Sevalaya - For The Children

Sevalaya - For The Children Sevalaya is a not for profit, non governmental organization for kids with HIV AIDS. It is a Dream Ra Sevalaya looks well founded and established now.

The journey was tough and full of obstacles beyond comprehension. The struggle, the battles Ravi Bapatle, his friends and well wishers had to go through are commendable.

सेवालयाचे मित्र,देणगीदार आणि हितचिंतक यांना आवाहन !................................…..............सेवालयाचा पहिला पालक,द...
26/07/2025

सेवालयाचे मित्र,देणगीदार आणि
हितचिंतक यांना आवाहन !................................…..............
सेवालयाचा पहिला पालक,देणगीदार, हितचिंतक ,एक सत्यान्वेषी पत्रकार आणि रवी बापटले यांचा मित्र म्हणून मी आपणा सर्वांना आवाहन करतो की, सेवालयासंदर्भात विविध न्यूज च्यानलवर,सोशलमिडीयावर येत असलेल्या ब्रेकिंग न्युजमुळे विचलीत,चिंतीत होऊ नका.
रवीसह , सहाजणांवर बाललैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून दाखल झालेला हा गुन्हा कोणाच्या तरी कारस्थानाचा भाग आहे, हे मी ठामपणे सांगतो.पोलिस तपासात सगळं सत्य बाहेर येऊन, रवीसह सगळेजण या आरोपातून मुक्त होतील,याबद्दल तीळमात्र शंका घेण्याचं कारण नाही. काल रात्री पहिल्यांदा मला ही बातमी समजली तेव्हा रवीशी सविस्तर बोलणं झालयं.यात सेवालयाला जाणीवपूर्वक गोवण्यात आलयं.

मी फक्त एकच गोष्ट सांगतो,ज्या मुलीनं सेवालयातील कर्मचारी अमित महामुनी मुलाने बलात्कार केलाय, असं तक्रारीत म्हटलंय.अमित महामुनी हा सेवालयात राहात होता.पण त्याची वयाची १८वर्षे पूर्ण झाल्यानंतर बाल कल्याण समितीच्या रीतसर परवानगीने त्याने सेवालय सोडलं.त्यानंतर तो एकदाही परत आला नाही. महामुनीने सेवालय सोडून पाच महिने झाल्यानंतर,ही तक्रारदार मुलगी समितीच्या आदेशाने सेवालयात आली.महामुनी आणि या मुलीची सेवालयात एकदाही भेट झालेली नाही. यासंबंधीचे सगळे लिखीत पुरावे उपलब्ध आहेत.

समितीच्या परवानगीनेच साधारण दिड महिन्यापूर्वी एका आठवड्यासाठी म्हणून ही मुलगी तिच्या आजी-आजोबाकडे गेली होती.तिला वारंवार फोन करूनही ती येत नव्हती.तेही सेवालयाने बालकल्याण समितीला कळवलं होतं.सतत पाठपुरावा केल्यावर २२जुलैला ती सेवालयात आली.बालकल्याण समितीकडून रीतसर आदेश काढून तिला मुक्त करण्यात आले.ती इथून गेली.२३जुलैला धाराशिव बालकल्याण समितीकडं तिनं तक्रार केली.या समितीच्या लेखी तक्रारीवरून २४जुलैला रवी बापटले व इतर पाचजणांविरूध्द ढोकी पोलिसात गुन्हा दाखल झालाय.हा घटनाक्रम बघितला तर या मुलीला पुढे करून कोणीतरी हा खेळ करतोय हे स्पष्ट होतोय.
गुन्हा दाखल झालाय.तो औसा पोलिसात वर्ग होतोय.सेवालयातून रवी बापटले, रचना बापटणे यांना औसा पोलिस घेऊन गेलेत. पुढे पोलीस तपास चालू राहील.सत्य समोर येईलच.

सेवालयावर,रवीच्या कामावर प्रेम करणारे हजारो लोक महाराष्ट्रातच नाही तर देश-विदेशात आहेत.त्यांना मी एवढंच सांगतो ,तुमचा सेवालयावरचा विश्वास अजिबात डळमळीत होऊ देऊ नका...
रवीवर प्रेम करणारे जसे आहेत, तसे त्यांचा द्वेष करणारे मुठभर लोकही आहेत. ते अशा ब्रेकिंग न्यूजची वाटच बघत होते....
मला याची चिंता नाही.खोट्या आरोपाने कोणी बदनाम होत नाही.

मी पुन्हा सांगतो....काही काळ वाट बघा.रवी या अग्निदिव्यातून अधिक उजळून बाहेर येतील...आणि हे सर्व कट कारस्थान करणारे लोक समाजासमोर येतील,याची मला खात्री आहे.

- Maharudra Mangnale

Address

Sevalaya, Hasegaon
Latur
413531

Telephone

+919503177700

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sevalaya - For The Children posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sevalaya - For The Children:

Share