार्यकर्त्यांची यादी त्याचा फोन नंबर तो गेलाय का नाही हे बघण्यासाठी रायगड वर असलेल्या माणसांपर्यंत विचारपूस पूर्ण नियोजन हे गुरुजीच करतात...

हे सर्व उपक्रम भिडे गुरुजींनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेले नाहीत. 88 ज्या माणसाचं वय आहे, तो माणूस आपली वयाची संपूर्ण आयुष्य हे शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे कसे जगले कसे लढले कसे हे तरुणांमध्ये रुजवण्याचे काम गुरुजींनी केले. तरुण पिढी व्यसनाधीन होऊ नये आणि व्यसना मधून बाहेर खूप तरुणांना काढायच काम गुरुजींनी केलेला आहे. त्यांच्या जागी जर दुसरा कोणी माणूस असता लग्न करून मुलं काढून निवांत राहू शकला असता. तुम्ही सर्वांनी विचार करावा की ह्या व्यक्तीला काय पडला आहे धर्मा साठी संपूर्ण स्वतःचे जीवन समर्पित करण्यासाठी. आपण पूर्ण माहिती घेत नाही ,म्हणून शिव्या देता, कसेही बोलता. निदान बोलताना वयाचा विचार करून बोलावा. आपल्या घरी सुद्धा वयोवृद्ध आई-वडील असतील आपण असेच बोलता का..

भिडे गुरुजींचा रोजचा नित्यक्रम.. दररोज सकाळी चार वाजता उठणे उठल्यावर चार ते सहा वाजेपर्यंत 50 ते 55 विभाग प्रमुखांना फोन करणे व्यायामासाठी ते विभाग प्रमुख उठून त्यांच्या गटप्रमुखांना खाली फोन लावतात व एकत्रितपणे सकाळी सहा ते साडेसात वाजेपर्यंत सूर्यनमस्कार बैठका जोर हा व्यायाम होतो घाटावर. ते या वयात सुद्धा 100 च्या वर सूर्यनमस्कार घालतात. बैठका 80, जोर 50 हा दररोजचा व्यायाम असतो. नंतर सर्व ते दैनंदिन बैठकीसाठी बाहेर पडतात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता. खोलीवर येतात दुपारचे जेवण हे कार्यकर्त्यांच्या घरी असतं परत सायंकाळी पाच वाजता बाहेर पडले कि रात्री अकरा बारा वाजता येतात बैठका साठी परगावी जातात. यामध्ये गुरुजी महिन्यातील चार सोमवार उपवास करतात, चार गुरुवार करतात, चार शनिवार करतात, अमावस्या चा उपवास करतात कारण संभाजी महाराज गेले म्हणून असतो. एक पौर्णिमेचा उपवास असतो कारण शिवाजी महाराज पौर्णिमेला गेले म्हणून, एक एकादशी करतात, एक प्रदोष करतात, एक शिवरात्री करतात. असे महिन्यातील 17 दिवस उपास असतो व सकाळी एक वेळेला जेवण करतात...

#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी
#श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान

!! श्रीशिवछत्रपती परंपरा !!इतिहास गर्जुनी आम्हा कटू सत्य सांगे ।ठेचू शकाल यवना जरी व्हाल जागे ।।संपूर्ण नाश अरीचा जरी ना...
22/06/2026

!! श्रीशिवछत्रपती परंपरा !!

इतिहास गर्जुनी आम्हा कटू सत्य सांगे ।
ठेचू शकाल यवना जरी व्हाल जागे ।।
संपूर्ण नाश अरीचा जरी ना कराल ।
विश्वात राष्ट्र म्हणूनी कधी ना टिकाल ।।

#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी ⛳
#श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान🚩
#श्लोकमालिका
#अभिषेकमंत्र

"दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा"कोल्हापूर येथे हिन्दुस्थानचे गृहमंत्री श्री. अमित शाह आणि शिवतपस्वी श्रीसंभाजीराव...
21/06/2026

"दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा"

कोल्हापूर येथे हिन्दुस्थानचे गृहमंत्री श्री. अमित शाह आणि शिवतपस्वी श्रीसंभाजीराव भिडे गुरुजी यांची भेट झाली असता, त्यांनी गुरूजींचे आदरपूर्वक स्वागत केले..!

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थितीत होते..!

#श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान

हिन्दुस्थानचे गृहमंत्री श्री. अमितभाई शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. एकना...
21/06/2026

हिन्दुस्थानचे गृहमंत्री श्री. अमितभाई शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर येथे शिवतपस्वी श्रीसंभाजीराव भिडे गुरुजी यांनी भेट घेतली अनेक महत्त्वाच्या विषयांवर गुरुजींच्या बरोबर चर्चा झाली....!

#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी
#श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान

Amit Shah Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Devendra Fadnavis

!! श्रीशिवछत्रपती परंपरा !! #ज्येष्ठ_शुद्ध_सप्तमी⛳झाशीची राणी लक्ष्मीबाई बलिदान दिन (तिथीनुसार) 🚩🚩विरांगना महाराणी लक्ष्...
21/06/2026

!! श्रीशिवछत्रपती परंपरा !!

#ज्येष्ठ_शुद्ध_सप्तमी⛳

झाशीची राणी लक्ष्मीबाई बलिदान दिन (तिथीनुसार) 🚩🚩

विरांगना महाराणी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच (झांशीची राणी लक्ष्मीबाई), या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.
इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना सेवक रामचंद्र देशमुखांनी फुलबाग येथील बाबा गंगादास यांच्या मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. फुलबाग येथे बाबा गंगादास यांच्या मठात तात्या टोपे, रामचंद्र राव देशमुख, काशीबाई कुनविन, गुलमोहम्मद, बांदा नवाब बहादुर अली द्वितीय आणि युवराज दामोदर राव यांनी मुखाग्नी दिली. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

शालिवाहन शक १७८० जेष्ठ शु. सप्तमी रोजी संध्याकाळी विरांगणा राणी लक्ष्मीबाई स्वर्गसिधारी गेल्या.

#झाशीच्या_राणी_लक्ष्मीबाई_यांच्या बलिदान दिनानिमित्त त्रिवार वंदन..!

#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी⛳
#श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान🚩

।। भक्ती शक्ती संगम अर्थात वारकरी धारकरी संगम ।।खरं तर ही परंपरा फक्त गुरुजींच्या अंतकरणातुनच येऊ शकते....जिथं साक्षात स...
21/06/2026

।। भक्ती शक्ती संगम अर्थात वारकरी धारकरी संगम ।।

खरं तर ही परंपरा फक्त गुरुजींच्या अंतकरणातुनच येऊ शकते....

जिथं साक्षात संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली जगद्गुरू तुकोबाराय पुण्यश्लोक भगवान शिवछत्रपती आणि धर्मवीर भगवान शंभूराजे यांचं एकत्रितपणे दर्शन आणि इथेच झालेला हा संगम याची देही याची डोळा पाहण्याच परम भाग्य भक्ती शक्ती संगम सोहळ्यामुळं आम्हाला प्राप्त झालं आणि दर वरवर्षी होतं....

मनाला विलक्षण भक्ती आणि शक्तीची प्रचिती देणारा हा सोहळा अनुभवण्यासाठी आपण अवश्य या अवघे अवघे या....

गुरुवार, ज्येष्ठ कृष्ण नवमी, शालिवाहन शके, १९४८
दुपारी १२:०० वाजता...

स्थळ: श्री जंगली महाराज मंदिर , शिवाजीनगर, पुणे.

।। राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ ।।

#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी
#श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान

!! श्रीशिवछत्रपती परंपरा !!कसा कोंबडीपोटी जन्मे गरुड Iकसा भ्याड प्राणी करे घोडदौड ।।ययाति कसा होऊ शकतो विरक्त ।मुसलमान त...
21/06/2026

!! श्रीशिवछत्रपती परंपरा !!

कसा कोंबडीपोटी जन्मे गरुड I
कसा भ्याड प्राणी करे घोडदौड ।।
ययाति कसा होऊ शकतो विरक्त ।
मुसलमान तैसा नसे देशभक्त ।।
( ययाति-महाभारतकाळांतील एक विषयासक्त राजा )

#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी🙏⛳
#श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान🚩
#श्लोकमालिका
#लोकजागरण ४

Address

Lonavla

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीशिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थान नाशिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share